Current affairs | Evening News Marathi
Current affairs 9 December 2019 Marathi |
9 डिसेंबर 2019 मराठी करेंट अफेयर्स
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन: 9 डिसेंबर
दरवर्षी 9 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिन (किंवा लाचलुचपत प्रतिबंधक दिन) म्हणून जगभरात साजरा केला जातो.
यावर्षी, हा दिवस 'युनायटेड अगेन्स्ट करप्शन फॉर डेवलपमेंट, पीस अँड सेक्युरिटी' संकल्पनेखाली साजरा केला गेला. याशिवाय, जगभरात “युनायटेड अगेन्स्ट करप्शन” या नावाने एक जागतिक मोहीम चालवली जात आहे.
भ्रष्टाचार म्हणजे काय?
भ्रष्टाचार ही एक किचकट सामाजिक, राजकीय आणि आर्थिक बाब आहे जी सर्व देशांवर नकारात्मक परिणाम करते. भ्रष्टाचार लोकशाही संस्थेची अधोगती करते, आर्थिक विकास धीमा करते आणि सरकारी अस्थिरतेला हातभार लावते.
कर्मचाऱ्यांकडून होण्याची शक्यता असलेल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख कौटिल्याच्या अर्थशास्त्रात करण्यात आला आहे. न्या. पी.बी. सावंत चौकशी आयोगाने सादर केलेल्या चौकशी अहवालात भ्रष्टाचाराच्या व्याख्येत लाचखोरीबरोबर जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीची बेपर्वाई, अपव्यय, पक्षपातीपणा यांचाही समावेश करण्यात आला आहे.
पार्श्वभूमी
31 ऑक्टोबर 2003 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने भ्रष्टाचाराच्या विरोधात एक दिवस पाळण्यासाठी यासंबंधीचा ठराव मंजूर केल्यानंतर दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.
प्रत्येक वर्षी एक लक्ष कोटी (महादम / ट्रिलियन) डॉलर एवढी लाच जगभरात दिली जाते, तर अंदाजे 2.6 महादम डॉलरचा भ्रष्ट व्यवहार होतो. ही रक्कम जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (GDP) 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) याच्यानुसार, विकसनशील देशांमध्ये, भ्रष्टाचाराचा निधी हा अधिकृत विकास सहाय्याच्या 10 पटीने अधिक आहे.
भारतात ‘भारतीय दंडविधान संहिता 161’ यामध्ये भ्रष्टाचारविरोधी तरतूद आहे. त्याच्या अनुषंगाने ‘भ्रष्टाचारविरोधी कायदा-1988’ तयार करण्यात आला.
मिस युनिव्हर्स 2019: झोजिबिनी टुंझी (दक्षिण आफ्रिका)
दक्षिण आफ्रिकेच्या झोजिबिनी टुंझी हिने यंदाचा ‘मिस युनिव्हर्स 2019’ म्हणजेच विश्वसुंदरीचा किताब जिंकला आहे. मिस प्युर्टो रिको हिने द्वितीय क्रमांक तर मिस मेक्सिकोने तृतीय क्रमांक पटकावले.
अमेरिकेच्या अॅटलांटा शहरात 9 डिसेंबर 2019 रोजी 68 वी ‘मिस युनिव्हर्स’ ही सौंदर्य स्पर्धा झाली. गतवर्षीची मिस युनिव्हर्स कॅटरिना ग्रे हिने मानाचा मुकूट विजेतीला चढविला.
उपांत्य फेरीत पोहचलेली भारताची वर्तिका सिंग शेवटच्या 20 जणींमध्ये होती. मात्र अंतिम 10 जणींमध्ये तिला स्थान मिळवता आले नाही.
स्पर्धेविषयी
मिस युनिव्हर्स (विश्वसुंदरी) ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक सौंदर्य स्पर्धा आहे. अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरात मुख्यालय असलेली मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन ह्या स्पर्धेचे आयोजन करते. 1952 साली कॅलिफोर्नियामध्ये ही सौंदर्य स्पर्धा सर्वप्रथम भरवली गेली होती.
विश्वसुंदरी ठरलेल्या भारतीय - सुष्मिता सेन (सन 1994) व लारा दत्ता (सन 2000)
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment