Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, April 10, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 10 April 2019 Marathi | 10 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 10  April 2019 Marathi |   
    10 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी


    UNESCAP याचा “सर्व्हे 2019: अॅम्बिशन्स बियॉन्ड ग्रोथ” अहवाल

    ‘आशिया व प्रशांत क्षेत्रासाठीचा संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक व सामाजिक आयोग’ (UNESCAP) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून “सर्व्हे 2019: अॅम्बिशन्स बियॉन्ड ग्रोथ” या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
    अहवालाचे निष्कर्ष
    • आर्थिक अस्थिरता, घरगुती कर्जे, अकार्यक्षम मालमत्ता आणि व्यापार युद्ध यांच्या विकासाला धोका पोहचवू शकते.
    • मलेशिया, थायलँड आणि कोरिया प्रजासत्ताक या देशांवरील घरगुती कर्ज वाढत आहे आणि चीनमध्ये कॉर्पोरेट कर्ज वेगाने वाढत आहे. याचा सर्व दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमांवर विपरीत परिणाम होईल.
    • बिगर-बँकांमार्फत दिल्या जाणार्‍या ऑनलाइन ग्राहक कर्जाच्या उदयाने तारण कर्जाच्या तुलनेत जास्त व्याज दरामुळे नवीन धोका उत्पन्न झाला आहे.
    • पुढे आवश्यक असलेल्या 1.5 लक्ष कोटी डॉलर एवढ्या अतिरिक्त वार्षिक गुंतवणूकीमुळे आशिया-प्रशांत क्षेत्रातल्या देशांना 2030 सालापर्यंत शाश्वत विकास ध्येये (SDGs) साध्य करण्यास मदत होईल.
    शिफारसी
    ध्येये साध्य करण्यासाठी लागणारी गुंतवणूक जाहीर केली आहे. त्यानुसार,
    • मूलभूत मानवी हक्कांना समर्थन देण्यासाठी आणि मानवी क्षमता विकसित करण्यासाठी 669 अब्ज डॉलर लागणार.
    • सर्वांना स्वच्छ ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी 590 अब्ज डॉलर लागणार.
    • वाहतूक, माहिती व दळणवळण तंत्रज्ञान (ICT) आणि जल व स्वच्छता या क्षेत्रांमध्ये 196 अब्ज डॉलर लागणार.
    शाश्वत विकास ध्येये (SDGs) बाबत
    2015 सालासाठी ठरविण्यात आलेली सहस्त्राब्द विकास ध्येये (MDGs) यांपासून 2030 सालासाठी शाश्वत विकास ध्येये (SDGs) विकसित झाली आहेत. 2000 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहस्त्राब्द (मिलेनियम) शिखर परिषदेने ठरविलेल्या 2015 सालासाठीच्या सहस्त्राब्द विकास ध्येये (MDGs) यामध्ये 18 लक्ष्यांसह आठ आंतरराष्ट्रीय विकास ध्येयांची एक सूची होती. हा जगभरातील आव्हानांना सोडविण्यासाठी केला गेलेला प्रथम आणि एकमात्र वैश्विक प्रयत्न होता.
    शाश्वत विकास ध्येये (SDGs) ही 17 ध्येये, 169 लक्ष्ये आणि 306 राष्ट्रीय निर्देशकांची एक सार्वत्रिक सूची आहे, जे मानवी कल्याणासाठी 2030 सालापर्यंत कोणीही विकासाच्या दृष्टीने मागे राहणार नाही या उद्देशाने मोठ्या यशासाठी विकासात्मक कृतींचे नियोजन करण्यास आणि सुव्यवस्थित करण्यासाठी मदत करतात.
    सप्टेंबर 2015 मध्ये झालेल्या ऐतिहासिक संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या शिखर परिषदेत 193 सदस्य राष्ट्रांनी अंगिकारलेल्या आणि दि. 1 जानेवारी 2016 रोजी लागू झालेल्या “ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड: द 2030 एजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट” या पुढाकाराचा एक भाग आहे.
