Current affairs | Evening News MarathiCurrent affairs 31 July 2020 Marathi | 31 जुलै मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
हवामानातल्या बदलांमुळे चातक पक्षीच्या स्थलांतरणाविषयी भारतीय संशोधकांद्वारे अभ्यास
हवामानातल्या बदलांमुळे चातक पक्षीच्या बदललेल्या स्थलांतरणाचा मागोवा घेण्यासाठी भारतीय संशोधक एक निरीक्षणयुक्त अभ्यास करीत आहेत.
ठळक बाबी
- वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII), भारतीय सुदूर संवेदी संस्था (IIRS) आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांचा हा संयुक्त कार्यक्रम आहे.
- आफ्रिकेतून भारतात स्थलांतर करणाऱ्या चातक पक्षीचा मार्गक्रम शोधण्याविषयीचा भारतातला हा पहिलाच अभ्यास आहे.
- परंपरेनी हिमालयाच्या पायथ्याशी चातक पक्षीचे आगमन ही वर्षाऋतुची चाहूल देते. पावसाळ्याच्या आगमनाच्या वेळेत भारतात दाखल होणारा हा पक्षी ‘वर्षाऋतुचा अग्रदूत’ मानला जातो.
वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (WII) विषयी
ही भारत सरकारच्या पर्यावरण, वने व हवामानातले बदल मंत्रालयच्या अंतर्गत कार्य करणारी एक स्वायत्त संस्था आहे. त्याची स्थापना 1982 साली झाली. ही संस्था जैवविविधता, धोकादायक प्रजाती, वन्यजीव धोरण, वन्यजीव व्यवस्थापन, वन्यजीव न्यायवैद्य, स्थानिक पद्धती, पर्यावरण विकास, वास्तव्य, हवामानातले बदल इत्यादी सारख्या अभ्यासाच्या क्षेत्रात संशोधन करते.
अटल इनोव्हेशन मिशनचा ‘AIM iCREST’ उपक्रम
30 जुलै 2020 रोजी देशभरातल्या संगोपन परिस्थितीकीय संस्थेमध्ये सर्वांगीण प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना सक्षम करण्यासाठीच्या उद्देशाने, नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन (AIM) याने ‘AIM-iCREST’ उपक्रमाचा प्रारंभ केला.
- या कार्यक्रमासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि वाधवानी फाऊंडेशन या संस्थांनी सहकार्य केले आहे.
- कार्यक्रमामध्ये उच्च कार्यक्षमतेच स्टार्टअप उद्योग तयार करण्यासाठी संगोपन परिस्थितीकीय संस्थेची क्षमता वाढ कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
- अशा प्रकारे नवसंकल्पनांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाविन्य आणण्यासाठी हा पहिल्यांदाच उपक्रम राबविण्यात येत आहे.
उपक्रमाचे अपेक्षित परिणाम
- बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि वाधवानी फाऊंडेशन या संस्थांच्या सहकार्यामुळे या कार्यक्रमामध्ये उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण कल्पना अश्या घटकांसाठी कौशल्य आणि मदत मिळू शकणार आहे. नवउद्योजकांना जागतिक स्तरावरचे संगोपन केंद्रांचे जाळे आणि कौशल्य प्रदान करून सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती विकसित होवू शकणार आहे.
- याच्या अंतर्गत AIMच्या संगोपन केंद्रांच्या उच्च प्रमाणिकरणानुसार विचार करण्यात येणार आहे आणि हे संगोपन उद्योग अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक असणारे समर्थन प्रदान करू शकणार आहे. याचा लाभ म्हणजे नवउद्योजकांच्या कामगिरीमध्ये लक्षणीय सुधारणा होण्यास मदत मिळणार आहे.
No comments:
Post a Comment