Current affairs | Evening News MarathiCurrent affairs 5 September 2020 Marathi 5 सप्टेंबर मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
‘BIMSTEC सनद’ला अंतिम स्वरूप प्राप्त झाले
BIMSTEC (बहुउद्देशीय तांत्रिक व आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम) यांच्या स्थापनेनंतर 23 वर्षांनंतर ‘BIMSTEC सनद’ याला अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे.
2 सप्टेंबर 2020 रोजी श्रीलंका देशाच्या अध्यक्षतेखाली BIMSTEC गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंबंधी घोषणा करण्यात आली. भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व परराष्ट्र सचिव (पूर्व) विजय ठाकूर सिंग यांनी केले.
BIMSTEC विषयी
BIMSTEC (बहुउद्देशीय तांत्रिक व आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम / Bay of Bengal Initiative for Multi Sectoral Technological and Economic Cooperation) हा एक प्रादेशिक आर्थिक गट आहे. BIMSTEC समूह दिनांक 6 जून 1997 रोजी अस्तित्वात आला. त्याचे कायमस्वरूपी सचिवालय ढाका (बांग्लादेश) येथे आहे.
या समूहात बंगालच्या उपसागरालगतच्या दक्षिण आशियातल्या भारत, बांगलादेश, भुटान, नेपाळ, श्रीलंका तसेच आग्नेय आशियातल्या म्यानमार आणि थायलँड या सात देशांचा समावेश आहे.
राष्ट्रीय शिक्षक दिन: 5 सप्टेंबर
1962 सालापासून दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी ‘राष्ट्रीय शिक्षक दिन’ साजरा केला जातो. शिक्षणतज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती ‘शिक्षक दिन’ म्हणून पाळला जातो.
यावर्षीच्या शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आभासी पद्धतीने संपन्न झालेल्या पहिल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात देशभरातल्या 47 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांपैकी जवळपास 40 टक्के विजेत्या महिला आहेत.
शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग करून शिक्षक देत असलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यातून सर्वांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देवून गौरविण्यात येते.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन एक उत्कृष्ट शिक्षक आणि मुत्सद्दी राजकारणी होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला. भारतरत्न (1954) प्राप्तकर्ता डॉ. राधाकृष्णन हे भारताचे पहिले उप-राष्ट्रपती (1952-62) आणि दुसरे राष्ट्रपती (1962-67) होते. डॉ. एस. राधाकृष्णन यांनी देशाच्या विकासासाठी भरीव काम केलेले आहे.
No comments:
Post a Comment