Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, November 29, 2017

    चालू घडामोडी 29 नोव्हेंबर 2017

    Views

    चालू घडामोडी 29 नोव्हेंबर 2017


    लोकसत्ता,
    सकाळ,
    महाराष्ट्र टाईम्स,
    तरुण भारत ,सामना.


    मधुकर नेराळे यांना ‘विठाबाई नारायणगावकरजीवन गौरव


    सामना ऑनलाईनमुंबई
    ज्येष्ठ तमाशा कलावंत, शाहीर मधुकर नेराळे यांना राज्य सरकारचा ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरक’ पुरस्कार आज जाहीर झाला. पाच लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
    सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नेराळे यांची निवड केली. या समितीत सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, मालती इनामदार, अविष्कार मुळे, लता पुणेकर, दत्तोबा फुलसुंदर, विवेक कवठेकर, हेमसुवर्णा मिरजकर, जयमाला इनामदार यांचा समावेश आहे.
    मधुकर नेराळे यांच्या वडिलांचे तमाशा थिएटर असल्यामुळे वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांचा लोककलेशी संबंध आला. तमाशा ही लोककला जिवंत रहावी म्हणून लालबागला हनुमान थिएटर हा खुला रंगमंच उभारून तमाशा आणि आणि लोककलावंतांना उपलब्ध करून दिला. घुंगरूंची नजाकत आणि ढोलकी ऐकावी ती हनुमान थिएटरातच, असे रसिकांनी म्हणावे एवढी उंची या थिएटरने आणि नेराळे यांनी गाठली. थिएटरच्या माध्यमातून ‘गाढवाचं लग्न’, ‘आतून कीर्तन वरून तमाशा’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘उदे ग अंबे उदे’, ‘एक नार चार बेजार’, ‘पुनवेची रात्र’, ‘काजळी’ यासारख्या वगनाट्यांचे सादरीकरण केले. त्यांनी मुंबईसह महाराष्ट्र, गोवा व दिल्ली येथे लोककलेचे व लावणीचे यशस्वी प्रयोग केले. १९९५-९६ साली संगीत नाटक अकादमीतर्फे हिमाचल प्रदेशात नेराळे यांनी लोककलेचे कार्यक्रम केले. १९९० ते १९९६ पर्यंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या तमाशा प्रशिक्षण शिबिराचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर या कार्यालयाच्या समितीवर १९९३ ते २००१ या कालावधीत सदस्य म्हणून तर राज्य शासनाच्या वृद्ध कलावंत मानधन समितीकर अनेक वर्षे सदस्य म्हणून काम केले आहे.


    महिला उद्योजकांसाठी ‘सहेली’



    मुंबई -: ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनने देशातील महिला उद्योजकांच्या वस्तू ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अॅमेझॉन सहेली हा नवा मंच सुरू केला आहे. यासाठी अॅमेझॉनने काही स्वयंसेवी संघटनांबरोबर जोडून घेतले आहे. यामध्ये सेल्फ-एम्प्लॉइड विमेन्स असोसिएशन (सेवा) व इम्पल्स सोशल एन्टरप्राइझ अशा संस्थांचा समावेश आहे.

    आपल्या वेबसाइटवर महिला उद्योजकांची उत्पादने उपलब्ध करून देण्याबरोबरच सहेली स्टोअर नावाची विशिष्ट जागाही देऊ केली आहे. या जागी ग्राहक गेल्यावर त्याला महिला उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू पाहायला मिळतील. या वस्तू खरेदी करण्याची सर्व पद्धत अॅमेझॉनवर मिळणाऱ्या इतर वस्तूंप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. यासंदर्भात अॅमेझॉन इंडियाच्या विक्रेता सेवा विभागाचे महाव्यवस्थापक गोपाळ पिल्लई यांनी अतिलघु व लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे सांगितले. छोट्या महिला उद्योजकांना आपल्या उत्पादनांची प्रसिद्ध करण्याचे साधनही यामुळे उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


    पंतप्रधानांच्या हस्ते हैदराबाद मेट्रोचे उद्घाटन

    वृत्तसंस्था, हैदराबाद

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हैदराबाद मेट्रोचे उद्घाटन केले. त्यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासह मेट्रोचा प्रवासही केला. या वेळी त्यांच्याबरोबर तेलंगण व आंध्र प्रदेशाचे राज्यपाल ई. एस. एल. नरसिंहा, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी, तेलंगणचे माहिती-तंत्रज्ञान मंत्री के. टी. रामा राव, भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. लक्ष्मण उपस्थित होते. बहुप्रतिक्षित हैदराबाद मेट्रोचा हा पहिला टप्पा असून, यामध्ये ३० किलोमीटर अंतरापर्यंत सुविधा निर्माण झाली आहे.



















    No comments:

    Post a Comment