Current affairs | Evening News Marathi
Current affairs 15 September Marathi |
15 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी
नवे ‘वैज्ञानिक सामाजिक उत्तरदायित्व’ (SSR) धोरण
भारत सरकारने ‘वैज्ञानिक सामाजिक उत्तरदायित्व’ (SSR) धोरणाचा मसुदा तयार केला आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) याच्या धर्तीवर या प्रकाराचे धोरण तयार करणारा भारत हा जगातला पहिला देश ठरणार आहे.
देशातल्या वैज्ञानिक व तंत्रज्ञान संस्था तसेच स्वतः शास्त्रज्ञांना विज्ञानाच्या प्रसाराच्या कार्यात सक्रियपणे सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. विज्ञानाला समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी असा पुढाकार घेतला जात आहे.
प्रस्तावित धोरणाच्या अंतर्गत -
- शास्त्रज्ञ किंवा तज्ञ लोक समाजाला त्यांच्याकडचे ज्ञान देण्याकरीता व्यक्तीशाः दरवर्षी कमीतकमी 10 दिवस समाजासाठी समर्पित करण्याची गरज आहे.
- हे आवश्यक अर्थसंकल्पीय समर्थनाने पोहोच नसलेल्या क्रियाकलापांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता ओळखते.
- तज्ञ लोक / शास्त्रज्ञांना त्यांच्या वार्षिक कामगिरीचे मूल्यांकनाच्या आधारे SSR अंतर्गत चालू असलेल्या त्यांच्या वैयक्तिक क्रियाकलापांसाठी वित्तपुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे.
- कोणत्याही संस्थेस त्यांच्या SSR अंतर्गत चालणारे उपक्रम आणि प्रकल्पांसाठी बाहेरून मदत घेण्याची परवानगी नाही.
- देशात SSR धोरण लागू करण्यासाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागात (DST) एका केंद्रीय मंडळाची स्थापना केली जाणार. अन्य मंत्रालयांनाही त्यांच्या आदेशाखाली SSR धोरण लागू करण्याविषयीची स्वतःची योजना तयार करण्यास प्रोत्साहित केले जाणार.
- धोरणाच्या अंमलबजावणीसाठी एक राष्ट्रीय डिजिटल व्यासपीठ विकसित केले जाणार, ज्यामधून वैज्ञानिकदृष्ट्या हस्तक्षेपाची आवश्यकता असलेल्या सामाजिक गरजांची पूर्तता करणे तसेच उपक्रमांची प्रगती व कार्यांची नोंद ठेवली जाणार.
हे धोरण पूर्वीच्या धोरणांच्या (जसे की वैज्ञानिक धोरण ठराव-1958, तंत्रज्ञान धोरण विधान-1983, विज्ञान व तंत्रज्ञान धोरण-2003, आणि विज्ञान तंत्रज्ञान व नवकल्पना धोरण-2013) परंपरेनुसार बनविले गेले आहे.
हिंदी दिन 2019: 14 सप्टेंबर
हिंदी दिवस दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी हिंदी भाषेत कविता, निबंध लेखन इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या जातात. या दिवसाचा मुख्य हेतू म्हणजे लोकांना त्यांच्या राष्ट्र आणि मातृभाषाबद्दल जागरूक करणे होय.
हिंदी ही एक इंडो-आर्यन भाषा आहे. 2011च्या जनगणनेनुसार मातृभाषा म्हणून हिंदी वापरणारे भारतात 43.6 टक्के भाषिक आहेत. भाषेमध्ये अवधी, ब्रज आणि खडी बोली यासारखे देखील इतर प्रकार आहेत.
इतिहास
14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदी भाषेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या दिवशी हिंदी भाषेला ‘राजभाषा’ बनविण्यात आले. राजभाषा हिंदी आणि लिपी देवनागरी राहणार असा एकमताने निर्णय घेण्यात आला.
14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला भारताची राजभाषा बनविण्याच्या दिशेनी अतिमहत्त्वपूर्ण योगदान देणारे साहित्यकार व्यौहार राजेन्द्र सिंह यांच्या 50व्या जयंतीनिमित्त हे निर्णय घेण्यात आले. भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 अन्वये देवनागरी लिपीमध्ये लिहिलेल्या हिंदीला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले गेले.
हिंदी दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे लोकांना हिंदी भाषेबद्दल जागरूक करणे. हिंदी दिनानिमित्त सर्व हिंदी माध्यमिक शाळांमध्ये हिंदी भाषेत कविता, निबंध इ. लिहिण्याविषयी स्पर्धा आयोजित केल्या जातात. या दिवशी हिंदी दिवस का साजरा केला जातो आणि हिंदी दिवसाचे महत्त्व आणि हिंदी भाषा जाणून घेण्याचे महत्त्व समजावून घेतल्या जाते. या दिवशी हिंदी भाषेत वादविवाद, चर्चा इत्यादी गोष्टी होतात.
राजभाषा सप्ताह किंवा हिन्दी सप्ताह हा हिंदी दिवसापासून एका आठवड्यासाठी 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या आठवड्यात वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. हा कार्यक्रम शाळा आणि कार्यालय या दोन्ही ठिकाणी आयोजित केला जातो. या सात दिवसांत हिंदी भाषेच्या विकासाबद्दल आणि निबंध लेखनाद्वारे त्याचा उपयोग करण्याचे फायदे आणि तोटे इत्यादी बद्दल लोकांना स्पष्ट केले जाते.
हिंदी दिवसाच्या दिवशी अनेक प्रकारचे पुरस्काराचे वितरण केले जाते. लोकांना हिंदी भाषेकडे आकर्षित करणे हा यामागील हेतू आहे. या दिवशी राजभाषा गौरव पुरस्कार आणि राजभाषा कीर्ति पुरस्कार दिले जातात.
No comments:
Post a Comment