Current affairs | Evening News Marathi
अंतरिम अर्थसंकल्प 2019: 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर लादला जाणार नाही
अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत ‘अंतरिम अर्थसंकल्प 2019’ मांडला. यावेळी नोकरदार वर्गाचे पाच ते आठ लक्ष रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली गेली. तसेच पुढील दीड लाखांची गुंतवणूक करून त्यावरही करात सूट मिळवू शकता येणार.
मुख्य ठळक बाबी
- दोन घरे असतील तरीही कोणताही कर लागणार नाही. 'स्वस्त गृहनिर्माण योजने'ला प्रोत्साहन देण्यासाठी प्राप्तिकरात ही सूट देण्यात आली आहे.
- घराच्या भाड्यावर लावण्यात येणाऱ्या TDSची सीमा 1 लक्षहून वाढवून 2.5 लक्ष करण्यात आली.
- बँकेमधील ठेवीमधून मिळणाऱ्या 40,000 रुपयांपर्यंतच्या व्याजस्वरुपी उत्पन्नावर TDS (कर) लागणार नाही.
- स्टँडर्ड डिडक्शन 40,000 याहून 50,000 रुपयांपर्यंत वाढविण्यात आले.
- गुंतवणूक, गृहकर्जासह आठ लक्ष रुपयांपर्यंत उत्पन्नावर करमाफी असेल. परंतु, पाच लक्षच्या पुढील उत्पन्नाचा करांच्या श्रेणीत सध्या काहीही बदल न केल्यामुळे 10 लक्ष रुपयांहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना 30% कर भरावा लागेल. तर पाच लक्ष ते 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 20% कर भरावा लागेल.
- एका तासाच्या आत 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर करता येईल.
- बालविकास धोरणासाठी 27584 कोटी रूपयांचा निधी राखीव असेल.
- भारतीय रेल्वेसाठी 64,587 कोटी रुपयांची तरतूद आहे. रेल्वेवर 1 लक्ष कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जाईल.
- मनोरंजन क्षेत्रासाठी सर्व परवानग्या एकाच खिडकीवर प्राप्त होणार.
- येत्या पाच वर्षांत 1 लक्ष डिजिटल गावांची निर्मिती करणार.
- संरक्षण अर्थसंकल्पासाठी 3 लक्ष कोटी रुपयांहून अधिक तरतूद आहे.
- OROPसाठी 35,000 कोटी रुपयांचे कर्ज दिले.
- गेल्या 40 वर्षांपासून रखडलेली 'वन रँक वन पेन्शन' योजना लागू केली.
- गर्भवती महिलांसाठी 26 आठवड्यांची भरपगारी मातृत्व रजा मिळणार. पंतप्रधान मातृत्व योजनेमुळे नवमातांना मदत मिळणार.
- कामगार वर्गासाठी कौशल विकास योजना राबवली जाणार. ज्यांचा EPF कापला जातो त्यांना सहा लक्ष रुपयांचा विमा मिळणार. 'पंतप्रधान श्रमयोगी मानधन' ही पेन्शन योजना सुरू होणार. EPFOकडून कामगारांना सात हजारांपर्यंत बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. असंघटीत कामगारांना कमीत कमी 3000 रुपये पेन्शन मिळणार. नोकरीदरम्यान मृत्यू झाल्यास 6 लक्ष रुपयांची आर्थिक मदत केली जाणार. ग्रॅज्युईटी 10 लक्षवरून 20 लक्ष रुपयांवर नेली.
- शेतकऱ्यांसाठी 75 हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6000 रुपयांची रक्कम थेट जमा होणार. 2 हेक्टर शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली. तीन हफ्त्यांमध्ये रक्कम जमा केली जाणार.
- दारिद्र्य-रेषेखालील, मध्यमवर्गियांना स्वस्त धान्यासाठी 1.7 लक्ष कोटी रुपयांची तरतूद आहे. गावांमध्येही शहरासारख्याच योजना उपलब्ध करून देणार.
- वंदे भारत एक्सप्रेस ही स्वदेशी सेमी-हायस्पीड ट्रेन सुरू केली जाणार.
- ईशान्य प्रदेशात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीमध्ये 21%ची वाढ करीत 58,166 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- सरकारी प्रकल्पांसाठी लागणार्या बाबींचा 25% वाटा MSMEकडून घेतला जाणार, ज्यात 3% स्त्रिया महिला उद्योजक असतील.
- लवकरच राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता पोर्टल विकसित केले जाईल.
पुढच्या पाच वर्षांत 5 लक्ष कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. ग्रामीण अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी 'मनरेगा' योजनेला अधिक निधी उपलब्ध करून देणार. 2022 साली मानवाला अंतराळात पाठवणार. सेंद्रीय शेतीवर भर दिला जाईल. स्वच्छ नद्या, स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचे उद्दिष्ट ठेवले जाईल. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांवर भर देणार.
Current affairs | Evening News Marathi
भारतात वर्ष 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर 6.1% होता: NSSO
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (NSSO) कडून केलेल्या नियतकालिक कामगार बळ सर्वेक्षण (PLFS) यानुसार, भारतामधील बेरोजगारीच्या दराने गेल्या 45 वर्षांचा विक्रम मोडला असून वित्त वर्ष 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर 6.1% होता.
NSSO च्या सर्वेक्षणानुसार,
- वर्ष 2017-18 मध्ये शहरी भागात बेरोजगारीचा दर 7.8% होता, तर ग्रामीण भागात 5.3% होता.
- वर्ष 1972-73 नंतरचा 6.1% हा बेरोजगारीचा सर्वोच्च दर ठरला आहे आणि चालू वर्षात बेरोजगारीचे प्रमाण कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- सन 2018 मध्ये देशामधील बेरोजगारांची संख्या 1.86 कोटी होती आणि सन 2019 मध्ये 1.89 कोटींवर पोहोचेल, असा अंदाज आहे. सन 2017 मध्ये हे प्रमाण 1.83 कोटी होते.
- वय वर्षे 15 ते 29 या वयोगटातील ग्रामीण तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर 17.4 टक्क्यांवर इतका सर्वाधिक आहे, तर याच वयोगटातील ग्रामीण तरुणींमध्ये हा दर 13.6 टक्क्यांवर पोहचला आहे. शहरी भागातील बेरोजगारीचा दर पुरुषांसाठी 18.7% तर महिलांसाठी 27.2% आहे.
- शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये बेरोजगारीचा दर वेगाने वाढत आहे. शिक्षित ग्रामीण महिलांसाठी बेरोजगारीचा दर 2017-18 या वर्षात 17.3% पर्यंत वाढला, तर ग्रामीण शिक्षित पुरुषांकरिता हा दर 10.5% होता.
आंतरराष्ट्रीय कर्मचारी संघटना (ILO) याने यापूर्वी अंदाजित केलेला 3.4% बेरोजगारीचा दर आता 3.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सन 2017, सन 2018 आणि सन 2019 मध्ये बेरोजगारीचे प्रमाण 5.6 वरून 5.5 टक्क्यांवर आले.
Current affairs | Evening News Marathi
जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांनी इराणसह व्यवहारासाठी विशेष देयक प्रणाली विकसित केली
अमेरिकेच्या प्रतिबंधानंतरही इराणसोबत व्यापार चालू ठेवण्यासाठी देयकांच्या देवाणघेवाणाच्या प्रक्रियेत सुलभता येण्यासाठी जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांनी ‘INSTEX’ नावाची एक देयक प्रणाली (पेमेंट चॅनेल) विकसित केली आहे.
इराणसोबत केल्या गेलेल्या अणुकराराला अमेरिकेनी तोडल्यानंतर इराणने युरोपीय संघाच्या कंपन्यांशी व्यापार करण्यात परवानगी देण्यासाठी या प्रणालीची मदत होणार आहे. INSTEX नावाची ही नवीन संस्था तीन सरकारांचा एक संयुक्त प्रकल्प आहे, ज्याला युरोपीय संघाच्या (EU) सर्व 28 सदस्य देशांकडून औपचारिक मान्यता मिळेल.
कराराविषयी
2015 साली केला गेलेला इराण अणुकरार ‘जॉइंट कॉमप्रिहेंसिव प्लान ऑफ अॅक्शन (JCPOA)’ या नावाने देखील ओळखला जातो. हा करार संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, रशिया आणि चीन आणि जर्मनी यांच्यासोबत इराणने दिनांक 14 जुलै 2015 रोजी केला, ज्यामधून आर्थिक मदतीच्या बदल्यात इराणच्या अणु-कार्यक्रमावर कडक बंधने लादली जातात. 2013 साली तत्कालीन राष्ट्रपती हसन रौहानी यांनी या देशांबरोबर वाटाघाटी करून इराण अणूकरार केला आणि तो करार 2016 साली लागू केला. या कराराच्या अंतर्गत इराणने आपल्या सुमारे 9 टन अल्प संवर्धित युरेनियम साठ्याला कमी करून 300 किलोग्रामपर्यंत करण्याची अट स्वीकारली.
