Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, July 23, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 23 July 2020 Marathi | 23 जुलै मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 23 July 2020  Marathi |
       23 जुलै  मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स


    75 वर्षांत प्रथमच आभासी पद्धतिने संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) भरणार

    कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, 75 वर्षांच्या इतिहासात प्रथमच आभासी पद्धतिने संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) आयोजित केली जाणार आहे.
    सत्रासाठी सदस्य राष्ट्रांचे प्रमुख त्यांचे पूर्व-रेकॉर्ड केलेले भाषण संघटनेकडे पाठवतील, जे सभेदरम्यान चालवले जाणार आहेत. सभेला 21 सप्टेंबर 2020 पासून सुरुवात होणार आहे.
    संयुक्त राष्ट्रसंघ (UN)  विषयी
    आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.
    • 1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे.
    • संघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.
    • संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे.
    • UN च्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे.
    • संयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.
    • संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्वात प्रमुख अधिकारी पद ‘सरचिटणीस’ (Secretary‑General) हे असून वर्तमानात हे पद पोर्तुगालचे अँटोनियो गुटेरे यांच्याकडे आहे.
    संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत -
    • UN महासभा (General Assembly)
    • UN सुरक्षा परिषद (Security Council)
    • UN आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council ­ECOSOC)
    • UN सचिवालय
    • UN आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) आणि
    • UN विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).
    संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत -
    • जागतिक बँक समूह
    • जागतिक आरोग्य संघटना (WHO)
    • जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Program)
    • संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization –UNESCO)
    • संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund –UNICEF)

    अरुण कुमार: आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या सुरक्षा विभागाचे नवे उपाध्यक्ष

    रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक असलेले अरुण कुमार यांची पॅरिस येथे मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या (UIC) सुरक्षा विभागाचे उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. UICच्या 96व्या महासभेच्या वेळी हा निर्णय घेण्यात आला.
    ही नियुक्ती दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी झाली आहे म्हणजेच जुलै 2022 ते जुलै 2024 पर्यंत ते पदावर असणार.
    आंतरराष्ट्रीय रेल्वे संघ (UIC) विषयी
    आंतरराष्ट्रीय रेल्वे संघ (UIC) याची स्थापना 1922 साली झाली आणि त्याचे मुख्यालय फ्रान्स देशाची राजधानी पॅरिस या शहरात आहे. संघाची उद्दिष्टे तीन स्तरांनुसार परिभाषित केली गेली आहेत; ते आहेत –धोरणात्मक, तांत्रिक/व्यवसायिक आणि समर्थन सेवा.
    वर्तमानात इटलीचे जियान्लुइगी कॅस्टेली संघाचे अध्यक्ष आहेत आणि फ्रान्सिओस डेवेन्न महासंचालक आहेत.
    UIC संघाचा सुरक्षा विभाग रेल्वे क्षेत्रातली मालमत्ता, स्थापना आणि सुरक्षा यांच्या संबंधित सर्व बाबींसाठी विश्लेषण आणि धोरणे निश्चित करते आणि ते विकसित करण्याचे अधिकार ठेवतो. या व्यासपीठाद्वारे सदस्यांमध्ये माहितीची आणि अनुभवांची देवाणघेवाण होते आणि सुरक्षेला प्रोत्साहन दिले जाते.

    No comments:

    Post a Comment