Current affairs | Evening News Marathi
Current affairs 19 May 2020 Marathi |
19 मे मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
डॉ. हर्ष वर्धन 73व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी
18 मे 2020 रोजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन नवी दिल्ली येथे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 73 व्या जागतिक आरोग्य परिषदेत सहभागी झाले. 73 वी परिषद ही पहिलीच आभासी आरोग्य परिषद आहे.
कोविड-19 महामारीमुळे यंदा केवळ दोन दिवसांची जागतिक आरोग्य परिषद आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन 18 मे 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्यालयी म्हणजेच जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे झाले.
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी परिषदेत उद्घाटनपर भाषण केले. जागतिक आरोग्य परिषदेच्या अध्यक्षस्थानी बहामास देशाच्या केवा बेन ह्या होत्या. परिषदेचा मुख्य विषय कोविड-19 महामारीवर केंद्रित आहे.
पहिली जागतिक आरोग्य परिषद (WHA) वर्ष 1948 मध्ये भरविण्यात आली होती. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्यालयी म्हणजेच जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासंदर्भात शेकटकर समितीच्या शिफारशी लागू
सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या संदर्भातल्या लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. बी. शेकटकर यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समितीच्या तीन महत्वपूर्ण शिफारशी सरकारने स्वीकारल्या आहेत आणि त्यांची अंमलबजावणी केली आहे.
या शिफारशी भारताच्या सीमावर्ती भागात रस्ते बांधणीला गती प्रदान करण्याच्या संदर्भातल्या होत्या ज्यामुळे या भागात सामाजिक-आर्थिक विकास होत आहे.
- सीमावर्ती भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या संदर्भात सरकारने सीमा रस्ते संघटनेच्या (BRO) सर्वोच्च क्षमतेपेक्षा अधिक रस्ते निर्मितीच्या बांधकामाचे कंत्राट बाहेरील कंपनीला देण्याबाबतच्या तज्ञ समितीच्या शिफारसीची सरकारने अंमलबजावणी केली आहे.
- 100 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या सर्व कामांच्या अंमलबजावणीसाठी अभियांत्रिकी खरेदी करार (EPC) पद्धतीचा अवलंब करणे बंधनकारक करण्यात आले आहे. EPC पद्धतीचा अवलंब केल्यानंतर केवळ 90 टक्के कायदेशीर मंजुरी प्राप्त झाल्यानंतरच काम देणे बंधनकारक आहे.
- देशांतर्गत आणि परदेशी खरेदीसाठी BRO याला 7.5 कोटी रुपयांवरून 100 कोटी रुपयांपर्यंत वर्धित अधिकार प्रदान करून आधुनिक बांधकाम संयंत्र, उपकरणे आणि यंत्रसामग्री संबंधित इतर शिफारसी अंमलात आणण्यात आल्या आहेत.
अचूक सुरुंगासाठी ब्लास्टिंग तंत्रज्ञान, मातीच्या स्थिरीकरणासाठी जिओ-टेक्सटाईलचा वापर, रस्त्यावर लादी बसविण्यासाठी सिमेंटचा वापर करणे, रस्त्याच्या पृष्ठभागासाठी प्लास्टिकचे लेपित एकत्रीकरण यासारख्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग बांधकामाची गती वाढविण्यासाठी केला जात आहे.
No comments:
Post a Comment