Current affairs | Evening News Marathi
Current affairs 14 July 2020 Marathi |
14 जुलै मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
महामार्ग संरचना दर्जेदार करण्यासाठी NHAI देशातल्या अव्वल तंत्र संस्थांशी भागीदारी करणार
जागतिक दर्जाचे महामार्ग जाळे तयार करण्यासाठीच्या प्रयत्नाचा भाग म्हणून, देशातल्या सर्व भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) आणि नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्याशी सहयोग करीत जवळचा राष्ट्रीय महामार्ग पट्टा स्वेच्छेने, संस्थात्मक सामाजिक दायित्व म्हणून स्वीकारावा, यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) त्यांच्याशी संपर्क केला आहे.
विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या प्रतिभेचा देशातल्या रस्ते संरचना सुधारण्यासाठी लाभ व्हावा, हा यामागचा उद्देश आहे. विद्यार्थी, प्राध्यापक यासह संस्थाना स्थानिक आवश्यकता, भौगोलिक रचना, संसाधने क्षमता याविषयी उत्तम जाण असते आणि याचाच NHAI रस्ते बांधकाम करण्यापूर्वी, बांधकाम करण्यासाठी अशा विविध टप्प्यात उपयोग करू इच्छिते.
संस्थेनी पट्ट्याचे दायित्व स्वीकारल्याने वाहतूक कोंडी, अपघात प्रवण स्थळे तातडीने जाणणे, यासह स्थानिक समस्या दूर करण्यासाठी मदत होणार आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि अधिकारी यांच्यामार्फत स्थानिक समस्या दूर करण्यासाठी अधिक सक्षम बनणार आहेत. यामुळे NHAIला सध्याच्या आणि भविष्यातल्या प्रकल्पांसाठी स्थानिक गरजा जाणून घ्यायला, देखभाल सुधारायला आणि प्रवास सुखकर करायला, तसेच महामार्गालगत सुविधा विकसित करायला मदत होणार आहे. तसेच यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रवाश्यांना अनुकूल आणि आनंददायी प्रवास अनुभवता येणार.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) विषयी
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे. हे भारतात 1,15,000 कि.मी.पैकी एकूण 50,000 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांचे जाळे निर्माण करण्यासाठी जबाबदार आहे. संस्थेची स्थापना 1988 साली झाली. हे केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते.
गुगल कंपनी भारतात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
13 जुलै 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले सुंदर पिचाई यांच्याशी संवाद साधला.
येत्या 5 ते 7 वर्षांत गुगल कंपनी भारतात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा सुंदर पिचाई यांनी केली. ते ‘गुगल फॉर इंडिया डिजिटलायझेशन फंड’ या ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होते.
प्रत्येक भारतीयाला स्वभाषेत माहिती प्राप्त होणे, भारताच्या विशिष्ट गरजांप्रमाणे वस्तू आणि सेवा विकसित करणे, डिजिटल बदलांना आत्मसात करणाऱ्या उद्योगांना मदत तसेच कल्याणकारी योजनांमध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर या चार क्षेत्रांसाठी ही गुंतवणूक वापरली जाणार.
बंगळुरु शहरातली कृत्रिम बुद्धीमत्ता संशोधन प्रयोगशाळा, पुराचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा तसेच कोविड-19 विषयी अचूक आणि विश्वसनीय माहिती देणाऱ्या यंत्रणेविषयी देखील यावेळी उल्लेख केला गेला.
No comments:
Post a Comment