Current affairs | Evening News Marathi
Current affairs 8 June 2020 Marathi |
8 जून मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
AI आधारित तर्कशास्त्रीय गणन करून मुखाच्या कर्करोगाचे शक्यता वर्तवणारे साधन IASST संस्थेत विकसित
गुवाहाटी या शहरातल्या इन्स्टिट्यूट ऑफ अँडव्हान्स्ड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IASST) या स्वायत्त संस्थेच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुध्दीमत्तेच्या आधारे (AI) तर्कशास्त्रीय गणन करून मुखाच्या कर्करोगाचे (ओरल स्क्वँमस सेल कार्सिनोमा) निदान आणि शक्यता वर्तवणारे साधन (tool) तयार केले आहे.
ठळक बाबी
- डॉ. लिपी बी. महंता यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या चमूने तयार केलेल्या या संगणकीय आराखड्याच्या सहाय्याने मुखाच्या कर्करोगाची प्रतवारी देखील करता येणे शक्य झाले आहे.
- मुखाच्या कर्करोगाबाबत देशातली स्थिती सांगणारा हा एकमेव माहितीसंच तयार करण्यात आला आहे.
- वर्गीकरणाचा प्रश्न सोडविण्यासाठी आधीच तयार केलेल्या अंलेक्सनेट, VGG 16, VGG 19, रेसनेट-50 या चार कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पद्धतींपैकी, प्रस्तावित CNN तंत्रासाठी योग्य असणारे मॉडेल निवडले गेले. वर्गीकरणाच्या बाबतीत रेसनेट-50 या मॉडेलने 92.15 टक्के इतका अचूकपणा दाखवला असला तरी प्रस्तावित CNN प्रारुपाने कमालीचे यशस्वी काम करत 97.5 टक्के इतकी अचूकता दाखविली.
- पेशींच्या सारखेपणामुळे ह्या कर्करोगातील पेशींचे वर्गीकरण करून त्याची प्रतवारी करणे पेशीविकृतीतज्ञांना देखील कठीण असते. कृत्रिम बुध्दीमत्तेच्या तंत्रज्ञानातील विकासामुळे संगणकाच्या आधारे डिजीटल प्रतिमा तयार करणे सहज साध्य झाले असून याचाच उपयोग करून कर्करोगावर वेळेवर, विविध प्रकारची गुणकारी उपाययोजना करणे शक्य झाले असून त्यामुळे पॅथॉलॉजिस्ट यांच्यावरील भार कमी होऊन या रोगाचा मुकाबला करता येणार आहे.
कर्करोगाच्या सर्व प्रकारापैकी मुखाच्या कर्करोगाचे पुरुषांमधील प्रमाण 16.1 टक्के तर महिलांमध्ये 10.4 टक्के इतके असून ईशान्य भारतात हे प्रमाण लक्षणीय आहे. सुपारी आणि तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाच्या पोकळीतील भागांत कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे.
2020 एनव्हिरोंमेंटल पेरफॉर्मन्स इंडेक्स (EPI)
पर्यावरणाची स्थिती सुधारण्यासाठी जगभरातल्या देशांच्या सरकारांकडून घेतल्या गेलेल्या पुढाकारांचा आढावा घेणारा ‘2020 एनव्हिरोंमेंटल पेरफॉर्मन्स इंडेक्स (EPI)’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच 32 निर्देशकांचा वापर करून 180 देशांना त्यांच्या कामगिरीनुसार क्रमांक देण्यात आला आहे. हा अहवाल येल आणि कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी तयार केला आहे.
भारत 27.6 एवढ्या गुणांसह 168 व्या क्रमांकावर आहे.
ठळक बाबी
- डेन्मार्क हा देश या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ अनुक्रमे लक्झेमबर्ग, स्वित्झर्लंड, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिनलँड, स्वीडन, नॉर्वे आणि जर्मनी या देशांच्या प्रथम दहामध्ये समावेश आहे.
- तर यादीत तळाशी अफगाणिस्तान, म्यानमार यांच्यानंतर शेवटी लाइबेरिया 180 व्या क्रमांकावर आहे.
- हवेची गुणवत्ता आणि पर्यावरणविषयक इतर धोके यामुळे आरोग्यविषयक खालावलेले परिणाम मिळविणारा भारत क्रमवारीच्या तळाशी आला आहे.
- हवेची गुणवत्ता, आधुनिक स्वच्छता आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी दीर्घ काळापासून वचनबद्धता दर्शविल्यामुळे डेन्मार्क पर्यावरणविषयक आरोग्याच्या जवळजवळ प्रत्येक निर्देशांकांमध्ये उत्कृष्ट आहे.
- मासेमारीचे प्रमाणही कमी झाले असून हा व्यवसाय आज जागतिक अडचणीत आहे. याचा विपरीत प्रभाव बहरीन, अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये नोंदवला गेला आहे.
- इंडोनेशिया, मलेशिया आणि कंबोडिया या सारख्या देशांमध्ये गेल्या पाच वर्षांत अत्याधिक जंगलतोड झाली आहे.
No comments:
Post a Comment