Current affairs | Evening News Marathi
Current affairs 4 April 2019 Marathi |
4 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
भारत, टर्की विरुद्ध युरोपीय संघाने WTO कडे तक्रार दाखल केली
युरोपीय संघाने (EU) भारत आणि टर्की यांच्या चुकीच्या व्यापारी धोरणांच्या विरुद्ध जागतिक व्यापार संघटना (WTO) याकडे तक्रार दाखल केली आहे.माहिती तंत्रज्ञान उत्पादनांवर लादलेले आयात शुल्क याबाबत भारताविरुद्ध तर औषधीनिर्मात्यांना प्रभावित करणार्या उपायांवरून टर्कीविरुद्ध दोन WTO तंटा प्रस्ताव सादर केले आहेत.
दोन्ही देशांच्या धोरणांमुळे युरोपीय संघाच्या निर्यातीला वर्षाला एकूण 1 अब्ज युरोपेक्षा अधिकचा भुर्दंड बसत आहे.
जागतिक व्यापार संघटना (WTO)
ही आंतरसरकारी संघटना आहे, जी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करते. याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे आणि याचे 164 देश सभासद आहेत. 1948 साली लागू झालेल्या दर व व्यापार संदर्भात सर्वसाधारण करार (General Agreement on Tariffs and Trade -GATT) याला बदली करून 15 एप्रिल 1994 रोजी 123 राष्ट्रांनी स्वीकारलेल्या मार्राकेश कराराच्या अंतर्गत WTO अधिकृतपणे 1 जानेवारी 1995 रोजी कार्यरत झाले. WTO वाटाघाटी करता येणार्या व्यापार करारासाठी कार्यचौकट प्रदान करून सहभागी देशांमध्ये व्यापाराचे नियमन करते तसेच सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सह्या केलेल्या आणि त्यांच्या संसदेने मान्य केलेल्या WTO कराराप्रती सहभागींची निष्ठा वाढविण्यासाठीच्या उद्देशाने तंटा निवारण प्रक्रिया हाताळते.
युरोपीय संघ (EU) हा 28 सदस्य राज्यांचा राजकीय आणि आर्थिक संघ आहे, जे प्रामुख्याने युरोप खंडात आहेत. युरोपीय संघाची स्थापना 1 नोव्हेंबर 1993 रोजी झाली आणि याचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे आहे.
सर्वोच्च न्यायालयाने कर्जाच्या वसूलीसंबंधी RBIचे परिपत्रक रद्द केले
ठराविक काळामध्ये कंपन्यांवरील बुडीत कर्जाची वसूली करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) दिनांक 12 फेब्रुवारी 2019 रोजी काढलेले परिपत्रक सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे.परिपत्रकानुसार 180 दिवसांच्या आत 2,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी त्यासंबंधीची योजना कर्जदारांना प्रदान करणे आहे. निर्देशानुसार, एकूण 12 प्रकरणांची नोंद आहे, जे एकूण कर्जाच्या 25% भाग ठेवतात.
RBI विषयी
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनी त्याच्या कार्यपद्धती संदर्भात शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्रॉब्लेम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतले.
RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उप गव्हर्नर नियुक्त केले जातात. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.
अमेरिका भारताला 24 ‘MH-60R’ हेलिकॉप्टर्सची विक्री करणार
अमेरिकेनी भारताला 24 ‘MH-60R’ हेलीकॉप्टरांची विक्री करण्याविषयीचा प्रस्ताव मान्य केला आहे. हे हेलीकॉप्टर जमिनीवर मारा करण्याची आणि पाणबुडीचा वेध घेण्याची क्षमता ठेवते.अमेरिकेची ‘लॉकहीड मार्टिन’ या हेलीकॉप्टर तयार करणार्या कंपनीच्या माध्यमातून हा सौदा केला जात आहे. $ 2.6 अब्ज किंमतीचा हा प्रस्ताव आहे.
भारत-अमेरिका संरक्षण संबंध
संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशांमधील संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने, 2016 साली अमेरिकेनी भारताला त्याचा ‘मेजर डिफेन्स पार्टनर’ (MDP) हा दर्जा प्रदान केला. तसेच 2018 साली भारताला अमेरिकेचा ‘स्ट्रॅटेजिक ट्रेड ऑथरायझेशन-1’ (STA-1) दर्जा दिला गेला, ज्यामुळे हा दर्जा प्राप्त करणारा भारत हा दक्षिण कोरिया आणि जपान नंतर तिसरा आशियाई देश ठरला.
शिवाय संरक्षण क्षेत्रात सुरक्षित संपर्क यंत्रणेसाठी लागणारी उपकरणे पुरविण्यासाठी भारताशी अमेरिकेचा ‘कम्युनिकेशन्स कॉम्पॅटिबिलिटी अँड सेक्युरिटी अग्रिमेंट (COMCASA) हा करार झाला.
संयुक्त राज्ये अमेरिका (USA/US/अमेरिका) हा उत्तर अमेरिका उपखंडातला एक देश आहे. वॉशिंग्टन डी.सी. हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि यूएस डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.
राजकीय पक्षांची शेकडो खाती फेसबुक कंपनीने बंद केली
फेसबुक कंपनीने असमाधानात्मक वर्तन दिसून आल्याने भाजप, कॉंग्रेस अश्या भारतातल्या राजकीय पक्षांशी संबंधित असलेली 702 खाती, पृष्ठे व गट यांच्यावर बंदी आणून त्यांचे खाती बंद केली आहेत.दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीवर असलेल्या लोकसभा निवडणूक-2019 याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही मर्यादेशिवाय सामाजिक माध्यमांवर गैरपद्धतीने प्रकाशित होणार्या सामग्रीबाबत वाढत्या चिंतेवर उपाययोजना म्हणून अमेरिकेत मुख्यालय असलेल्या या कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
चीनमध्ये जगात प्रथमच 5G नेटवर्कची चाचणी घेतली
चीनचा शांघाय हा 5G नेटवर्कचे क्षेत्र आणि ब्रॉडबँड गिगाबिट नेटवर्क याबाबतची जगातली पहिली चाचणी घेणारा जिल्हा बनला आहे.पुढील पिढीचे सेल्युलर मोबाईल दळणवळण व्यवस्था विकसित करण्याविषयी जगभरात प्रयत्न केले जात आहे. 5G हे 4G LTE नेटवर्कपेक्षा 10 ते 100 पट अधिक वेगवान डाउनलोड स्पीडसह चालते.
त्यासाठी ‘हुवाई मेट X’ हा जगातला पहिला 5G AI फोन सादर करण्यात आला आहे. त्यावरून पहिला 5G व्हिडिओ कॉल केला गेला.
5G नेटवर्क
5G तंत्रज्ञानात डेटा स्पीड हा 100 गीगाबाईट्स प्रति सेकंद यावर पोहोचलेला असेल. यासोबतच डेटाची देवानघेवान अत्यंत गतीमान होऊन फोनवर इंटरनेट ऑफ थिग्ज (IoT) ही सुविधाही मिळू शकेल.
5G तंत्रज्ञानात एक ते दोन गीगाहर्ट्झ चॅनल बॅन्ड विड्थचा वापर केलेला अॅंटेना विकसीत केला जाईल, जो वर्तमानात 4G साठी 20 मेगाहर्ट्झचा आहे.
No comments:
Post a Comment