Current affairs | Evening News Marathi
मिताली राज: 200 ODI सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू
दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी न्यूझीलँडच्या महिला संघाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय (ODI) मालिकेचा तिसरा सामना खेळत भारताची कर्णधार मिताली राज हिने एक जागतिक विक्रम केला आहे.
मिताली राज हिने तिच्या 200व्या एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. एकदिवसीय सामन्यात 200 एकदिवसीय सामने खेळणारी ती प्रथम महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
36 वर्षीय मिताली राज ही एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा काढणारी फलंदाज देखील आहे. तिने 51.33 च्या सरासरीने आतापर्यंत 6622 धावा केल्या असून त्यात सात शतकांचा समावेश आहे.
Current affairs | Evening News Marathi
DAC ने 6 पाणबुडींच्या स्वदेशी बांधकामाला मंजुरी दिली
संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या (DAC) बैठकीत भारतीय नौदलासाठी सहा पाणबुडींच्या स्वदेशी बांधकामाला मान्यता देण्यात आली आहे.
“प्रोजेक्ट 75 (I)” अंतर्गत 40,000 कोटी रूपयांचा खर्च असलेल्या या प्रकल्पात देशातच पाणबुडी तयार केली जाणार आहे. पाणबुडी तयार करण्याचा प्रकल्प धोरणात्मक भागीदारी पद्धतीच्या अंतर्गत चालवला जाणार, ज्यामुळे परदेशी कंपन्यांच्या भागीदारीने पाणबुडीच्या बांधकामास भारतामधील निवडक खाजगी कंपन्यांना सुविधा प्रदान केली जाणार. हा धोरणात्मक भागीदारी पद्धतीच्या अंतर्गत चालवला जाणार दुसरा प्रकल्प असेल. यापूर्वी नौदलासाठी 111 यूटिलिटी हेलीकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
याव्यतिरिक्त, भारतीय लष्करासाठी अंदाजे 5000 मिलान रणगाडा-विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी मंजुरी दिली गेली.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs | Evening News Marathi
ग्रेटर नोएडा येथे “पेट्रोटेक-2019” परिषद आणि प्रदर्शनी भरणार
नवी दिल्ली-NCR क्षेत्रातल्या ग्रेटर नोएडा येथे “पेट्रोटेक-2019” या नावाखाली 13 वी आंतरराष्ट्रीय तेल व वायू परिषद आणि प्रदर्शनीचे आयोजन केले जाणार आहे.
10-12 फेब्रुवारी या काळात हा कार्यक्रम भारत सरकारचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून आयोजित केला जाणार आहे. भारताकडून भरविण्यात येणार्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत जवळपास 95 देशांचे ऊर्जा मंत्री भाग घेतील.
प्रदर्शनीत भारतामधील तेल आणि वायू क्षेत्रात उपलब्ध असलेल्या बाजारपेठेविषयी आणि गुंतवणूकींच्या संधीचे प्रदर्शन केले जाणार. तसेच ऊर्जा क्षेत्रात झालेल्या प्रगतीचे प्रदर्शन मांडणार्या 13 देशांचे तंबू देखील असतील.
Current affairs | Evening News Marathi
लेफ्टनेंट जनरल राजीव चोप्रा: NCCचे नवे महासंचालक
लेफ्टनेंट जनरल राजीव चोप्रा यांची दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) याच्या महासंचालक पदी नेमणूक करण्यात आली आहे.
लेफ्टनेंट जनरल चोप्रा यांनी ऑपरेशन र्हायनो (आसाम) यामध्ये पायदळाच्या तुकडीचे नेतृत्व केले होते. तत्पूर्वी मणीपूरमध्ये पूर्व कमांडमध्ये तुकडीचे प्रमुख देखील होते. ते जून 2016 पासून मद्रास रेजिमेंटचे कर्नल देखील आहेत.
लेफ्टनेंट जनरल चोप्रा तांत्रिक कर्मचारी अधिकारी अभ्यासक्रमाचे पदवीधर आहेत. त्यांनी NDA खडकवासला, नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी (चीन) आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज (नवी दिल्ली) येथे शिक्षण घेतले आहे. जानेवारी 2018 मध्ये त्यांच्या प्रतिष्ठित सेवेसाठी त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय विद्यार्थी सेना (National Cadet Corps -NCC)
ही देशातल्या तरुण पिढीला शिस्तबद्ध व राष्ट्रीय नागरिकत्वाच्या क्षेत्रात प्रोत्साहन देणारी लष्कर, नौदल आणि हवाई दल यांची एक तिहेरी सेवा संघटना आहे. NCC ची 1948 साली स्थापना करण्यात आली आणि याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs | Evening News Marathi
No comments:
Post a Comment