Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Friday, September 15, 2017

    'अभियंता दिन' (इंजिनीअर्स डे)

    Views

    देशात इंजिनिअरिंगच्या तंत्रज्ञानाचा पाया घालणारे सर मोक्षगुंडम विश्वसरैया यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिन, 'अभियंता दिन' (इंजिनीअर्स डे) म्हणून साजरा केला जातो. 
    हार्दिक शुभेच्छा !!!
    ----------------------------------------------
    अभियांत्रिकीचा व्यवसाय करण्यात तज्ज्ञ असलेला अभियंता हा वैज्ञानिक माहिती, गणित व कल्पकता वापरून तांत्रिक समस्यांवर उपाययोजना तयार करीत असतो. आपल्या देशात डॉ. एम. विश्‍वसरैया नावाचे एक महान अभियंते होऊन गेले. इंडियन इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनियर्स ही भारतातील अभियंत्यांची संघटना, त्याचा १५ सप्टेंबर हा वाढदिवस ‘आंतरराष्ट्रीय अभियंता दिन’ म्हणून साजरा करते. १९५५ साली सर विश्‍वेस्वरय्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले होते, यावरून त्यांच्या हयातीतील प्रचंड कार्याची कल्पना येते. भद्रवती स्टील कारखान्याची निर्मिती, म्हैसूर युनिव्हर्सिटीची स्थापना, कृष्णराजासागर धरणाची बांधणी, म्हैसूर बँक या अशा संस्था नि वास्तूचे ते शिल्पकार होते. आपल्या देशाला त्या काळात प्रगतीपथावर ठेवण्याचे महान कार्य त्यांनी केले. इंग्रजांची सत्ता असताना म्हैसूर राज्यातच नव्हे तर तद्नंतर केंद्रीय सरकारातदेखील मोठमोठी जबाबदारीची नि महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली होती.

    वयोवृद्ध होईपर्यंत ते सतत कार्यमग्न राहिले. वयाच्या ९२ व्या वर्षी पटनाला जाऊन गंगेवर पूल बांधण्याच्या कामाची त्यांनी आखणी केली होती. कुठल्याही प्रकारचा थाटमाट न करता ते साधेपणाने जगले. गोरगरीबांच्या हितासाठी त्यांनी कितीतरी प्रकल्पांत स्वतःला झोकून दिले होते. १५ सप्टेंबर १८६० साली जन्मलेल्या या बुद्धिमान तंत्रशोधकाचे १४ एप्रिल १९६२ रोजी महानिर्वाण झाले. एका भारतीय अभियंत्याच्या गौरवार्थ हा आंतरराष्ट्रीय दिवस मानला जातो, ही किती गौरवाची बाब आहे! अभियंत्यांचं कार्य उपयोजित स्वरुपाचे असते. मूलभूत वैज्ञानिक शोधांचा मानवी कल्याणासाठी, त्यांच्या गरजा भागविण्यासाठी वापर करण्याचे कसब अभियंत्यांकडे असते. एखादा तंत्रज्ञानीय इलाज हुडकून काढताना त्यांना तो बिकट प्रश्‍न समजून घ्यावा लागतो. त्यातील बारिकसारीक क्लृप्त्या शोधून काढाव्या लागतात. योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. संशोधन करणे, शोध घेणे आणि माहितीचा प्रत्यक्ष वापरात रुपांतर करणे ही कामे अभियंत्यांना जिकीरीने करावी लागतात. अभियांत्रिकी विश्‍लेषणाच्या विविध पद्धती वापरून अभियंते परीक्षण, उत्पादन वा यंत्रसामुग्रीची देखभाल करतात. एखाद्या प्रकल्पासाठी किती वेळ व पैसा खर्च येतो याचा अंदाजदेखील त्यांना वारंवार घ्यावा लागतो. प्रकल्पातील धोक्यांचा आढावा घ्यावा लागतो.

    अभियांत्रिकीत विविध शाखा आहेत व त्या निरनिराळ्या विषयांशी निगडित असतात. भिन्न प्रकारचे अभियंते त्या वेगवेगळ्या शाखेतले तज्ज्ञ असतात. अभियंत्यांना आपल्या कामात कटाक्षाने नैतिकता पाळावी लागते. आपला व्यवसाय, नोकरी, ग्राहक, समाज यांच्याप्रती त्यांना कर्तव्यपूर्ती करावी लागते. डॉक्टर मंडळी जशी हिपोक्रेटीसची शप्पथ घेतात, तशाच प्रकारची प्रतिज्ञा अभियंत्यांना व्यवसायाच्या प्रारंभी करावी लागते. त्यासंबंधी कडक मार्गदर्शिका नि कायदेकानून असतात. उ.अमेरिका आणि कॅनडात नवनिर्वाचित अभियंत्यांच्या अंगुठीत लोखंड किंवा स्टेनलेस स्टीलची अंगठी घालतात व त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देतात. ती १९२५ पासून सुरू असलेली जुनी परंपरा आहे. इंजिन चालविणारा तो इंजिनिअर ही १३२५ साली वापरात आलेली संज्ञा असली तरी मानवी संस्कृतीच्या प्रारंभापासून अभियांत्रिकीचा वापर होत आला आहे. चाकाचा शोध हा त्या उत्क्रांतीतला महत्त्वाचा टप्पा होता.

    No comments:

    Post a Comment