Current affairs | Evening News Marathi
Current affairs 13 July 2020 Marathi |
13 जुलै मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
संधिवाताची तीव्रता कमी करण्यासाठी INST संस्थेच्या वैज्ञानिकांनी अतिसूक्ष्म कण तयार केले
मोहाली (पंजाब) येथील भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्या (INST) वैज्ञानिकांनी चिटोसनसह अतिसूक्ष्म कण (नॅनो पार्टिकल्स) तयार केले आणि संधिवाताची तीव्रता कमी करण्यासाठी या कणाला झिंक ग्लुकोनेटसहीत भारित केले.
संशोधनाविषयी
हाडांची सामान्य स्थिती कायम राखण्यासाठी जस्ताच्या (झिंक) योग्य प्रमाणाची आवश्यकता असते. संधिवाताच्या रुग्णांमध्ये आणि संधिवात-प्रेरित प्राण्यांमध्ये त्याची पातळी कमी झाल्याची नोंद आहे. झिंक ग्लुकोनेटच्या रूपात जस्ताच्या पूरक मात्रेची जैव उपलब्धता मानवांमध्ये खूप कमी आहे हे देखील तितकेच खरे आहे.
चिटोसन हे क्रॉस्टेसियन्सच्या बाह्य कंकालातून प्राप्त केलेल्या बहुतेक बायोपॉलिमरांपैकी एक म्हणजे जैव अनुरूप, जैव विघटनशील नैसर्गिक पॉलिसेकेराइड असून शोषण प्रोत्साहन वैशिष्ट्ये दर्शविते.
वैज्ञानिकांनी विशेषतः चिटोसन निवडले आहे कारण ते जैव विघटनशील, जैव अनुरूप, बिन विषारी आणि नैसर्गिकरीत्या म्यूकोएडेसिव्ह आहे. यापूर्वी 'मॅग्नेशियम रिसर्च' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, उंदरांवर याचा प्रयोग केल्यावर झिंक ऑक्साईडच्या प्रमाणित स्वरुपातील सीरम झिंक पातळीत किंचित वाढ झाली, तर नॅनो स्वरूपात सीरम झिंकच्या पातळीत जास्त वाढ झाली परिणामी जस्ताची जैवउपलब्धता वाढली. यामुळे झिंक ग्लुकोनेट नॅनो स्वरूपात विकसित करण्यासाठी नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान संस्थेच्या चमूला प्रेरणा मिळाली.
वैज्ञानिकांच्या चमूने जैव रासायनिक विश्लेषण, सुक्षमदर्शकीय निरीक्षणे आणि सूज आल्यासारखी लक्षणे यासारख्या विविध बाबींचे मूल्यांकन केले आणि झिंक ग्लुकोनेट-भारित चिटोसन नॅनो कणांद्वारे झिंक ग्लूकोनेटच्या मुक्त स्वरूपाच्या तुलनेत उत्कृष्ट उपचारात्मक प्रभाव शोधण्याचे सुचविले. झिंक ग्लुकोनेट-भारित चिटोसन नॅनो कणांच्या सूज येण्याच्या गुणधर्मामुळे ते या निष्कर्षाप्रत येऊ शकले.
NTPC कंपनीने ‘CII-ITC शाश्वतता पुरस्कार 2019’ पटकावला
NTPC मर्यादीत (पूर्वीचे राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ) या सार्वजनिक कंपनीने प्रतिष्ठित ‘CII-ITC शाश्वतता पुरस्कार 2019’ पटकावला आहे. कॉर्पोरेट उत्कृष्टता श्रेणीत उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
‘CII-ITC शाश्वतता पुरस्कार’ हा शाश्वत उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रदान केला जातो. देशातील शाश्वतता ओळखण्यासाठी हे सर्वात विश्वासार्ह व्यासपीठ मानले जाते.
इतर ठळक बाबी
- NTPC मर्यादीत (पूर्वीचे राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ) ही ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेले केंद्रीय सार्वजनिक उपक्रम आणि भारतातली सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी आहे.
- NTPC कंपनीचा पथदर्शी CSR कार्यक्रम असलेला GEM (मुलगी सशक्तीकरण अभियान) हा वंचित वर्गातील शालेय मुलींच्या सर्वांगीण विकासाला पाठिंबा देण्यासाठी चालत आहे, ज्याच्या अंतर्गत वीज केंद्र परिसरात चार आठवड्यांचा निवासी कार्यक्रम आयोजित केला जातो.
- NTPCने कंत्राटदारांची कामगार माहिती व्यवस्थापन प्रणाली (CLIMS) देखील अंमलात आणली असून त्याद्वारे कंत्राटी मजुरांना महिना अखेरीस प्रकल्प सुरु असलेल्या ठिकाणीच वेतन दिले जाते.
- NTPCची एकूण स्थापित क्षमता 62110 मेगावॅट असून NTPC समूहाकडे 24 कोळसा ऊर्जा केंद्रांसह 70 ऊर्जा केंद्र, 7 एकात्मिक नैसर्गिक वायू / द्रव इंधन, 1 जलविद्युत, 13 नवीकरणीय व 25 सहाय्यक आणि संयुक्त उपक्रम ऊर्जा केंद्र आहेत.
No comments:
Post a Comment