Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, July 18, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 18 July 2020 Marathi | 18 जुलै मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 18 July 2020  Marathi |
       18 जुलै  मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स



    अमेरिकेत आपत्कालीन तेल साठा तयार करण्यासाठी भारताचा करार

    भारत-अमेरिका धोरणात्मक ऊर्जा भागीदारीचा आढावा घेण्यासाठी दोन्ही देशांमध्ये 17 जुलै 2020 रोजी आभासी मंत्रीस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमात महत्वाच्या उपलब्धीवर भर देणे आणि सहकार्याच्या नव्या क्षेत्रांचा प्राधान्यक्रम ठरवणे यावर भर देण्यात आला. अमेरिकेचे ऊर्जा सचिव डेन ब्र्लोलीएट आणि भारताचे पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.
    या बैठकीत भारताने आपत्कालीन परिस्थितीत वापर करता यावा या हेतूने अमेरिकेत इंधन तेलाची साठवणूक करण्यासाठी संयुक्त राज्ये अमेरिका या देशासोबत आभासी पद्धतीने एक सामंजस्य करार केला आहे.
    ठळक बाबी
    • भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने हा करार अतिशय महत्वाचा ठरतो. करारानुसार, इंधनसाठ्यांसाठी अमेरिका भारताला मदत करणार आहे. तसेच तेलाची साठवणूक करण्यासाठी अमेरिकेच्या इंधन साठवण केंद्राचा वापर भारत करू शकतो.
    • अमेरिकेकडे 71.40 कोटी बॅरल इतकी ‘धोरणात्मक इंधन’ साठवणूक (SPR) क्षमता आहे. आपत्कालीन इंधन तेलाच्या पुरवठ्याच्या बाबतीत अमेरिका जगात आघाडीवर आहे. यामुळे इंधन तेलाच्या नियमित पुरवठ्यात अडथळे आले, तर यामुळे होणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी करता येते. युद्धकाळात हा साठा देशाची इंधन आवश्यकता भागविण्यासाठी उपयोगी ठरतो.
    • भारताकडे सध्या 3.80 कोटी बॅरल इतकी ‘धोरणात्मक इंधन’ साठवणूक (SPR) क्षमता आहे. पोडूर, मंगळूर, विशाखापट्टणम येथे भूमिगत टाक्यांमध्ये हे इंधन तेल साठविले जाते. इंधन साठविण्यासाठी भारताने सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) सोबतही करार केला आहे. भारताला मागणीच्या 80 टक्के इंधन आयात करावे लागते.

    आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी भारताचा अमेरिकाफ्रान्सजर्मनी यांच्यासोबत एअर बबल’ करार

    कोविड-19 महामारीमुळे बंद पडलेल्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवेला काही निवडक देशांसाठी पुन्हा चालू करण्याच्या उद्देशाने भारताने संयुक्त राज्ये अमेरिका, फ्रान्स, जर्मनी या देशांच्या सोबत द्विपक्षीय ‘एअर बबल’ करार केले आहेत.
    महामारीमुळे बंद पडलेल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा क्षेत्राला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे लवकरात लवकर विमान सेवा सुरु कारण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीबरोबर करार करून या देशांमध्ये विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
    ठळक बाबी
    • टाळेबंदीनंतर प्रथमच भारत-अमेरिका विमानसेवा सुरु झाली आहे. 18 जुलैपासून फ्रान्ससोबत हवाई सेवा सुरू होणार आहे.
    • ‘एअर बबल’ करारानुसार ठरलेल्या कालावधीतच निश्चित विमानसेवा पूर्ण करावयाच्या असतात. अमेरिका आणि भारत यांच्यात 17 ते 31 जुलै 2020 या कालावधीत 18 विमानांची उड्डाणे निश्चित झाली आहेत. ही उड्डाणे दिल्ली ते न्यूयॉर्क आणि दिल्ली ते सॅन फ्रॅन्सिस्को दरम्यान होतील. यासह एअर फ्रान्स दिल्ली, मुंबई, बंगळुरू पॅरिस दरम्यान 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत 28 विमानाचे उड्डाण करणार आहे.
    • तसेच ब्रिटनसोबत हवाईसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

    No comments:

    Post a Comment