    2030 सालासाठी शाश्वत विकास ध्येये (SDGs)
    • ध्येय 1: दारिद्र्याचे संपूर्ण उच्चाटन
    • ध्येय 2: शून्य उपासमार (उपासमार थांबवणे, अन्न सुरक्षा आणि सुधारित पोषक आहार साध्य करणे आणि शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे)
    • ध्येय 3: सर्वांसाठी निरोगी आरोग्य आणि सर्व वयोगटातील सर्वांसाठी कल्याणाचा प्रचार करणे
    • ध्येय 4: सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण (सर्वसमावेशक आणि न्याय गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी आजीवन शिक्षण संधींचा प्रचार करणे)
    • ध्येय 5: स्त्री-पुरुष समानता (लैंगिक समानता प्राप्त करणे आणि सर्व महिला व मुलींना सशक्त करणे)
    • ध्येय 6: सर्वांसाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छता
    • ध्येय 7: सर्वांसाठी स्वस्त, विश्वासार्ह, शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जा
    • ध्येय 8: सर्वांसाठी सभ्य काम आणि आर्थिक वाढ (सतत, सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक वाढ, पूर्णकाळ आणि उत्पादनक्षम रोजगार तसेच सभ्य कामांना प्रोत्साहन देणे)
    • ध्येय 9: उद्योग, नवकल्पना आणि पायाभूत सुविधा (लवचिक अश्या पायाभूत संरचना तयार करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरणास आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे)
    • ध्येय 10: असमानता कमी करणे (देशांच्या आतमधील आणि देशांदरम्यान असलेली असमानता कमी करणे)
    • ध्येय 11: शाश्वत शहरे आणि मानवी वस्ती
    • ध्येय 12: शाश्वत उपभोग आणि उत्पादन
    • ध्येय 13: हवामानविषयक कार्य (हवामानातील बदल आणि त्यांचे परिणाम टाळण्यासाठी त्वरित कारवाई करणे)
    • ध्येय 14: जलजीवन (शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि सागरी स्त्रोतांचे संवर्धन आणि सातत्यपूर्ण वापर)
    • ध्येय 15: थल जीवन (जमिनीवर पर्यावरणविषयक व्यवस्थेच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन देणे आणि त्यांचे रक्षण आणि पुनर्संचयन करणे, वनांचे शाश्वत व्यवस्थापन करणे, वाळवंटीकरणाशी लढा देणे तसेच भूमी नापीक होण्यास थांबविणे आणि परिस्थितीला उलट करणे आणि जैवविविधतेची हानी थांबविणे.
    • ध्येय 16: शांती, न्याय आणि बळकट संस्था (सर्वांसाठी न्यायपूर्ण व्यवस्था तयार करणे, शाश्वत विकासासाठी शांतीपूर्ण आणि सर्वसमावेशक मानवी समाजांना प्रोत्साहन देणे, सर्व सर्व स्तरांवर प्रभावी, जबाबदार आणि सर्वसमावेशक संस्था तयार करणे.
    • ध्येय 17: ध्येयांसाठी भागीदारी (शाश्वत विकासासाठी वैश्विक भागीदारीची अंमलबजावणी आणि पुनरुत्थान करण्यास उद्देशांना भक्कम करणे.
    UNESCAP बाबत
    ‘आशिया व प्रशांत क्षेत्रासाठीचा संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक व सामाजिक आयोग’ (UN Economic and Social Commission for Asia and the Pacific -UNESCAP) हे आशिया व प्रशांत क्षेत्राच्या विकासासाठी तयार करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रसंघाची एक क्षेत्रीय शाखा आहे. त्याची स्थापना सन 1947 मध्ये केली गेली आणि त्याचे मुख्यालय बँकॉक (थायलँड) येथे आहे.

    कृष्णविवराचे पहिले-वहिले छायाचित्र अनावरीत करण्यात आले

    कृष्णविवर (ब्लॅक होल) ही एक विचित्र खगोलीय घटना आहे. आजपर्यंत कल्पना केल्या जाणार्‍या या घटनेला छायाचित्राच्या स्वरुपात प्रथमच सादर करण्यात आले आहे. छायाचित्र इव्हेंट होरिझन टेलिस्कोप (EHT) या दुर्बिणीच्या मदतीने घेतले गेले.
    आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी ‘सॅगिटेरियस ए’ (Sagittarius A) हे नाव दिलेले सर्वाधिक मोठे कृष्णविवर आहे आणि ते पृथ्वीपासून 26,000 प्रकाशवर्षे दूर आहे. 4 दशलक्ष एवढ्या सूर्याँच्या एकूण वस्तुमानाप्रमाणे ‘सॅगिटेरियस ए’ या कृष्णविवराचे वस्तुमान असल्याचे मानले जाते.
    नवीन निष्कर्षाची भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडलेल्या सामान्य सापेक्षतेच्या सिद्धांताचे परीक्षण करण्यास मदत होणार आहे. गुरुत्वाकर्षणाचे नियम आणि इतर नैसर्गिक शक्तींशी त्यांचे असलेले संबंध समजावून सांगणारा हा सिद्धांत 1915 साली मांडला गेला होता.
    कृष्णविवर म्हणजे काय?
    कृष्णविवर (श्यामविवर, कृष्णगर्त) हा अंतराळाचा एक भाग आहे, ज्याचे गुरुत्वीय क्षेत्र अत्याधिक प्रबळ असल्याचे मानले जाते आणि या क्षेत्रातून काहीही बाहेर पडू शकत नाही, ज्यात प्रकाश यासारख्या विद्युत-चुंबकीय लहरींचाही समावेश आहे.
    इव्हेंट होरिन टेलिस्कोप (EHT)
    इव्हेंट होरिझन टेलिस्कोप (EHT) हे रेडियो टेलिस्कोपांचे एक वैश्विक जाळे आहे. हा प्रकल्प म्हणजे 2012 साली तयार केली गेलेली आंतरराष्ट्रीय भागीदारी आहे. त्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश कृष्णविवराच्या आसपास असलेल्या वातावरणातले तात्काळ बदल थेट निरीक्षणाने टिपून घेणे हा आहे.


    ग्रॅहम रीड: भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक

    ऑस्ट्रेलियाचे ग्रॅहम रीड यांची भारतीय वरिष्ठ पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
    54 वर्षीय ग्रॅहम रीड लवकरच बेंगळूरमध्ये सुरू असलेल्या हॉकी शिबिरात दाखल होणार आहेत. पुढील वर्षीच्या अखेरपर्यंत त्यांच्या प्रशिक्षकपदाची मुदत निश्चित करण्यात आली आहे. अपेक्षित कामगिरी झाल्यास त्यांना 2022 सालाच्या FIH विश्वचषक हॉकी स्पर्धेपर्यंत मुदतवाढ दिली जाऊ शकते.
    संघाला सुमारे चार महिन्यानंतर प्रशिक्षक लाभले आहे. भरतीय हॉकी संघाचे प्रमुख प्रशिक्षकपद गेल्या जानेवारीत हरेंद सिंग यांची हकालपट्टी झाल्यानंतर रिक्त राहिले होते.

    हानीकारक ठरणार्‍या ऑनलाइन सामग्रीवर लक्ष ठेवण्यासाठी ब्रिटनची नवी वॉचडॉग यंत्रणा

    ब्रिटनच्या प्रशासनाने देशातल्या डिजिटल सामाजिक माध्यमांच्या व्यासपीठावर टाकल्या जाणार्‍या व हानीकारक ठरणार्‍या ऑनलाइन सामग्रीवर लक्ष ठेवण्यासाठी नवी वॉचडॉग (देखरेख) यंत्रणा प्रस्थापित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
    नव्या नियमांनुसार, वापरकर्त्यांना हानीकारक सामुग्रीपासून दूर ठेवण्यात अपयशी ठरणार्‍या सामाजिक माध्यम कंपन्या आणि तंत्रज्ञान/इंटरनेट कंपन्यांना मोठा दंड सहन करावा लागू शकतो. 
    आत्महत्येसाठी प्रेरित करणारी आणि उदासिनता वाढविणारी डिजिटल सामुग्री तरुणांना सहज उपलब्ध होत आहे. त्यातच ब्रिटनमधील 14 वर्षीय मुलीने केलेल्या आत्महत्येनंतर या गंभीर मुद्द्याकडे लक्ष दिले जात आहे. जगभरातल्या लोकांमध्ये, विशेषत: तरुणाईमध्ये, ही समस्या वाढीला लागली आहे.


    AIMA पुरस्कार 2019

    ‘वर्षाचा सर्वोत्कृष्ट सार्वजनिक उपक्रम (PSU)’ म्हणून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) या कंपनीला प्रतिष्ठित 'AIMA मॅनिजिंग इंडिया अवॉर्ड 2019' दिला गेला.
    हे पुरस्कार 11 श्रेणींमध्ये दिले गेलेत. यावेळी देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या प्रतिष्ठित उद्योग आणि व्यक्तिमत्वांची निवड केली गेली.
    लक्षात घेण्यासारखे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत –
    • लाइफटाइम कॉन्ट्रीब्यूशन अवॉर्ड - अझीम एच. प्रेमजी (विप्रो लिमिटेडचे ​​अध्यक्ष)
    • एन्त्रेप्रेनेउर ऑफ द इयर - संजीव बजाज (बजाज फिनसर्व लिमिटेडचे MD)
    • बिजनेस लीडर ऑफ द इयर - संजीव मेहता (HULचे ​​अध्यक्ष)
    AIMA बद्दल
    अखिल भारतीय व्यवस्थापन संघ (All India Management Association -AIMA) हे व्यवस्थापन क्षेत्रातल्या व्यवसायिकांचे देशातले सर्वोच्च मंडळ आहे. हे त्याच्या बहुउद्देशीय क्रियाकलापाच्या माध्यमातून व्यवसायातल्या उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. 2010 सालापासून 'AIMA मॅनिजिंग इंडिया अवॉर्ड’ दिला जात आहे.


