Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, July 17, 2017

    चालूघडामोडी(16 जुलै 2017 )

    Views
    भारत जगज्जेता
    हरजीतसिंगच्या भारतीय ज्युनियर संघाने रविवारी बेल्जियमवर २-१ अशी मात करत ज्युनियर वर्ल्डकप हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. हरजीतसिंगच्या या ज्युनियर शिलेदारांनी यंदा दोनवेळा बेल्जियमला नमवण्याची किमया केली; पण रविवारी बेल्जियमवर मिळवलेला विजय भारतासाठी खासमखास होता; कारण हे यश भारतीय ज्युनियर्सना जगज्जेतेपदाचा मान देऊन गेले. भारताने तब्बल १५ वर्षांनी ज्युनियर वर्ल्डकप पटकावला. गगन अजितसिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय ज्युनियर संघाने २००१मध्ये हा वर्ल्डकप जिंकला होता. भारतीय हॉकी इतिहासातील मोठे अन् महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आलेल्या लखनऊच्या या स्टेडियमवर भारत ज्युनियर हॉकीत पुन्हा जगज्जेता झाला हे विशेष.
    अर्जेंटिना पहिल्यांदाच डेव्हिस चषकाचा मानकरी
    अर्जेंटिनाने रविवारी येथे पहिल्यांदाच डेव्हिस टेनिस चषकावर आपले नाव कोरले. अंतिम लढतीत अर्जेंटिनाने क्रोएशियाचा पराभव केला. या अंतिम लढतीतील परतीच्या शेवटच्या एकेरी सामन्यात अर्जेंटिनाच्या डेल पोट्रोने मनगटाला झालेल्या दुखापतीवर मात करत क्रोएशियाच्या मॅरीन सिलीकचा 6-7 (4-7), 2-6, 7-5, 6-4, 6-3 असा पराभव केला.
    या लढतीतील शेवटचा परतीचा एकेरी सामना निर्णायक ठरला. या सामन्यापूर्वी दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत होते. पण पोट्रोने शेवटचा एकेरी सामना जिंकून क्रोएशियाचे आव्हान 3-2 अशा फरकाने संपुष्टात आणले. या विजयानंतर अर्जेंटिनाच्या टेनिसपटूंनी डेव्हिस चषकासह मैदानावर विजयी जल्लोष केला.
    इस्रोची विक्रमी झेप; १०४ उपग्रहांसह PSLV अवकाशी
    विक्रमाची नवनवी शिखरं सर करणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) आज इतिहास रचला आहे. तब्बल १०४ उपग्रहांना घेऊन ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक पीएसएलव्ही सी ३७ ने आज सकाळी बरोब्बर ९.२८ वाजता अवकाशात झेप घेतली आणि इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. अमेरिका, रशिया या अंतराळ संशोधनातील दिग्गजांनाही जे जमलं नव्हतं, ते भारतानं करून दाखवलं.
    इस्रोच्या ‘पीएसएलव्ही सी ३७’च्या उड्डाणाकडे जगाचं लक्ष लागलं होतं. एकाच उड्डाणात १०० हून अधिक उपग्रह वाहून नेण्याचं महाकठीण आव्हान इस्रोचे शास्त्रज्ञ पेलणार का, याबद्दल सगळ्यांना उत्सुकता होती. सकाळपासून सगळ्यांच्या नजरा श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावर खिळल्या होत्या. धावपळ, धडधड वाढत होती. अन् अखेर कालपासून सुरू झालेली उलटगणती ९.२८ वाजता संपली आणि ‘पीएसएलव्ही सी ३७’ने निर्विघ्नपणे अवकाशात उड्डाण केलं.
    एकाच उड्डाणातून अधिकाधिक उपग्रह वाहून नेल्यास प्रत्येक उपग्रहामागील उड्डाणाचा खर्च अत्यंत कमी होतो. स्वाभाविकच, तसा प्रयत्न रशिया, अमेरिकेनं करून पाहिला होता. परंतु, एका उड्डाणात ३७ उपग्रहांपेक्षा अधिक उपग्रह अवकाशात पाठवणं कुणालाच जमलं नव्हतं. २०१४ मध्ये रशियानं ही किमया केली होती. अमेरिकेला एका वेळी २९ उपग्रह अवकाशात पाठवणं जमलं होतं. पण भारतानं - इस्रोनं १०४ उपग्रह एकाच वेळी अवकाशात पाठवण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच केला आणि त्यात ते यशस्वीही झाले आहेत.
    पीएसएलव्ही सी-३७ मधून अवकाशात पोहोचलेल्या १०४ उपग्रहांपैकी कार्टोसॅट-२ सह तीन उपग्रह भारताचे आहेत, तर उर्वरित १०१ उपग्रह अन्य देशांचे आहेत. त्यात एकट्या अमेरिकेचे ८८ उपग्रह असून जर्मनी, इस्रायल, कझाकिस्तान, यूएई, नेदरलँड, स्वित्झर्लंडनंही इस्रोवर विश्वास दाखवून आपले उपग्रह अवकाशात पाठवले आहेत..
    भारताच्या तीन उपग्रहांचं एकूण वजन ७६८ किलो आहे तर उरलेल्या उपग्रहांचं एकूण वजन ६०० किलो आहे. हे सगळे उपग्रह एकमेकांना न धडकता पृथ्वीच्या कक्षेत स्थापन करण्याचं आव्हान इस्रोच्या शास्त्रज्ञांपुढे होतं. ते त्यांनी समर्थपणे पेललं असून त्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
    अवकाश क्षेत्रातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतील खासगी कंपन्या आपले उपग्रह नासा किंवा अमेरिकी कंपन्यांऐवजी ‘इस्रो’च्या माध्यमातून प्रक्षेपित करणे किफायतशीर समजत आहेत, यातच येत्या काळात भारतासाठी उपलब्ध होणाऱ्या व्यावसायिक संधीची झलक दिसून येते.
    यापूर्वी एकाच वेळी सर्वाधिक उपग्रह पाठविण्याचा विक्रम रशियाच्या नावावर आहे, त्यांनी एकाच प्रक्षेपकातून 37 उपग्रह पाठविले होते. भारताने 2015 मध्ये 23 उपग्रह यशस्वीरीत्या पाठविले होते, परंतु आजची झेप ही सर्वांत मोठी होती. 104 उपग्रहांच्या यशस्वी उड्डाणासह भारताने नवा इतिहास रचला. इस्त्रोने या मोहिमेसाठी एक्सएल श्रेणीतील सर्वांत ताकदवान प्रक्षेपक वापरला. यापूर्वी तो चंद्रयान या मोहिमेसाठी वापरण्यात आला होता. या उपग्रहातील 101 उपग्रह हे प्रवासी असून त्यात अमेरिकेच्या 96 उपग्रहांसह इस्त्राईल कझाकस्तान, नेदरलॅण्ड, स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिराती या इस्त्रोच्या पाच आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या पाच उपग्रहांचाही समावेश आहे.
    इराणचा ‘डॉक्टर’ चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट!
    भारताच्या 47 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (आंचिम) स्पर्धेत रेझा मीटकरीमी दिग्दर्शित इराणी चित्रपट ‘डॉक्टर’ला उत्कृष्ट चित्रपट म्हणून सुवर्ण मयूर व रु. 40 लाख असा सर्वात मोठा पुरस्कार प्राप्त झाला. काल सोमवारी पणजीत झालेल्या समारोपाच्या रटाळ कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही याच चित्रपटातील फरहाद असलानी या अभिनेत्याला प्राप्त झाला. लॅटिव्हियन चित्रपटाची नायिका एलिना व्हस्का हिला ‘मेलो मड’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार रोख रु. 10 लाख आणि रजत मयूर प्राप्त झाला आहे.
    केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री हर्षवर्धनसिंह राठोड, राज्यपाल मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, बाहुबली या तेलगू चित्रपटाचे निर्माते एस. राजमौली हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
    तुर्कस्थानला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार
    तुर्कस्तानच्या ‘रौफ’ या चित्रपटाचे दिग्दर्शक बारिस काया यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक प्राप्त झाले. बारिस काया आणि निर्माता सोनेट जनेट यांना रु. 15 लाख आणि रजत मयूर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. परीक्षकांच्या उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दक्षिण कोरियाच्या ‘द य्रोन’ या ली जॉन ईफ दिग्दर्शित सिनेमाला देण्यात आला. रजत मयूर आणि रु. 15 लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
    स्पॅनिश ‘रारा’ चित्रपट पदार्पणातील सर्वोत्कृष्ट
    पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी शताब्दी पुरस्कार हा ‘रारा’ या अर्जेंटीनाच्या पेपासॅन मार्टिन यांच्या स्पॅनिश चित्रपटाला बहाल करण्यात आला. रजत मयूर व रु. 10 लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. चित्रपटांचे परीक्षक मंडळ इव्हान पासेर यांच्या अध्यक्षतेखाली असून त्यात लॅरी स्मिथ, लॉर्डन झॅफ्रोनॅव्हिक, नागेश कुकनूर आणि लैला किलानी यांचा समावेश होता.
    या महोत्सवाच्या निमित्ताने आयसीफटीयुनेस्को गांधी पुरस्कारही देण्यात आले. तुर्कस्तानचे निर्माते मुस्तफा कारा यांच्या ‘कोल्ड ऑफ कालंदर’ या चित्रपटाला हा पुरस्कार देण्यात आला. ‘द अपॉलॉजी’ या चित्रपटाला विशेष उल्लेखनीय पुरस्कार देण्यात आला.

    भारत - चीनचे लष्कर दहशतवादाविरोधात एकत्र
    पुणे - दहशतवादाला विरोध करण्यासाठी भारतीय लष्कर आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी एकत्र आल्याचा संदेश बुधवारी संपूर्ण जगाला मिळाला. दक्षिण आशियातील शांतता, स्थैर्य आणि समृद्धी यासाठी हे दोन बलाढ्य विकसनशील देश लष्कराच्या संयुक्त सरावासाठी एकत्र आल्याचा विश्वास दोन्ही लष्कराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला .
    भारतीय लष्कर आणि पीपल्स लिबरेशन आर्मी यांच्यातील "हॅंड इन हॅंड ' या सहाव्या संयुक्त सरावाला आजपासून पुण्यात सुरवात झाली . हा संयुक्त लष्करी
    सराव सुरू झाल्याचे पीपल्स लिबरेशन आर्मीचे मेजर जनरल वांग हायजिआंग यांनी सांगितले . भारतीय लष्कराचे मेजर जनरल योगेशकुमार जोशी या वेळी उपस्थित होते . निमशहरी भागात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात संयुक्त नियोजन करणे आणि त्याला चोख प्रत्युत्तर देणे हा या संयुक्त लष्करी सरावाचा मुख्य उद्देश असल्याचे दोन्ही लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले .