जागतिक दिवस
-----------
ठळक घटना, घडामोडी
२००० - पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ’एन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.
१९९६ - ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला ’महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान. हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्चा पुरस्कारआहे.
१९९५ - ’ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म’ संपल्याची अधिकृत घोषणा
१९६६ - बार्बाडोसला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९१७ - कलकत्ता येथे ’आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युट’ची स्थापना
१८७२ - हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.
जयंती/जन्मदिवस
१९६७ - राजीव दिक्षीत – सामाजिक कार्यकर्ता
१९४५ - वाणी जयराम – पार्श्वगायिका
१९३५ - आनंद यादव – लेखक
१९१० - कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ ’बाकीबाब’
१८७४ - विन्स्टन चर्चिल – दुसर्याक महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते
१८५८ - जगदीशचंद्र बोस – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन
१८३५ - मार्क ट्वेन – विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार
१७६१ - स्मिथसन टेनांट – हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी ऑस्मिअम व इरिडिअम या मूलद्रव्यांचा शोध लावला. त्यांच्या सन्मानार्थ तांब्याच्या एका धातुकाला टेन्नाटाईट (Cu12As4S13) असे नाव दिले आहे.
१६०२ - ऑटो व्हॉन गॅरिक – वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक
No comments:
Post a Comment