Current affairs | Evening News Marathi
Current affairs 13 January 2020 Marathi |
13 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
स्वदेशी ‘तेजस’ विमान: जहाजावर अरेस्टेड लँडिंग करणारे भारताचे पहिले विमान
नौदलात दाखल होण्याच्या मार्गावर असलेल्या स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ या वजनाने हलक्या लढाऊ विमानाने दिनांक 11 जानेवारी 2020 रोजी INS विक्रमादित्य या विमानवाहू नौकेवर यशस्वीपणे अरेस्टेड लँडिंग केले.
या अरेस्टेड लँडिंगनंतर नौदलासाठी डबल इंजिन तेजस विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- INS विक्रमादित्य ही मुंबईतील पश्चिम कमांड मुख्यालयाचा एक भाग असून मुंबई अंतर्गत अरबी समुद्रात ही चाचणी झाली.
- ही यशस्वी लँडिंग कमांडर जयदीप मावलंकर यांनी केली.
- या यशामुळे भारत आता अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स आणि चीन यासारख्या देशांच्या निवडक गटात प्रवेश करणार ज्याने 200 मीटर लांबीच्या धावपट्टीवर अरेस्टेड लँडिंग करण्यास सक्षम असे विमान विकसित केले आहे.
- सामान्य अवस्थेत धावपट्टीवर उतरण्यासाठी 1 किलोमीटरची धावपट्टी लागते. अरेस्टेड लँडिंगमध्ये एका लवचिक तारेच्या मदतीने विमानाला रोखले जाते.
तेजस विमान
- तेजस देशात विकसित करण्यात आलेले पहिले एक इंजिन असलेले हलके लढाऊ विमान आहे.
- या विमानाला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजंसीने रचले आणि विकसित केले आहे.
- तेजस भारतीय हवाई दलाच्या 45 व्या स्क्वाड्रन ‘फ्लाइंग ड्रॅगर्स’ चा भाग आहे.
- हवाई दलाने डिसेंबर 2017 मध्ये HALला 83 तेजस जेट तयार करण्याची जबाबदारी सोपवली होती.
- पहिल्यांदा ‘तेजस’ विमान 1980च्या दशकात रशिया, फ्रान्स आणि रशियाकडून तंत्रज्ञान घेवून हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने विकसित केले होते.
नवी दिल्लीत 14 जानेवारीपासून ‘रायसीना संवाद’ याचा प्रारंभ
14 जानेवारी ते 16 जानेवारी 2020 या काळात दरवर्षी प्रमाणे नवी दिल्लीत ‘रायसीना संवाद 2020’ ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचा विषय: “21@20: नेव्हिगेटींग द अल्फा सेंचुरी”
- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हे या संमेलनाचे मुख्य वक्ते आहेत. या बैठकीला संबोधित करणार्या इतर मंत्र्यांमध्ये यजमान भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लाव्हरोव्ह यांचा समावेश आहे.
- तसेच इराण, डेन्मार्क, मालदीव, मोरोक्को, ऑस्ट्रेलिया, भूतान, दक्षिण आफ्रिका, झेक प्रजासत्ताक, एस्टोनिया आणि उझबेकिस्तानमधले प्रतिनिधी यात भाग घेणार आहेत.
- यावर्षी मोठ्या संख्येनी जगभरातल्या परराष्ट्र मंत्र्यांची उपस्थिती भू-राजनैतिक परिषदेत असणार आहे. परिषदेत 90 देशांमधून 150 हून अधिक वक्ता आणि 550 प्रतिनिधी भाग घेणार आहेत.
कार्यक्रमाविषयी
'रायसीना संवाद’ ही नवी दिल्लीत दरवर्षी आयोजित होणारी बहुपक्षीय परिषद आहे. 2016 सालापासून तीन दिवस चालणारी ही परिषद भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन (दिल्लीतली स्वायत्त वैचारिक संस्था) यांच्यावतीने संयुक्त रूपात आयोजित केली जाते.
"रायसीना" हे नाव नवी दिल्लीमधल्या ‘रायसीना टेकडी’ या ठिकाणावरून ठेवले गेले आहे, जे भारत सरकार तसेच राष्ट्रपती भवन, राष्ट्रपतीसाठीचे घर आहे.
हा कार्यक्रम जागतिक समुदायाला भेडसावणार्या सर्वात आव्हानात्मक मुद्द्यांना सोडविण्यासाठी वचनबद्ध आहे. इथे धोरण, व्यवसाय, माध्यमे आणि नागरी समाजातले सर्व जागतिक नेते नवी दिल्लीत एकत्र येतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आंतरराष्ट्रीय धोरणांच्या विस्तृत विषयावर चर्चा करतात.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment