Current affairs | Evening News Marathi
Current affairs 15 April 2019 Marathi |
15 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
भारतात सुमारे 6 लक्ष डॉक्टर आणि 20 लक्ष परिचारिकांची कमतरता
अमेरिकेतल्या ‘सेंटर फॉर डिसीसेज डायनामिक्स, इकॉनॉमिक्स अॅण्ड पॉलिसी (CDDEP) या संस्थेच्या अहवालानुसार, भारतात सुमारे 6 लक्ष डॉक्टर आणि 20 लक्ष परिचारिकांची कमतरता आहे. भारतामध्ये 10,189 व्यक्तींमागे एक सरकारी डॉक्टरचे प्रमाण आहे, तर जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या शिफारसीप्रमाणे एक हजार व्यक्तींमागे एक डॉक्टर उपलब्ध असणे गरजेचे आहे. या शिफारसीनुसार भारतात 6 लक्ष डॉक्टरांची कमतरता आहे. शिवाय शिफारसीनुसार, 483 व्यक्तींमागे एक परिचारिका उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यानुसार भारतात 30 लक्ष परिचारिकांची कमतरता आहे.
डॉ. आंबेडकर यांची 128 वी जयंती साजरी
14 एप्रिलला भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती भारतात आणि जगभरात विविध ठिकाणी साजरी झाली. दिनांक 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातल्या महू या गावी डॉ. आंबेडकरांचा जन्म झाला. समाजात भेदभावाला दूर करुन त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित केला.
हजार F-1 मोटार शर्यती जिंकण्याचा लेविस हॅमिल्टनचा विक्रम
शांघाय (चीन) येथे झालेल्या ‘2019 चायनीज ग्रँड प्रिक्स’ या फॉर्म्युला वन मोटार शर्यतीचे विजेतेपद मॅसिडीस संघाचा चालक लेविस हॅमिल्टनने पटकाविले आहे. हे त्याचे हजारावे जेतेपद आहे. हॅमिल्टनने F-1 शर्यतीत नवा विक्रम केला असून त्याने या क्षेत्रात आतापर्यंत 1000 शर्यती जिंकल्या आहेत.
UNESCO/गुईलर्मो कानो प्रेस फ्रीडम पारितोषिक 2019
म्यानमारमध्ये सध्या सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असणार्या दोन पत्रकारांना यंदाचा ‘UNESCO/गुईलर्मो कानो प्रेस फ्रीडम पारितोषिक’ जाहीर झाला आहे. वा लोन आणि क्याव सोए ऊ यांना हा पुरस्कार दिला जाणार. ते म्यानमारमधील राखीन राज्यामध्ये म्यानमार सैनिकांचा अत्याचार आणि त्यांनी केलेल्या मानवी हक्कांचे उल्लंघन याबाबत कथांवर काम करीत होते.
पाणथळ जागांच्या संरक्षणार्थ CMFRI आणि ISRO यांच्यात सामंजस्य करार
केंद्रीय सागरी मत्स्यपालन संशोधन संस्था (CMFRI) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे. सागरी किनारपट्टीच्या प्रदेशामधील लहान पाणथळ जागेच्या संरक्षणासाठी त्या क्षेत्राचा नकाशा तयार करणे, त्याचे क्षेत्र निश्चित करणे आणि विविध किनारी उपजीविका कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या क्षेत्राचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा करार केला गेला आहे. संशोधनाच्या माध्यमातून पाणथळ प्रदेशाचे संवर्धन केले जाणार.
रशियाने पंतप्रधान मोदी ह्यांना ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्ट्ले’ हा सन्मान दिला
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना रशियाच्या सरकारने ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्ट्ले’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित केले आहे. भारतातल्या रशियाच्या दूतावासात रशिया आणि भारत यांच्यातल्या विशेष आणि धोरणात्मक भागीदारीस प्रोत्साहन देण्यात केलेल्या अपवादात्मक प्रयत्नांसाठी हा सन्मान दिला गेला.
No comments:
Post a Comment