Current affairs | Evening News Marathi
Current affairs 20 May 2020 Marathi |
20 मे मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाने जाहीर केली नवीन स्टार रेटेड शहरे
19 मे 2020 रोजी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या कचरामुक्त शहरांच्या नव्या यादीमध्ये नवी मुंबई सोबतच सूरत (गुजरात), राजकोट (गुजरात), इंदूर (मध्यप्रदेश), म्हैसूर (कर्नाटक) आणि अंबिकापूर (छत्तीसगड) या पांच शहरांना फाईव्ह स्टार रेटिंग देण्यात आले आहे. वर्ष 2020 च्या सर्वेक्षणानुसार, 6 शहरांना फाईव्ह स्टार रेटिंग, 65 शहरांना थ्री स्टार रेटिंग तर 70 शहरांना वन स्टार रेटिंग दिले गेले आहे.
शहरांना कचरामुक्त दर्जा मिळवून देण्यासाठी आणि शहरे अधिकाधिक स्वच्छ बनण्यास प्रवृत्त करण्याच्या दिशेने संस्थात्मक यंत्रणा तयार करण्यासाठी मंत्रालयाने जानेवारी 2018 मध्ये स्टार रेटिंग प्रोटोकॉल कार्यक्रम राबविण्याला सुरूवात केली होती.
भारतीय रेल्वेने बनवले 12000 अश्वशक्तीचे सर्वात शक्तिशाली इंजिन
बिहारमधल्या मधेपुरा इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह प्रायवेट लिमिटेड (MELPL) या कारखान्यात 12000 अश्वशक्ती क्षमता असलेल्या भारताच्या पहिल्या स्वदेशी रेल्वे इंजिनची निर्मिती करण्यात आली आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शनवरून या इंजिनाचे 18 मे 2020 रोजी पहिल्यांदा व्यवसायिक पातळीवर यशस्वी संचालन करण्यात आले.
या निर्मितीनंतर स्वदेशामध्ये उच्च अश्वशक्तिच्या इंजिनाची निर्मिती करणाऱ्या सहा प्रतिष्ठित देशांच्या समूहामध्ये आता भारतही सहभागी झाला आहे. तसेच संपूर्ण जगामध्ये पहिल्यांदाच ब्रॉड गेज रेल्वे लाइनवर उच्च अश्वशक्तीच्या इंजिनाचे संचालन भारताने केले आहे.
या इंजिनाला ‘WAG12 क्रमांक 60027’ असे नाव आणि नंबर देण्यात आला आहे. या मालवाहू गाडीला एकूण 118 वाघिणी जोडण्यात आल्या होत्या. या अश्वशक्ती इंजिनामुळे मालवाहू गाड्यांचा सरासरी वेग वाढणार आहे. त्याचबरोबर देशभरामध्ये पहिल्यापेक्षा अधिक वेगाने, सुरक्षित आणि मोठ्या वजनी मालगाड्यांची वाहतूक होवू शकणार आहे आणि त्यामुळे अत्याधिक वापर होणाऱ्या रेल्वे रूळांवर होणारी गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment