Current affairs | Evening News MarathiCurrent affairs 23 September Marathi | 23 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी
ISB हैदराबाद आशियात सर्वोत्तम: फोर्ब्सचे “बेस्ट इंटरनॅशनल MBAs: वन-ईयर प्रोग्राम्स 2019”
फोर्ब्स या संस्थेनी “बेस्ट इंटरनॅशनल MBAs: वन-ईयर प्रोग्राम्स 2019” या शीर्षकाखाली एक वर्षांच्या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या बाबतीत जागतिक पातळीवरच्या सर्वोत्तम संस्थांची एका यादी प्रसिद्ध केली आहे. फोर्ब्सने यादी तयार करण्याकरिता 5 वर्षांचा MBA (मास्टर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन) अभ्यासक्रम चालविणार्या 100 हून अधिक संस्थांचे सर्वेक्षण केले आहे.
या क्रमवारीतेमध्ये इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस (ISB) हैदराबाद (तेलंगणा) हे आशियातले प्रथम क्रमांकाचे तर जागतिक पातळीवर सातव्या क्रमांकाचे आहे. ISB हैदराबाद येथे असलेला पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेंट (PGP) हा अभ्यासक्रम सध्या “फायनान्शियल टाइम्स ग्लोबल MBA रँकिंग 2019”नुसार जगभरात 24 व्या क्रमांकावर आहे.
यादीतल्या शीर्ष 5 संस्था
इंटरनेशनल इंस्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD), लॉसेन, स्वित्झर्लंड
इनसीड, फॉनटेनब्लियू (फ्रान्स), सिंगापूर
जज बिझिनेस स्कूल, केंब्रिज, ब्रिटन
SDA बोकोनी स्कूल ऑफ मॅनेजमेंट, मिलान, इटली
सेड बिझिनेस स्कूल, ऑक्सफोर्ड, ब्रिटन
नवे “राष्ट्रीय ई-मूल्यमापन केंद्र” दिल्लीत उभारले जाणार
पुढील महिन्यापासून प्राप्तिकरदात्यासाठी कोणतीही ओळख लक्षात न घेता मूल्यांकनाची पद्धत सादर करण्याच्या हेतूने केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून दिल्लीत “राष्ट्रीय ई-मूल्यमापन केंद्र” (NeAC) उभारण्यात येणार आहे.
प्राप्तिकर विभागासाठी धोरणे निश्चित करणार्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) या केंद्राच्या निर्मितीचा आदेश दिला आहे.
केंद्राची संरचना व कार्ये
हे ई-मूल्यमापनाचे विशेष काम पाहणारे एक स्वतंत्र कार्यालय म्हणून कार्य करणार. ई-मूल्यमापन योजना 8 ऑक्टोबरपासून देशात राबविण्यात येणार आहे.
केंद्रामध्ये 16 अधिकारी असणार आणि एक प्रमुख म्हणून प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त (PCCIT) हे पद असणार.
भारतीय महसूल सेवा अधिकारी के. एम. प्रसाद ह्यांची नव्या केंद्राच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर आशिष अबरोल ह्यांची उपप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे.
केंद्र मूल्यमापन करण्यासाठी एखाद्याच्या प्रकरणाच्या निवडीसंबंधी मुद्द्यांचा उल्लेख करणारी सूचना त्या व्यक्तीला देणार आणि सूचनेनंतर 15 दिवसांच्या आत त्यांच्याकडून येणार्या प्रतिसादानंतर केंद्र ते प्रकरण स्वयंचलित यंत्रणेच्यामध्यमातून मूल्यमापन करणार्या अधिकार्याकडे सोपविणार.
या योजनेच्या अंतर्गत होणार्या कोणत्याही कार्यवाहीच्या संबंधित कोणत्याही व्यक्तीस वैयक्तिकरित्या किंवा अधिकृत प्रतिनिधीद्वारे राष्ट्रीय ई-मूल्यमापन केंद्र किंवा प्रादेशिक ई-मूल्यमापन केंद्र किंवा या योजनेच्या अंतर्गत असलेल्या अन्य कोणत्याही केंद्रामधल्या प्राप्तिकर अधिकार्यासमोर उपस्थित राहण्याची आवश्यकता नसणार.
No comments:
Post a Comment