Current affairs | Evening News Marathi
Current affairs 16 July 2020 Marathi |
16 जुलै मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
10 वर्षांपेक्षा कमी सेवाकाळ असतांनाही सैन्यातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार: भारत सरकार
भारत सरकारने 10 वर्षांपेक्षा कमी सेवा पूर्ण करणाऱ्या सैन्यातील कर्मचाऱ्यांना देखील, आता निवृत्तीवेतनाचा (इनव्हॅलिड पेंन्शन) लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
या निर्णयाचा लाभ 4 जानेवारी 2020 पासून अथवा यानंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
ज्या कर्मचाऱ्यांना अपंगत्व आले असून, अस्वास्थ्य अथवा असक्षमता (NANA) अश्या कारणांमुळे ज्यांची सेवा थांबविण्यात येते, अशा कर्मचाऱ्यांना दिव्यांगत्व (इव्हँलिडेटेड) निवृत्तीवेतन देण्यात येते.
पार्श्वभूमी
याआधी, दिव्यांग निवृत्तीवेतनाचा लाभ कमीत कमी 10 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळत असे. यापूर्वी ज्यांची सेवा 10 वर्षांपेक्षा कमी झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना केवळ ग्रँच्युईटीचा लाभ मिळत असे.
या निर्णयामुळे ज्या कर्मचाऱ्यांची सेवा दहा वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी झाली आहे, परंतु जे सेवा बजाविण्यास शारीरिक अथवा मानसिक कारणामुळे असमर्थ आहेत तसेच जे कर्मचारी सैन्य अथवा नागरी सेवेत समाविष्ट होऊ शकत नाहीत अशा कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आणि आर्थिकदृष्ट्या त्यांचे जीवन सुसह्य होणार.
‘कोरोशुअर’: दिल्लीच्या IIT संस्थेत विकसित झालेला जगातला सर्वात स्वस्त ‘कोविड-19 निदान संच’
भारतीय तंत्रज्ञान संस्था, (IIT) दिल्ली, येथील संशोधकांनी RT-PCR प्रक्रियेवर आधारित असलेला जगातला सर्वात स्वस्त “कोविड-19 निदान संच” विकसित केला आहे. त्याला ‘कोरोशुअर’ असे नाव देण्यात आले आहे.
प्राध्यापक विवेकानंदन पेरूमल आणि त्यांच्या शोध पथकाने हा कोविड-19 निदान संच विकसित केला. या संचाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि भारतीय औषधी महानियंत्रक (DGCI) कडून मान्यता देण्यात आली आहे.
ठळक बाबी
- 'कोरोशुअर' कोविड-19 निदान संच स्वदेशी आहे आणि याची किंमत इतर संचाच्या तुलनेमध्ये अतिशय कमी आहे.
- DGCI संस्थेनी हा संच उच्च संवेदनशील आणि वैशिष्ठ्यपूर्ण असल्याचे नमूद करून मान्यता प्रदान केली आहे.
- दिल्ली क्षेत्रात न्यूटेक वैद्यकीय उपकरणांच्या मदतीने हा तपासणीमुक्त निदान संच निर्माण करण्यात आला आहे.
- याचा अधिकृत परीक्षण प्रयोगशाळांनाही कोविड-19चे RT-PCR पद्धतीने परीक्षण करण्यासाठी उपयोग होणार आहे. RT-PCR पद्धतीने चाचणीसाठी 399 रूपये आधार मूल्य निश्चित करण्यात आले आहे. इतकेच नाही तर RNA विलगीकरण आणि प्रयोगशाळांचे शुल्क त्यामध्ये धरण्यात आल्यानंतरही प्रत्येक परीक्षणाला येणारा सध्याचा खर्च याचा विचार केला, तर या कोरोशुअर संचाने निदान करणे अधिक स्वस्त होणार आहे.
- ICMR संस्थेच्यावतीने मान्यता देण्यात आलेला कोविड-19 रोगासाठी पहिला परीक्षण-मुक्त निदान संच हा आहे.
No comments:
Post a Comment