Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, July 17, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 17 July 2020 Marathi | 17 जुलै मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 17 July 2020  Marathi |
       17 जुलै  मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स



    अक्षय ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकीच्या संधी शोधण्यासाठी NTPC आणि NIIF यांच्यात करार

    NTPC मर्यादित या देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वीज निर्मिती कंपनीने भारतातील अक्षय ऊर्जा, वीज वितरण यासारख्या क्षेत्रात गुंतवणूकीच्या संधी शोधण्यासाठी राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा कोष (NIIF) सोबत सामंजस्य करार केला आहे.
    या सामंजस्य कराराच्या माध्यमातून भारतातील शाश्वत आणि मजबूत ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये आणखी सुलभता येणार आहे. NIIFच्या सहकार्याने NTPC त्याचे तांत्रिक कौशल्य वापरुन भांडवल उभे करणार आहे, जे अक्षय ऊर्जा क्षेत्राला पुरवले जाणार.
    NTPC मर्यादीत विषयी
    NTPC मर्यादीत (पूर्वीचे राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ) ही ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेले केंद्रीय सार्वजनिक उपक्रम आणि भारतातली सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी आहे. 7 नोव्हेंबर 1975 रोजी कंपनीची स्थापना झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.  
    NTPCची एकूण स्थापित क्षमता 62110 मेगावॅट एवढी आहे आणि त्याच्या व्यवस्थापनाखाली 70 वीजनिर्मिती केंद्रे आहेत ज्यामध्ये 25 अनुदानित आणि संयुक्त उपक्रम, 24 औष्णिक, 13 अक्षय ऊर्जा, 7 संयुक्त नैसर्गिक वायू / द्रव इंधन ऊर्जानिर्मिती केंद्रे आणि 1 जलविद्युत प्रकल्प आहेत. 2032 सालापर्यंत 30 गीगावॅट अक्षय ऊर्जानिर्मिती क्षमता प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट NTPCने ठेवले आहे.
    NIIFL विषयी
    राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा कोष मर्यादित (NIIFL) याची स्थापना वर्ष 2015 मध्ये झाली आणि मुंबईत त्याचे कार्यालय आहे. ही संस्था फंड ऑफ फंड्स, मास्टर फंड आणि स्ट्रॅटेजिक ऑपर्चुनिटीज फंड हे तीन कोष व्यवस्थापित करते. संस्थेनी 3.3 अब्ज डॉलरपेक्षा जास्त भंडावलाचे उद्दिष्ट ठेवले आहे.


    कोचीन शिपयार्ड लिमिटेड नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम कंपनीसाठी वीजेवर चालणारे स्वयंचलित जहाज तयार करणार

    नॉर्वेतील किरकोळ विक्री क्षेत्रातील सर्वात मोठ्या नोर्जेस ग्रूपेन ए.एस.ए. या कंपनीची उपकंपनी असलेल्या ॲस्को मेरीटाईम ए.एस. या कंपनीचे कंत्राट कोचीन शिपयार्डने मिळवले आहे.
    कोचीच्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या भारतीय जहाजबांधकाने नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम ए.एस. संस्थेसोबत दोन विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित जहाज / बोटी बनविण्यासाठी आणि त्यांचा पुरवठा करण्यासाठी आणि तशाच प्रकारच्या नौका बनविण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहे.
    ठळक बाबी
    • हे जगातील पहिले विजेवर चालणारे स्वयंचलित जहाज असणार, ज्याची लांबी 67 मीटर असून त्याची 1846 kWh एवढी बॅटरी क्षमता असणार आहे.
    • कार्यरत झाल्यावर जगातील व्यापारी जहाज क्षेत्रात ही स्वयंचलित जहाजे शून्य कार्बन उत्सर्जनासहीत एक नवा मापदंड तयार करतील.
    • विजेवर चालणारे जहाज बांधणीचा प्रकल्प हा नॉर्वेच्या सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून ओस्लोजवळील समुद्रधुनीतून जाणारा सरकार पुरस्कृत कार्बन-उत्सर्जन रहित परिवहन प्रकल्प आहे.
    • काँगसबर्ग (स्वयंचलित जहाजांसाठी तंत्रज्ञान पुरविणारी कंपनी) आणि विल्यमसेन (नौवहन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी) यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेल्या मास्टरली एएस या पहिल्या तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि स्वयंचलित वाहने बनविणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापनाखाली ही जहाजे चालवली जातील.

    No comments:

    Post a Comment