    करन्सी चेस्ट या व्यवस्थेची स्थापना करण्यासाठी बँकांसाठी RBI ची मार्गदर्शक तत्त्वे

    भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) करन्सी चेस्ट या व्यवस्थेची स्थापना करण्यासाठी बँकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.
    करन्सी चेस्ट म्हणजे काय?
    करन्सी चेस्ट ही एक अशी जागा आहे जिथे भारतीय रिझर्व्ह बॅंक बँकांचा सर्व अतिरिक्त पैसा स्वताःच्या देखरेखीखाली आपल्या ताब्यात ठेवते. जेव्हाही RBI नवीन बँकनोटा छापते, तेव्हा त्या नोटा सर्वप्रथम देशभरातल्या करन्सी चेस्टकडे वितरीत केल्या जातात आणि नंतर तेथून त्या नोटा बँकांना वितरीत केल्या जातात.
    नवी मार्गदर्शक तत्त्वे
    • स्ट्रॉंग रूमसाठी 1,500 चौ. फूट एवढे किमान क्षेत्रफळ असावे. डोंगराळ वा दुर्गम ठिकाणी हे क्षेत्रफळ किमान 600 चौ. फुट असावे.
    • दररोज 6.6 लक्ष बँकनोटा एवढी प्रोसेसिंग क्षमता नवीन चेस्टची असणे आवश्यक आहे. डोंगराळ वा दुर्गम ठिकाणी ही क्षमता दररोज 2.1 लक्ष बँकनोटा एवढी असावी.
    • आधुनिक सुविधा आणि कमीतकमी 1,000 कोटी रुपये एवढ्या चेस्ट बॅलन्स लिमीट (CBL) यांसह मोठ्या आकाराचे करन्सी चेस्ट उघडण्यासाठी सर्वोच्च बँकेनी बँकांना प्रोत्साहित करावे.

    2019 सालासाठी NIRF आणि ARIIA क्रमवारी प्रसिद्ध

    भारतातल्या संस्थांची गुणवत्ता वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी कार्यचौकट-2019’ (NIRF) हे दस्तऐवज तयार करण्यात आले आहे आणि संस्थांना दिलेली क्रमवारी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
    8 एप्रिलला राष्ट्रपतींच्या हस्ते विविध श्रेणीत आठ संस्थांना भारतीय क्रमवारी पुरस्कार दिले गेलेत. ‘IIT मद्रास’ या संस्थेनी NIRF-2019 मध्ये एकूणच सर्व श्रेणींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
    याशिवाय, अटल रॅंकिंग ऑफ इंस्टीट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचीवमेंट्स (ARIIA) ही क्रमवारी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्यात अग्र ठरलेल्या दोन संस्थांना ‘ARIIA पुरस्कार’ देण्यात आला. ARIIA या क्रमवारीमध्ये मिरंडा हाऊस कॉलेज (दिल्ली विद्यापीठ) या संस्थेनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
    • भारतातल्या प्रथम पाच अभियांत्रिकी संस्था– IIT मद्रास, IIT दिल्ली, IIT बॉम्बे, IIT खडगपूर, IIT कानपूर.
    • भारतातली प्रथम पाच विद्यापीठे – IISc बेंगळुरू, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (नवी दिल्ली), बनारस हिंदू विद्यापीठ (वाराणशी), हैदराबाद विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ (कोलकाता).
    • भारतातली प्रथम पाच महाविद्यालये - मिरंडा हाऊस (दिल्ली), हिंदू कॉलेज (दिल्ली), प्रेसीडेंसी कॉलेज (चेन्नई), सेंट स्टीफेन्स कॉलेज (दिल्ली), लेडी श्रीराम कॉलेज फॉर विमेन (नवी दिल्ली).

    No comments:

    Post a Comment