Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, February 28, 2018

    २८ फेब्रुवारी दिनविशेष

    Views


    चंद्रशेखर वेंकट रामन - (७ नोव्हेंबर १८८८ - २१ नोव्हेंबर १९७०) चंद्रशेखर वेंकट रामन हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) याशोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक ‘चंद्रशेखर वेंकट रामन’ यांना मिळाले होते. चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठवला होता.


    जागतिक दिवस


    • राष्ट्रीय विज्ञान दिवस.

    ठळक घटना/घडामोडी


    • १७८४: जॉन वेस्लीने मेथोडिस्ट चर्चची स्थापना केली.
    • १८४९: अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू. न्यूयॉर्कहून निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सान फ्रांसिस्कोला पोचले.
    • १८५४: रिपन, विस्कॉन्सिन येथे अमेरिकन रिपब्लिकन पार्टीची स्थापना.
    • १८६१: कॉलोराडोला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा प्रदेश म्हणून मान्यता.
    • १८९७: फ्रांसच्या सैन्याने मादागास्करची राणी रानाव्हलोना तिसरी हिला पदच्युत केले.
    • १९२२: इजिप्तला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य.
    • १९३१: डॉ. सी. व्ही. रमण यांना त्यांच्या विकेंद्रीकरणाबद्दलच्या (रामन परिणाम) संशोधनासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले.
    • १९३५: वॉलेस केरोथर्सने नायलॉनचा शोध लावला.
    • १९४७: तैवानमध्ये आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार. शेकडो व्यक्ति ठार.
    • १९७५: लंडनमध्ये भुयारी रेल्वेला अपघात. ४३ ठार.
    • १९८६: स्वीडनच्या पंतप्रधान ओलोफ पाल्मेची हत्या.
    • १९८७: राष्ट्रीय विज्ञान दिन.
    • १९९३: वेको, टेक्सास येथील ब्रांच डेव्हिडयन धर्माच्या वसाहतीवर पोलिसांची धाड. ५ ठार.
    • २००१: अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.८ तीव्रतेचा भूकंप.
    • २००२: गुजरातमध्ये जातीय दंगली. ५५ मृत्यू.

    जन्म/वाढदिवस


    • १९२६: स्वेतलाना अलिलुयेवा, जोसेफ स्टालिनची मुलगी.
    • १९३५: क्लाइव्ह हाल्से, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
    • १९४६: ग्रॅहाम व्हिवियन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
    • १९४७: दिग्विजय सिंघ, भारतातील मध्यप्रदेश राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चे नेते.
    • १९४७: विजय बहुगुणा, भारतातील उत्तराखंड राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
    • १९५१: करसन घावरी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
    • १९६९: यू. श्रीनिवास, मेंडोलिन वादक, सप्टेंबर १३ २००३ रोजी त्यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला.
    • १९७१: परमजीत सिंघ, भारतीय खेळाडू, यांनी ४०० मीटर शर्यतीचा ३८ वर्षांचा मिल्खा सिंघ चा राष्ट्रीय रेकॉर्ड मोडला.
    • १९७५: अझहर महमूद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
    • १९७८: राणा नवेद-उल-हसन, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
    • १९७८: यासिर हमीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

    मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


    • १५२५: क्वाह्टेमॉक, ऍझटेक सम्राट.
    • १६४८: क्रिस्चियन चौथा, डेन्मार्कचा राजा.
    • १८६९: आल्फोन्स द लामार्टीन, फ्रेंच कवी, लेखक, राजकारणी.
    • १९२५: फ्रिडरिश एबर्ट, जर्मनीचा चान्सेलर.
    • १९३६: कमला नेहरू, जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी.
    • १९४१: आल्फोन्सो तेरावा, स्पेनचा राजा.
    • १९६३: डॉ. राजेंद्र प्रसाद, भारताचे प्रथम राष्ट्रपती.
    • १९७९: पाउल आल्वेर्डेस, जर्मन कवी, लेखक.
    • १९८६: ओलोफ पाल्मे, स्वीडनचा पंतप्रधान.
    • २००३: फिदेल सांचेझ हर्नान्देझ, एल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष.
    • २००६: ओवेन चेंबरलेन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

    No comments:

    Post a Comment