Current affairs | Evening News Marathi
Current affairs 12 January 2020 Marathi |
12 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’मध्ये भाग घेतला
भारताने ‘हार्मुझ शांती पुढाकार’ यात भाग घेतला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश्य जगातल्या सर्वात व्यस्त आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जलवाहतुकीच्या मार्गामध्ये शांती प्रस्थापित करून ते क्षेत्र स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे हा आहे.
या प्रदेशातल्या देशांमधली प्रादेशिक अखंडता आणि राजकीय स्वातंत्र्य याची हमी देणारा हा उपक्रम देशांमधली एकता, परस्पर समन्वय तसेच शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यासाठी आहे.
होर्मुज समुद्रधुनी: जागतिक तेलाची एक महत्त्वाची वाहिनी
पर्शियन खाडीमध्ये होर्मुज समुद्रधुनी आहे. होर्मुज समुद्रधुनीच्या क्षेत्रातून जगातले एक पंचमांश तेल वाहून नेल्या जाते. ही समुद्रधुनी ओमान आणि इराण या देशांच्या दरम्यान आहे. ही समुद्रधुनी उत्तर आखाती प्रदेशाला जोडते आणि दक्षिणेकडे ओमानची खाडी आणि त्यापलीकडे अरबी समुद्र आहे. ही समुद्रधुनी 21 मैल (33 किमी) अंतरावर पसरलेली आहे.
या मार्गे OPECचे सदस्य असलेले सौदी अरब, इराण, संयुक्त अरब अमीरात (UAE), कुवैत आणि इराक बहुतांश तेल निर्यात करीत आहेत. कतार हा जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा (LNG) निर्यातदार देश आहे आणि जवळपास सर्व LNG या मार्गे पाठवते.
राष्ट्रीय युवा दिन: 12 जानेवारी
12 जानेवारी 2020 रोजी “चॅनेलाइजिंग युथ पॉवर फॉर नेशन बिल्डिंग” या विषयाखाली ‘राष्ट्रीय युवा दिन’ पाळण्यात आला. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले.
स्वामी विवेकानंद यांच्या 157वी जयंतीनिमित्त 20 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे देखील आयोजन केले गेले. हा कार्यक्रम नेहरू युवा केंद्र या संघटनेकडून दरवर्षी आयोजित केला जातो.
स्वामी विवेकानंद विषयी
12 जानेवारी 1863 रोजी नरेंद्रनाथ दत्त यांचा जन्म झाला पुढे ते स्वामी विवेकानंद या नावाने प्रसिद्धीस आले. 4 जुलै 1902 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
देशातले एक महान आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद ह्यांनी भारतातल्या वेदांत आणि योग या तत्वज्ञानाची जगाला ओळख करुन दिली. शिकागो इथे 1893 साली झालेल्या जागतिक धर्मपरिषदेतल्या भाषणानंतर त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयानुसार, स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीत सन 1984 ला ‘आंतरराष्ट्रीय युवा वर्ष’ घोषित केले गेले. त्यापाठोपाठ, भारत सरकारने सन 1984 पासून दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय युवा दिवस’ साजरा करण्याची घोषणा केली.
.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment