Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, June 9, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 9 June 2020 Marathi | 9 जून मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 9 June 2020  Marathi |
       9 जून  मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स


    पृष्ठभाग विषाणूरहित करण्यासाठी ARCI आणि मेकीन्स या संस्थांनी तयार केलेले UVC आधारित निर्जंतुकीकरण कपाट

    भारत सरकाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे स्वायत्त संशोधन व विकास केंद्र असलेले आंतरराष्ट्रीय चूर्ण धातुशास्त्र आणि नवीन सामग्री प्रगत संशोधन केंद्र (ARCI) येथील संशोधकांनी हैदराबादची मेकीन्स या कंपनीच्या सहकार्याने कोविड-19 विषाणूमुळे होणारा पृष्ठभागांवरील दुषितपणा टाळण्यासाठी रुग्णालयातल्या अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तू, प्रयोगशाळेमधील पोशाख आणि संशोधन प्रयोगशाळांमधील PPEच्या निर्जंतुकीकरणासाठी UV-C किरणांवर आधारित असलेले निर्जंतुकीकरण कपाट” तयार केले आहे.
    दैनंदिन संपर्कामुळे वापरात आलेल्या वस्तूंवर विषाणू सहजपणे आढळतात, जे पुढे शरीराच्या संपर्कात आल्याने त्यांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. अश्या परिस्थितीत वस्तूंचे निर्जंतुकीकरण होणे अत्यावश्यक असते. त्यामुळे हा शोध महत्वाचा ठरणार आहे.
    याचा वापर व्यवसायिक आस्थापनांमध्ये आणि बऱ्याच देशांतर्गत वस्तूंमध्ये ग्राहकांना दाखविलेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
    254 nm (नॅनोमीटर) एवढी तरंगलांबी असलेली UV-C प्रकाशकिरणे विषाणूसाठी धोकादायक असतात आणि ते निष्क्रिय होतात, असे एका संशोधनात आढळून आले आहे.


    जागतिक महासागर दि: 8 जून

    दरवर्षी 8 जून हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक महासागर दिन’ म्हणून पाळला जातो. यावर्षी हा दिवस “इनोव्हेशन फॉर ए सस्टेनेबल ओशन" या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे. 
    महासागर आपल्या ग्रहाचे फुफ्फुस आहेत, जो आपण श्वास घेतो तो बहुतेक ऑक्सिजन प्रदान करतो. यावर्षीच्या संकल्पनेमधून शाश्वत महासागराची मानवी जीवनासाठी असलेली आवश्यकता आणि त्यासाठी नवतंत्रज्ञानाची गरज स्पष्ट करण्यात आलेली आहे
    यावर्षीच्या कार्यक्रमांमध्ये तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, स्त्रोतांचे व्यवस्थापन, ग्राहक उत्पादने, वित्त आणि वैज्ञानिक शोध यासारख्या विभागांमध्ये नवकल्पनांचा शोध घेणे आणि ते कशा प्रकारे वापरासाठी आकाराला येऊ शकतात याची रूपरेषा तयार करण्यात आली.
    पार्श्वभूमी
    2008 सालापासून संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविले. हा दिवस 2002 सालापासून UNESCO च्या इंटरगवर्नमेंटल ओशनोग्राफीक कमिशन (IOC) यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात येतो.
    जगभरातल्या महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे महासागरांचे जतन आणि नैसर्गिकदृष्ट्या त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी जनजागृती करणे यामागे हेतू आहे.

    No comments:

    Post a Comment