Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Tuesday, April 16, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 16 April 2019 Marathi | 16 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 16  April 2019 Marathi |   
    16 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी

    ई-वॉलेटच्या तुलनेत UPI आधारित व्यासपीठांचा वापर वाढला

    भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आकडेवारीनुसार, डिजिटल देयकांच्या बाबतीत होणार्‍या व्यवहारांमध्ये उपलब्ध असलेल्या ई-वॉलेट यासारख्या पर्यायी व्यासपीठांच्या तुलनेत युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) या पद्धतीचा वापर वाढलेला दिसून येत आहे. UPI तंत्रावर आधारित असलेल्या व्यासपीठांच्या माध्यमातून मार्च 2019 मध्ये 1.35 लक्ष कोटी रुपयांचे व्यवहार झाले, जे केवळ एका वर्षाच्या कालावधीत यात 400% पेक्षा जास्त वाढ नोंदविली गेली.

    जगातल्या सर्वात मोठ्या विमानाची प्राथमिक चाचणी यशस्वी

    जगातले सर्वात मोठे विमान तयार करण्यात आले आहे आणि त्याला ‘रॉक’ (Roc) हे नाव देण्यात आले आहे. या विमानाची प्राथमिक चाचणी कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील मोझेव वाळवंटात घेण्यात आली आणि तेथून पहिली हवाई चाचणी घेतली गेली. या विमानाला अमेरिकेच्या स्ट्रेटोलॉन्च सिस्टम्स कॉर्प. या कंपनीने तयार केले आहे. या विमानाची लांबी फुटबॉल मैदानाच्या बरोबरीत आहे.

    जगातली पहिली सशस्त्र उभयचर ड्रोन नौका चीनने तयार केली

    पाणी तसेच जमिनीवर चालू शकणारी जगातली पहिली सशस्त्र उभयचर ड्रोन नौका चीनने तयार केली आहे. या नौकेला “मरीन लिझार्ड” हे नाव देण्यात आले. ही चीनी सशस्त्र नौका चीनच्या वुचांग शिपबिल्डिंग इंडस्ट्री ग्रुप या उद्योगाने तयार केली आहे. 1,200 किलोमीटरच्या परिसरात ही नौका संचार करू शकते आणि ही उपग्रहांद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते.

    NASA विद्यार्थ्यांनी तयार केलेले ‘क्युबसॅट’ उपग्रह अंतराळात पाठवविणार

    अमेरिकेची नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ही अंतराळ संस्था अंतराळात कॉस्मिक (ब्रम्हांड) किरणांचा शोध घेण्यासाठी ‘क्युबसॅट’ या श्रेणीतल्या लहान उपग्रहांना पाठविण्याची योजना तयार करीत आहे. ते उपग्रह विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार करण्यात येणार असून त्यासाठी 16 चमूंची निवड करण्यात आली आहे. उपग्रहांना सन 2020, सन 2021 आणि सन 2022 या काळात नियोजित असलेल्या अंतराळ मोहीमांमध्ये जागा दिली जाणार.

    इस्राएलचे अंतराळयान चंद्रावर कोसळले

    इस्राएलचे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले आहे. ‘बेरशीट’ (Beresheet) असे या मोहिमेचे नाव होते. खासगी निधीतून चंद्रावर पाठवलेले हे पहिलेच यान होते. ही मोहीम 22 फेब्रुवारीला सुरू झाली. फ्लोरिडातील केप कॅव्हेरल येथून यानाचे प्रक्षेपण झाले होते आणि यान 4 एप्रिलला चंद्राच्या कक्षेत पोहोचले. चंद्रापर्यंतच सरासरी अंतर 3 लाख 8 हजार किलोमीटर आहे.

    ‘कोलोगेनी महिला मुष्टीयुद्ध विश्वचषक 2019’ या स्पर्धेत भारतीयांनी 5 पदके जिंकली

    जर्मनीत झालेल्या ‘कोलोगेनी मुष्टीयुद्ध विश्वचषक 2019’ या महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी एकूण 5 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कास्यपदकांचा समावेश आहे. भारताच्या मीनाकुमारी मेसनामने महिलांच्या 54 किलो वजन गटात थायलंडच्या मेचाई ब्युनानटचा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले.

    पॅलेस्टिन देशाचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी नव्याने पदाची शपथ घेतली

    पॅलेस्टिन देशाचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी नव्याने तयार झालेल्या सरकारचे नेतृत्व करण्यासाठी पुन्हा एकदा पदाची शपथ घेतली आहे. जानेवारी महिन्यात माजी पंतप्रधान रामी हमदल्लाह यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्याने सरकारची स्थापना करण्यात आली. नवे सरकार पंतप्रधान मोहम्मद शतेह यांच्या नेतृत्वात कार्य करणार.

    UAE मध्ये ‘AI एव्हरीथींग’ ही जागतिक शिखर परिषद भरणार

    संयुक्त अरब अमिरात (UAE) दुबई शहरात ‘AI एव्हरीथींग’ या शीर्षकाखाली जगातली अग्रगण्य कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शिखर परिषद आयोजित करणार आहे. ही शिखर परिषद 30 एप्रिल आणि 1 मे या दोन दिवशी होणार आहे.



    No comments:

    Post a Comment