Current affairs | Evening News Marathi
Current affairs 22 July 2020 Marathi |
22 जुलै मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
दक्षिण-पश्चिम भागातल्या व्यापारी व मासेमारी करणाऱ्या जहाजांसाठी वेगवेगळी जलमार्ग यंत्रणा
भारत सरकारच्या नौवहन मंत्रालयाने दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) भारतीय जलमार्गातील व्यापारी व मासेमारी करणाऱ्या जहाजांचे कार्यान्वित मार्ग वेगळे केले आहेत. नवीन मार्ग 1 ऑगस्ट 2020 पासून कार्यान्वित होतील.
भारताच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्याभोवती असलेला अरबी समुद्र हा एक व्यस्त समुद्री मार्ग असून या ठिकाणी मोठ्या संख्येने व्यापारी जहाजे ये-जा करीत असतात तसेच मासेमारी करणारी जहाजे देखील काम करीत असतात. यामुळे काहीवेळा अपघात घडतात; परिणामी जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान आणि पर्यावरणीय प्रदूषण होते.
ठळक बाबी
- जलवाहतूकीची सुरक्षा व कार्यक्षमता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
- धडक होण्यापासून बचाव, समुद्रावरील जीवनाच्या सुरक्षेसह वाहतूकीचा प्रवाह सुलभ करणे, तसेच सागरी वातावरणाचे संरक्षण वाढविणे, या बाबी देखील यामुळे सुनिश्चित होणार.
- नौवहन महासंचलनालयाचे हे एक अतिशय सक्रिय व सकारात्मक पाऊल आहे, जे या प्रदेशातील नौवहनाचे कार्यक्षमतेने नियमन करणार आहे.
‘ध्रुवास्त्र’: नवे स्वदेशी क्षेपणास्त्र
भारताने नव्या ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी निर्मित म्हणजेच मेड इन इंडिया आहे. हे क्विक रिस्पॉन्स देणारे क्षेपणास्त्र आहे.
'ध्रुवास्त्र' क्षेपणास्त्राची चाचणी ओडीशाच्या बालासोर चाचणी क्षेत्रात घेण्यात आली. ही चाचणी हेलिकॉप्टर-विना घेण्यात आली.
ठळक वैशिष्ट्ये
- ध्रुवास्त्र क्षेपणास्त्राचा वापर भारतीय भुदलाकडील ध्रुव हेलिकॉप्टरसोबत तसेच भूमीवरून केला जाऊ शकतो.
- या क्षेपणास्त्राचा मारा पल्ला चार किलोमीटर ते सात किलोमीटर पर्यंत आहे.
- हे स्वयंचलितपणे मार्गक्रम करणारे म्हणजेच गाइडेड रणगाडा-भेदी क्षेपणास्त्र आहे. हे तिसऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र आहे.
- या क्षेपणास्त्राची लांबी 1.9 मीटर आहे आणि व्यास 0.16 मीटर आहे. त्याचे वजन 45 किलोग्रॅम आहे.
- हे क्षेपणास्त्र 240 मीटर / सेकंद या गतीने प्रवास करू शकते.
संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) यांनी तयार केलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव आधी ‘नाग’ असे होते; जे नंतर बदलण्यात आले. हेलिकॉप्टरमार्फत सोडल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या आवृत्तीला “हेलीकॉप्टर-लॉंच्ड NAG (HELINA / हेलीना)” असे नाव देण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment