Current affairs | Evening News Marathi
Current affairs 10 October Marathi |
10 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स
World Health Organisation- India Country Cooperation Strategy 2019–2023
WHO इंडिया कंट्री कोऑपरेशन स्ट्रॅटेजी 2019-2023
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते ‘WHO इंडिया कंट्री कोऑपरेशन स्ट्रॅटेजी 2019-2023: ए टाइम ऑफ ट्रान्झिशन’ या शीर्षकाखाली एक दस्तऐवज प्रसिद्ध करण्यात आले आहे.
कंट्री कोऑपरेशन स्ट्रॅटेजी (CCS) दस्तऐवज जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि आरोग्य क्षेत्रात परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्यासाठी आरोग्य क्षेत्रातली ध्येये साध्य करण्याच्या दिशेनी भारत सरकारबरोबर कार्य करण्यासाठी एक पथदर्शी मार्ग प्रदान करते.
देशासह WHOच्या धोरणात्मक सहकार्यासाठी चार क्षेत्र ओळखले गेले आहेत, ते म्हणजे –
- सार्वजनिक आरोग्य सेवेच्या प्रगतीस गती देणे;
- आरोग्याच्या निर्धारकांना उद्देशून आरोग्य आणि निरोगीपणाला प्रोत्साहन देणे;
- आरोग्याविषयक आणीबाणीच्या विरोधात नागरिकांचे रक्षण करणे;
- आरोग्यविषयक क्षेत्रात भारताचे जागतिक नेतृत्व वाढविणे.
ठळक वैशिष्ट्ये
- सद्य आणि उदयोन्मुख आरोग्यविषयक गरजा आणि असाध्य रोग, प्रतिजैविकांना प्रतिरोध आणि वायू प्रदूषण यासारख्या आव्हानांना ओळखण्यात आले आहे.
- हे नव्याने स्वीकारलेल्या “WHO 13 व्या जनरल प्रोग्राम ऑफ वर्क अँड इट्स ‘ट्रिपल बिलियन’ टारगेट्स”, शाश्वत विकास ध्येय (SDGs) आणि WHO आग्नेय आशिया प्रदेशाच्या आठ प्रमुख प्राधान्यांसह पूर्णपणे संरेखित असलेल्या भागीदारींपैकी एक आहे.
- यात ‘युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट फ्रेमवर्क फॉर 2018-2021’ याच्या अंतर्गत केल्या गेलेल्या कार्यांचा प्रत्यय घेतला गेला आहे.
- हे भारताच्या राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017, आयुषमान भारत आदी विविध उपक्रमांमध्ये सहकार्याला चालना देणार.
Nobel Prize in Chemistry 2019
रसायनशास्त्रामधले नोबेल पारितोषिक 2019
2019 या वर्षासाठीचे रसायनशास्त्रामधले नोबेल पारितोषिक जॉन गुडइनफ (अमेरिका), स्टेनली व्हिटिंघम (अमेरिका) आणि अकिरा योशिनो (जापान) या तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे देण्यात येणार आहे.
हे तीन शास्त्रज्ञ पुरस्काराची 90 लक्ष स्वीडिश क्रोनोर (914000 डॉलर) रक्कम आपापसात वाटून घेणार. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेनी हा पुरस्कार जाहीर केला. 10 डिसेंबरला एका औपचारिक समारंभात नोबेल विजेत्यांचा सन्मान केला जाणार.
97 वर्षीय जॉन गुडइनफ हे अमेरिकेत प्राध्यापक असून या वयात पारितोषिक मिळवणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. याशिवाय स्टॅनली व्हिटिंघम इंग्लिश-अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ असून ते सध्या बिंगम्टन विद्यापीठात प्राध्यापक आहेत. तर अकिरा योशिनो जापानचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी लिथियम-आयन बॅटरीचा अविष्कार केला आहे.
पुन्हा रिचार्ज होणाऱ्या, हलक्या आणि शक्तीशाली लिथियम-आयन बॅटरीचा वापर आता मोबाईल फोन, लॅपटॉपपासून ते इलेक्ट्रॉनिक वाहनांपर्यंत केला जातो. यामुळे सौर आणि पवन ऊर्जा संग्रहित करणेही शक्य होत आहे, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलमुक्त समाजाच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होत आहे.
नोबेल पारितोषिक
नोबेल पारितोषिक हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानवी प्रगतीला वरदान ठरलेल्या वैज्ञानिक संशोधनामध्ये योगदान दिलेल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी स्वीडिश आणि नॉर्वेजियन संस्थांकडून विविध श्रेणीमध्ये देण्यात येणारा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. हा सन्मान स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेच्या सन्मानार्थ सन 1895 पासून दिला जात आहे. पारितोषिकाचे वितरण विविध संस्थांकडून केले जाते. याचे विवरण खालीलप्रमाणे आहे:
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र: रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस, स्वीडन
- शरीरशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र: करोलीन्स्का इंस्टीट्यूट येथील नोबेल असेंब्ली, स्वीडन
- साहित्य: स्वीडिश अकादमी, स्वीडन
- शांती: हे पारितोषिक स्वीडिश संस्थेच्यावतीने नॉर्वे या देशातल्या नॉर्वेजियन नोबेल समितीकडून दिले जाते.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment