Current affairs | Evening News Marathi
Current affairs 11 April 2019 Marathi |
11 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
UNFPAचा ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन 2018’ अहवाल
संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या कोष (UNFPA) कडून ‘स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन 2018’ या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.अहवालानुसार, सन 2010 आणि सन 2019 या काळात भारताची लोकसंख्या 1.2% इतक्या वार्षिक दराने वाढली, जेव्हा की याच कालावधीत जागतिक पातळीवर हा वार्षिक दर सरासरी 1.1% एवढा होता.
अन्य ठळक बाबी
- 2019 साली जागतिक लोकसंख्या 7.715 अब्ज इतकी वाढली, जी वर्षापूर्वी 7.633 अब्ज एवढी होती.
- भारताचा लोकसंख्या दर चीनच्या दुप्पट असून चीनचा वार्षिक दर हा 0.5% एवढा होता.
- सरासरी आयुमर्यादा 72 वर्षापर्यंत आहे.
- कमी विकसित देशांमध्ये लोकसंख्या दर सर्वाधिक नोंदवला गेला आहे. आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये सरासरी वार्षिक दर हा 2.7% एवढा नोंदवला गेला.
- 2050 सालापर्यंत जागतिक लोकसंख्येमधील वाढ ही आफ्रिकेतले बहुतेक देश किंवा भारत व नायजेरिया या सर्वाधिक लोकसंख्या असलेले देशांमध्ये असलेल्या उच्च प्रजननक्षमतेमुळे दिसून येणार.
- भारतातल्या 24 राज्यांमधील भारताची सुमारे अर्ध्या लोकसंख्येचा जन्मदर 2.1 मुलं प्रति महिला एवढा आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या कोष (UNFPA)
संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या कोष (United Nations Population Fund -UNFPA) कडून 150 हून अधिक देश आणि प्रांतातले प्रजनन आरोग्य आणि जन्मदराबाबत नियंत्रण सेवा उपलब्ध करून दिली जाते. या कार्यक्रमाचा अमेरिका (USA) हा एक संस्थापक सदस्य आहे. या कार्यक्रमाची स्थापना 1969 साली झाली आणि त्याचे मुख्यालय न्यूयॉर्क (अमेरिका) येथे आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 11 April 2019 Marathi |
11 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
बेंजामिन नेतान्याहू इस्त्राएलच्या इतिहासातले सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरणार
इस्त्राएलच्या राष्ट्रीय निवडणुकीत बेंजामिन नेतान्याहू यांनी विजय मिळवला आहे.नेतान्याहू ह्यांची जर पंतप्रधान पदासाठी निवड झाली तर इस्त्राएलचे पंतप्रधानपद भूषवण्याची त्यांची ही विक्रमी पाचवी वेळ असेल आणि ते इस्त्राएलच्या 71 वर्षांच्या इतिहासातले सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरु शकतात.
इस्राएल हा नैऋत्य आशियामधील एक देश आहे. त्याला आग्नेय भूमध्य सागराची पूर्व किनारपट्टी लाभलेली आहे. जेरूसलेम ही देशाची (स्व-घोषित मात्र विवादीत) राजधानी आहे आणि इस्राएली न्यू शेकेल हे राष्ट्रीय चलन आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 11 April 2019 Marathi |
11 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
पहिल्या सहा धनुष्य तोफा भारतीय लष्कराकडे सुपूर्द
संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत आयुध कारखाना मंडळाने (OFB) भारतीय लष्कराकडे सहा ‘धनुष्य’ तोफांचा समावेश असलेली पहिली खेप भारतीय लष्कराकडे सुपूर्द केली आहे.भारतीय लष्कराने 114 ‘धनुष्य’ तोफा तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. ‘धनुष्य’ तोफ ही स्विडीश बोफोर्स तोफेची सुधारित आवृत्ती आहे. त्यासाठी बोफोर्सचे सुमारे 81% एवढ्या प्रमाणात स्वदेशीकरण आधीपासूनच केले गेले आहे आणि 2019 सालाच्या अखेरीपर्यंत ही पातळी 91% पर्यंत वाढवली जाईल.
धनुष्य तोफ
देशातच विकसित करण्यात आलेली ‘धनुष्य’ तोफ प्रणाली (artillery gun) ही 1980च्या दशकात भारताने खरेदी केलेल्या स्वीडिश बोफोर्स होव्हित्झर तोफेची एक अद्ययावत आवृत्ती आहे. भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) आणि खाजगी क्षेत्राने एकत्रितपणे विकसित केलेल्या अॅडव्हान्स टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम (ATAGS) म्हणजेच ‘धनुष्य’ तोफेने 48 किलोमीटर अंतरावरचे लक्ष्य भेदून नवा विक्रम केलेला आहे.
155 मि.मी. x 45 मि.मी. कॅलिबर या आकाराचा तोफेचा गोळा ही तोफ वापरते. ही तोफ अत्याधिक पाऊस असो वा बर्फवृष्टी, कोणत्याही परिस्थितीत अचूक वेध घेऊ शकते. ही कोणत्याही प्रदेशात (सपाट मैदान, वाळवंट वा डोंगराळ भागात) हाताळण्यास सहज आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 11 April 2019 Marathi |
11 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
2019-20 मध्ये भारताचा विकासदर 7.3% असेल: IMF
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) ‘वर्ल्ड इकनॉमिक आऊटलुक 2019’ या शीर्षकाखाली एप्रिल महिन्यातला आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे.IMFने भारतासाठी चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 2019-20 मध्ये विकासदर 7.3% तर पुढील आर्थिक वर्षात विकासदर 7.5% असा अंदाज वर्तवला आहे.
अन्य ठळक बाबी
- 2019-20 या आर्थिक वर्षात जागतिक विकासदर हा 3.3% एवढा असण्याचा अंदाज आहे, जो वर्ष 2018 मध्ये 3.6% आणि वर्ष 2017 मध्ये 4% एवढा होता.
- 2022 सालापर्यंत प्रगत अर्थव्यवस्थांचा विकासदर 1.6% पर्यंत घटण्याची शक्यता आहे.
अहवालानुसार, पुढच्या तीन ते पाच वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था सरासरी 7% दराने विकासाच्या मार्गावर टिकून राहणार. दरम्यान, सरकारवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आर्थिक क्षेत्रातल्या पायाभूत धोरण बदलांचा क्रम कायम राखणे भारतासाठी आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
दि. 27 डिसेंबर 1944 साली ब्रेटोन वूड्स परिषदेत जागतिक बँकेसोबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund –IMF) या वित्तीय संस्थेची स्थापना करण्यात आली आणि ही 1945 साली 29 सदस्य देशांसह औपचारिकरित्या अस्तित्वात आली. सध्या IMF चे 188 सदस्य देश आहेत. याचे वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) येथे मुख्यालय आहे.
देय करावयाची शिल्लक रक्कम भरण्यास येणार्या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संकटात व्यवस्थापनाविषयीच्या बाबींमध्ये ही बँक आपली भूमिका बजावते. तसेच जागतिक आर्थिक सहयोग वाढविणे, आर्थिक स्थिरता सुरक्षित करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करणे, उच्च रोजगार आणि दीर्घकालीन आर्थिक वाढीला चालना देणे आणि दारिद्र्य कमी करणे यादृष्टीने ही बँक कार्य करते.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 11 April 2019 Marathi |
11 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
“बोल्ड कुरुक्षेत्र-2019”: भारत आणि सिंगापूर यांचा लष्करी सराव
“बोल्ड कुरुक्षेत्र-2019” या नावाने भारत आणि सिंगापूर या दोन देशांच्या लष्करांच्या संयुक्त सरावाची सांगता झाली. झांसी येथील बाबिना छावणीत दिनांक 8 मार्च 2019 पासून या सरावाचा आरंभ झाला आणि सराव तीन दिवस चालला.दोन्ही देशांमध्ये 2017 साली झालेल्या संरक्षण कराराच्या पार्श्वभूमीवर हा सराव आयोजित केला जात आहे. दहशतवादविरोधी कार्यात सहकार्य वाढविणे, संरक्षण तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि सागरी सुरक्षा सुधारणे हा या सरावाचा उद्देश आहे.
सिंगापूर हा मलेशियाच्या दक्षिणेकडील एक बेट राष्ट्र आहे. हे एक जागतिक आर्थिक केंद्र आहे. सिंगापूर हे एक शहर, राजधानी आणि राष्ट्र आहे. देशाचे राष्ट्रीय चलन सिंगापूर डॉलर हे आहे. सिंगापूर बेट हे सिंगापूरचे मुख्य बेट आहे, ज्याला ‘पुलाऊ उंजोंग’ असे म्हणतात.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 11 April 2019 Marathi |
11 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
“CRPF वीर परिवार”: शहीदांच्या कुटुंबासाठी समर्पित असलेले मोबाइल अॅप
केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) 9 एप्रिलला 54 वा शौर्य दिन (Valour Day) साजरा केला.त्यानिमित्ताने, सीमेवर कर्तव्य पार पाडताना शहीद झालेल्या CRPFच्या कर्मचार्यांच्या कुटुंबियांसाठी समर्पित असलेले “CRPF वीर परिवार” नावाच्या मोबाइल अॅपचे अनावरण नवी दिल्लीत एका कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले.
दिनांक 9 एप्रिल 1965 रोजी गुजरातचे कच्छचे रण येथील सरदार पोस्ट काबीज करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानी सैन्याला पछाडण्यासाठी CRPFच्या एका छोट्या तुकडीने दाखवलेल्या उत्तुंग शौर्याच्या गौरवार्थ शौर्य दिन साजरा केला जातो.
No comments:
Post a Comment