Current affairs | Evening News Marathi
Current affairs 10 June 2020 Marathi |
10 जून मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण वाहिन्यांवरुन प्रसारित करण्यासंदर्भात NCERT आणि रोटरी इंडिया यांच्यात सामंजस्य करार
ई-शिक्षणाची प्रक्रिया अधिक विधायक आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद (NCERT) आणि रोटरी इंडिया या संस्थेच्यामध्ये डिजिटल माध्यमातून एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी NCERT टीव्ही वाहिन्यांवरून अभ्यासक्रम प्रसारित करण्याबाबतचा हा करार आहे. हे प्रसारण जुलै 2020 पासून उपलब्ध असणार आहे.
कोविड-19 महामारीच्या काळात घरात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास विनाअडथळा चालू राहावा या उद्देशाने रोटरी इंडीया ह्यूमेनीटी फाउंडेशन आणि NCERT यांनी एकत्र येत मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या करारामुळे NCERTचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम ई-शिक्षण मार्फत देशभरातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. ‘विद्यादान-2.0’ या अभियानाच्या अंतर्गत, रोटरी इंटरनॅशनल NCERTला पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषेतल्या अभ्यासक्रमाचा मजकूर पूरवणार आहे.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते जम्मू येथील CAT खंडपीठाचे उद्घाटन
कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (CAT) याच्या 18 व्या खंडपीठाचे उद्घाटन केले गेले. केवळ सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या बाबींसाठी जम्मूच्या कॅट खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होणार.
प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या तक्रारी आणि सेवेच्या बाबतीत जलद दिलासा मिळू शकणार आहे. जवळपास 30,000 प्रलंबित प्रकरणांचा कालबद्ध आणि न्याय्य पद्धतीने निपटारा केला जाण्याचे अपेक्षित आहे.
No comments:
Post a Comment