Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, October 9, 2019

    जागतिक टपाल दिन: 9 ऑक्टोबर | World Post Day

    Views
    जागतिक टपाल दिन: 9 ऑक्टोबर

    दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी जगभरात जागतिक टपाल दिन पाळला जातो.

    लोकांच्या दैनंदिन जीवनात टपाल क्षेत्राची भूमिका आणि देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातले योगदान याबद्दल जागृती निर्माण करणे हा या दिनाचा हेतू आहे.

    इतिहास

    दिनांक 9 ऑक्टोबर 1874 रोजी युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) या संघटनेची स्थापना बर्न (स्वित्झर्लंड) येथे केली गेली होती. या घटनेच्या स्मृतीत 1969 साली 9 ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन म्हणून घोषित करण्यात आले.

    युनिव्हर्सल पोस्टल युनियनने कार्यक्षम अश्या टपाल सेवेचा मार्ग खुला केला, जी पुढे सन 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची (UN) एक प्रमुख संस्था बनली.

    जागतिक टपाल दिन साजरा करण्याची संकल्पना आनंद मोहन नरुला या भारतीयाने मंडळी होती. सन 1969 मध्ये टोकियोत झालेल्या UPU परिषदेत हा दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला. तेव्हापासून हा दिवस जगभर साजरा केला जात आहे.

    ‘इंडिया पोस्ट’ या ब्रॅंड नावाखाली व्यवहार करणारे टपाल विभाग (DoP) ही भारतातली सरकारद्वारे संचालित अशी टपाल प्रणाली आहे, जी दळणवळण मंत्रालयाची एक उपकंपनी आहे. दिनांक 1 ऑक्टोबर 1854 रोजी ब्रिटिश भारतात लॉर्ड डलहौजी ह्यांनी आधुनिक भारतीय टपाल सेवेचा पाया रचला. डलहौजी ह्यांनी एकसमान टपाल दर (सार्वत्रिक सेवा) लागू केलेत आणि ‘इंडिया पोस्ट ऑफिस अॅक्ट 1854’ मंजूर करीत लॉर्ड विल्यम बेंटिक ह्यांच्या भारतात टपाल विभागाची स्थापना करण्याविषयीच्या 1837 सालाच्या कायद्यात दुरूस्ती केली.

    भारत 23 टपाल क्षेत्रात विभागले गेले आहेत, प्रत्येक क्षेत्र चीफ पोस्टमास्टर जनरल यांच्या अध्यक्षतेखाली आहे. संपूर्ण देशासाठी ‘डायरेक्टर जनरल ऑफ पोस्ट’ हे प्रमुख पद आहे. हिमाचल प्रदेशाच्या हिक्कीम येथे जगातल्या सर्वात उंचीवर असलेल्या टपाल कार्यालयांपैकी एक कार्यालय आहे, जे 14,567 फूट (4,440 मीटर) उंचीवर वसलेले आहे.


    World Post Day

    World Post Day is celebrated each year on October 9th, this marks the anniversary of the Universal Postal Union (UPU), which was set up in 1874 in Switzerland. The Universal Postal Union opened the way for efficient postal services which became an agency of the United Nations in the year 1948.
    Key Points:
    • World Post Day was mooted by an Indian, Anand Mohan Narula in 1969 at Universal Postal Union Congress, Tokyo. Since then, it has been celebrated all over the world.
    • The motto of World Post Day is to create awareness of the role that the postal sector has in people’s and businesses’ everyday lives and the contribution it leads to the social and economic development of countries.
    • In India, the Department of Post will take initiative to celebrate this day. Post has been the backbone of the country’s communication network for nearly two centuries.
    • More than 150 countries celebrate World Post Day and in some countries, it is observed as a working holiday. It's a day when new postal products and services are promoted.



    No comments:

    Post a Comment