Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, October 8, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 8 October Marathi | 8 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 8 October  Marathi |
       8 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स


    आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे ई-दंत सेवा संकेतस्थळ

    केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मुख-आरोग्याच्या संदर्भात ज्ञानाच्या प्रसारासाठी एक संकेतस्थळ तयार केले आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते 7 ऑक्टोबर 2019 रोजी ‘ई-दंत सेवा’ या नावाने एक संकेतस्थळ आणि एका मोबाइल अॅपचे उद्घाटन करण्यात आले आहे.
    नेत्रहीन व्यक्तींसाठी देखील याच्यासंदर्भात ब्रेल लिपीत एक पुस्तिका आणि ध्वनीफिती प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच गर्भवती महिला आणि बालकांसाठी एका पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.
    ठळक वैशिष्ठ्ये
    • ‘ई-दंत सेवा’ हे पहिले-वहिले राष्ट्रीय डिजिटल व्यासपीठ आहे, ज्याद्वारे मुखा-संबंधी आरोग्याविषयी माहिती प्रदान केले जाते.
    • अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्था (AIIMS) आणि इतर भागधारकांसह मंत्रालयाच्या या पुढाकाराने मुखासंबंधी आरोग्य राखण्याविषयी महत्त्व लोकांना समजून घेण्यास मदत होणार आहे.
    • संकेतस्थळावर 2014 साली चालू झालेल्या राष्ट्रीय मुख-आरोग्य कार्यक्रमाविषयी माहिती, सर्व दंत-विषयक सुविधांची आणि महाविद्यालयांची तपशीलवार यादी, शैक्षणिक माहिती आणि संपर्क साहित्य आणि 'सिम्प्टंस चेकर' या नावाचे एक साधन आहे जे आरोग्याच्या समस्येबाबत लक्षणे याबाबत माहिती पुरविते.  तसेच बचाव करण्याचे मार्ग, उपचार पद्धती आणि सर्वात जवळची उपलब्ध दंत सुविधा (सार्वजनिक आणि खासगी दोन्ही) शोधण्यासाठी निर्देशित करते.

    RBIचा ग्राहक विश्वास सर्वेक्षण 2019

    भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून भारतातल्या शहरांमध्ये ‘ग्राहक विश्वास सर्वेक्षण’ केले गेले. त्यात आर्थिक परिस्थिती, रोजगार, मूल्य पातळी, उत्पन्न आणि खर्च या पाच आर्थिक घटकांवर भर देण्यात आला आणि ग्राहकांची धारणा (वर्तमान आणि भविष्यकाळ) लक्षात घेतली गेली आहे. या सर्वेक्षणात दोन मुख्य निर्देशांक तयार करण्यात आले आहेत, ते आहेत – वर्तमान स्थिती निर्देशांक आणि भविष्यातल्या अपेक्षा याबाबत निर्देशांक.
    अहवालानुसार,
    • सप्टेंबर 2019 मध्ये ग्राहकांचा विश्वास सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. वर्तमान स्थिती निर्देशांक (CCI) 89.4 पर्यंत पोहोचला आहे.
    • सप्टेंबर 2014 मध्ये ग्राहक विश्वास निर्देशांक 103.1 एवढा होता. डिसेंबर 2016 पर्यंत ग्राहक आशावादी (102) राहिले आणि त्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नोटाबंदीनंतर ग्राहक निराशावादी बनले. त्यानंतर ग्राहकांचा विश्वास अडीच वर्ष 'निराशाची श्रेणी'मध्ये म्हणजे 100च्या खाली राहिला. सुमारे 30 महिन्यांनंतर, 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी ग्राहकांचा विश्वास परत आशावादी झाला.
    • मे 2019 मध्ये ग्राहकांचा विश्वास 104.6 वर पोहोचला. मे 2019 मध्ये विश्वासात पुन्हा घसरण दिसून आली म्हणजेच CCI 97.3 वर आली आणि जुलैमध्ये ते 95.7 वर पोहोचले. सप्टेंबरमध्ये CCI 89.4 एवढा होता जो नोटाबंदीनंतर सरासरीपेक्षा कमी होता.
    • सप्टेंबर 2019 मध्ये ग्राहकांची भविष्यातली अपेक्षादेखील अधिक कमकुवत झाल्या. जुलै 2019 मध्ये भविष्यातल्या अपेक्षा बाबतचा निर्देशांक 124.8 वर होता, जो सप्टेंबर 2019 मध्ये 118 वर पोहचला.

    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स, 

    No comments:

    Post a Comment