UNDP कडून ‘मानव विकास अहवाल 2016’ जाहीर
संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) कडून “ह्यूमन डेवलपमेंट फॉर प्रोग्राम” या शीर्षकाखाली मानव विकास अहवाल 2016 जाहीर करण्यात आला आहे. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम मध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. अहवालाचे प्रमुख लेखक आणि ह्यूमन डेवलपमेंट रीपोर्ट ऑफिसचे संचालक सेलीम जहान हे आहेत.
मानव विकास सांखिक भाषेत स्पष्ट करण्यासाठी मानव विकास निर्देशांक (Human Development Index -HDI) यासाठी 188 देशांचे मूल्यांकन केले गेले आहे.
HDI नुसार: प्रथम पाच देशांमध्ये नॉर्वे, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि डेन्मार्क हे आहेत. तर शेवटच्या पाच देशांमध्ये बुरुंडी (184), बुर्किना फासो (185), चड (186), नायजर (187) आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक (188) हे आहेत.
मानव विकास निर्देशांक (HDI) म्हणजे
दीर्घकालीन आणि निरोगी आयुष्य, ज्ञानार्जनास प्रवेश आणि रहाणीमानातील सभ्य मानदंड या मानव विकासाच्या तीन मूलभूत आयामामधील प्रगतीच्या मूल्यांकनासाठी असलेले सारांश मोजमाप होय.
अहवालाच्या मुख्य बाबी
25 वर्षापासून दिसून आलेली मानव विकासामधील प्रभावी प्रगतीने अनेक लोकांना अगणित, पद्धतशीरपणे आणि भरून काढता न येण्याजोगे मागे सोडून दिले आहे.
महिला, धर्म आधारित अल्पसंख्याक आणि दुर्गम भागात राहणार्या लोक यांना प्रतिबंध केल्याने तीव्र अडथळे तयार झाले आहेत, त्यामुळे मानवी विकास प्रगती अवरोधीत झाली आहे आणि आशिया व प्रशांत महासागरीय प्रदेशात लक्षणीय तफावत निर्माण झाली आहे.
सर्वांच्या शाश्वत मानव विकासाची खात्री करण्यासाठी प्रतिबंध केलेल्या गटांवर लक्ष केंद्रित करणे आणि या अडथळ्यांना दूर करण्यासाठी कृती करणे यांची तातडीने आवश्यकता आहे.
जरी सन 1990 ते सन 2015 या काळात सर्व प्रदेशांमध्ये सरासरी मानव विकासामध्ये लक्षणीय सुधारणा झाली असली तरीही जगभरातील 1.5 अब्ज लोक बहूआयामी (जसे की आरोग्य, शिक्षण, जीवनमान) गरिबी परिस्थितीत जीवन जगत आहेत.
आशिया आणि प्रशांत महासागराच्या प्रदेशातील प्रगती प्रत्येकाला फायदा देणारी नाही आहे.
सन 1990 आणि सन 2013 या काळात गरिबीत भरपूर कमतरता आली असूनही म्हणजेच दक्षिण आशियातील दिवसाला $ 1.90 पेक्षा कमी उत्पन्न घेणार्यांच्या प्रमाणात घट होऊन ते 45% वरुन 15% वर आले असूनही, बहूआयामी गरीबी निर्देशांकानुसार, दक्षिण आशियात जगातील बहूआयामी गरीबीच्या जवळपास 54% लोक राहतात.
दक्षिण आशियात 38% सह जगात कुपोषण (पाच वर्षांखालील बालकांमध्ये तीव्र किंवा मध्यम प्रमाण) उच्चतम पातळीवर आहे.
जागतिक स्तरावर दक्षिण आशियात GDP चा वाटा म्हणून सर्वात कमी (1.6%, 2014) सार्वजनिक आरोग्यावरील खर्च आहे.
सर्व विकसनशील प्रदेशांमध्ये, अरब राज्ये प्रदेशानंतर आशिया-प्रशांत महासागर प्रदेशात सर्वाधिक लिंग आधारित विषमता आढळून येते.
जगभरात पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या बाबतीत सातत्याने सरासरी पेक्षा कमी मानव विकास निर्देशांक (HDI) गुण दिसून येत आहे. दक्षिण आशियामध्ये सर्वाधिक विषमता आढळून येत आहे, जेथे महिला HDI गुण पुरुषांच्या गुणांच्या तुलनेत 20% इतके कमी आहे.
दक्षिण आशियात महिलांचा उद्योजकता आणि कामगार शक्ती यामधील सहभाग कमी असल्याने अंदाजे 19% चे उत्पन्नात नुकसान होते.
अहवालात भारत
UN निवासी समन्वयक व भारतामधील UNDP निवासी प्रतिनिधी युरी एफनासिएव यांच्या माहितीनुसार, सन 1990 आणि सन 2015 या काळात भारताची मानव विकास निर्देशांक गुणांमधील वाखाण्याजोग्या प्रगतीमध्ये सुमारे अर्ध्याने वाढ झाली आहे.
कौशल्य भारत, डिजिटल भारत, मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या राष्ट्रीय विकास कार्यक्रमांचे यश हे मानव विकासामधील तफावत भरून काढण्याच्या उद्देशाने होते, जे की अजेंडा 2030 चे यश सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ही कार्यक्रमे आणि दीर्घ काळापासून कार्यरत कृती उपाययोजना या मानव विकासामधील तूट ओळखण्यासाठी आणि शोधण्यासाठी तसेच शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यास कार्य करण्यासाठी सरकारची बांधिलकी स्पष्ट करते.
भारतात सार्वजनिक आरोग्यावरील खर्च हा GDP च्या 1.4% एवढा आहे. तरीही भारताने सन 1990 आणि सन 2015 या काळात जन्माच्या वेळी आयुर्मान 10.4 वर्षापर्यंत वाढते केले आहे. बाल कुपोषण जवळजवळ 10% ने कमी झाले आहे.
HDI मध्ये, भारत 0.624 गुणासह 188 देशांमध्ये 131 व्या स्थानी आहे आणि SAARC देशांमध्ये श्रीलंका आणि मालदीव यांच्या मागे तिसर्या स्थानावर आहे. यामुळे भारत मध्यम मानव विकास वर्गातील देशात आला आहे.
BRICS देशांमध्ये HDI गुणामध्ये चीन (48%) नंतर भारताचा क्रमांक लागतो.
भारताची HDI (1990-2015) मधील वार्षिक सरासरी वाढ इतर मध्यम HD देशांपेक्षा जास्त आहे.

No comments:
Post a Comment