Current affairs | Evening News Marathi
Current affairs 15 January 2020 Marathi |
15 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
.
मायकेल पात्रा: RBI चे नवे डेप्युटी गव्हर्नर
भारतीय रिझर्व्ह बँकेनी डॉ. मायकेल पात्रा ह्यांची नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या पतधोरण समितीचे सदस्य असलेले पात्रा विरल आचार्य यांची जागा घेणार आहेत.
विद्यमान डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य ह्यांनी राजीनामा दिला असून 23 जुलै 2020 रोजी आचार्य ह्यांच्या जागी मायकेल पात्रा पदभार स्वीकारणार आहेत. ते पुढील तीन वर्षे डेप्युटी गव्हर्नरपदी राहणार. भारतीय रिझर्व्ह बँकेत विविध विभागात 35 वर्षांचा पात्रा यांना अनुभव आहे.
भारतीय भुदल दिन: 15 जानेवारी
भारतीय भुदलाचा स्थापना दिवस म्हणून देशात दरवर्षी 15 जानेवारी या दिवशी ‘भुदल दिन’ पाळला जातो. यावर्षी 72 वा भुदल दिन पाळला गेला.
15 जानेवारी 1949 पासूनच भारताचे भुदल ब्रिटिश भुदलापासून पुर्णपणे वेगळे आणि मुक्त झाले. या दिनाच्या स्मृतीत दरवर्षी ‘भुदल दिन’ साजरा केला जातो.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment