Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, July 15, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 15 July 2020 Marathi | 15 जुलै मराठी करेंट अफेयर्स

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 15 July 2020  Marathi |
       15 जुलै  मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स



    प्रज्ञाता (PRAGYATA)डिजिटल शिक्षणाच्या संदर्भात भारत सरकारची मार्गदर्शक तत्वे

    केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांच्या हस्ते नवी दिल्लीत आभासी माध्यमातून डिजिटल शिक्षण देण्या-घेण्याच्या संदर्भात “प्रज्ञाता” (PRAGYATA) या नावाने मार्गदर्शक तत्त्वांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे.
    कोविड-19 महामारीमुळे देशभरातील सर्व शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत आणि शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या 240 दशलक्ष मुलांच्या अभ्यासावर याचा परिणाम झाला आहे. शाळा बंद ठेवण्याच्या मुदतीमध्ये सारखी वाढ होत असल्यामुळे शिक्षणाचे नुकसान होऊ शकते. ही समस्या लक्षात घेता घरी आणि शाळेतील शिक्षणामध्ये योग्य समतोल व समन्वय साधून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी योग्य पद्धत अवलंबण्यावर भर दिला जात आहे.
    ठळक बाबी
    • टाळेबंदीमुळे सध्या घरी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन/ मिश्रित/ डिजिटल शिक्षणावर लक्ष केंद्रित करून त्यांच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीकोनातून “प्रज्ञाता” मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली गेली आहेत. डिजिटल / ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भातली ही मार्गदर्शक तत्वे शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी ऑनलाईन शिक्षण अधिक विकसित करण्यासाठी पथदर्शक म्हणून काम करतील.
    • डिजिटल उपकरणे उपलब्ध असणारे शिकाऊ आणि मर्यादित किंवा नगण्य स्वरुपात डिजिटल उपकरणे उपलब्ध असणारे शिकाऊ दोघांनीही NCERTच्या पर्यायी शैक्षणिक वेळापत्रकाचा वापर करावा यावर भर देण्यात आला आहे.
    • “प्रज्ञाता” (PRAGYATA) मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ऑनलाईन / डिजिटल पद्धतीने शिकण्याच्या आठ टप्प्यांचा समावेश आहे, ते म्हणजे योजना –आढावा - व्यवस्था करा – मार्गदर्शक - चर्चा - अभ्यास नेमून द्या - मागोवा घ्या - कौतुक करा (Plan-Review-Arrange-Guide-Yak(talk)- Assign-Track, and Appreciate). हे सर्व टप्पे उदाहरणांसह डिजिटल शिक्षणाचे नियोजन आणि अंमलबजावणी बाबत मार्गदर्शन करतात.
    • तसेच इयत्तेनुसार शिफारसी करण्यात आल्या आहेत –
    1. पूर्व प्राथमिक - पालकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी निश्चित केलेल्या दिवशी, 30 मिनिटांपेक्षा जास्त नाही.
    2. इयत्ता पहिली ते बारावी - http://endert.nic.in/aac.html या संकेतस्थळावर NCERT च्या पर्यायी शैक्षणिक वेळापत्रकाचा अवलंब / अनुकूलन करण्याची शिफारस केली आहे.
    3. इयत्ता पहिली ते आठवी - राज्ये / केंद्र शासित प्रदेशांद्वारे प्राथमिक वर्गांसाठी ज्या दिवशी ऑनलाइन वर्ग घेण्याचे ठरवले आहे, त्या दिवशी 30-45 मिनिटांच्या दोनपेक्षा जास्त सत्रांसाठी ऑनलाईन समकालीन अभ्यास केला जाऊ शकत नाही.
    4. इयत्ता नववी ते बारावी - राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी निश्चित केलेल्या दिवशी 30-45 मिनिटांच्या चारपेक्षा जास्त सत्रांसाठी ऑनलाईन समकालीन अभ्यास केला जाऊ शकत नाही.
    • मार्गदर्शक तत्त्वे पालकांना घरी मुलांसाठी सायबर सुरक्षा उपायांसह शारीरिक, मानसिक आरोग्य आणि कल्याणची आवश्यकता समजण्यास मदत करतात. डिजिटल उपकरणांच्या दीर्घकाळ वापरामुळे मुलांना जास्त प्रमाणात ताण किंवा मानसिक थकवा येऊ नये किंवा ते नकारात्मकतेने ग्रस्त होऊ नयेत (बसण्याची योग्य पद्धत बिघडणे, नेत्र दोष, आणि इतर शारीरिक समस्या) यासाठी मार्गदर्शक तत्त्वे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्या साठीच्या उपायांवर जोर देतात.
    • या व्यतिरिक्त यात कर्मचाऱ्यांच्या पारिस्थितीकी आणि सायबर सुरक्षेसंबंधी काय करावे आणि काय करु नये याची देखील एक सूची आहे. तसेच कार्याभ्यासासंबंधीही सूची देखील प्रदान करण्यात आली आहे.

    जागतिक युवा कौशल्य दि15 जुलै

    दरवर्षीप्रमाणे 15 जुलै 2020 रोजी जगभरात “स्किल्स फॉर ए रेजीलीएन्ट युथ” या संकल्पनेखाली ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ साजरा करण्यात येत आहे.
    यावर्षी भारतात ‘कौशल्य भारत’ अभियान सुरू करण्यात आल्याचा पाचवा वर्धापनदिन म्हणून हा दिवस साजरा होत आहे. कौशल्य विकास व नवउद्योजकता मंत्रालयातर्फे या दिवशी एका डिजिटल परिषदेचे आयोजन करण्यात आले.
    ‘कौशल्य भारत’ अभियान ही भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे. देशातील युवा वर्गाला अर्थार्जनाला उपयुक्त अशी कौशल्ये देऊन सक्षम करणे आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणची त्यांची उत्पादकता अधिक वाढवणे हा यामागचा हेतू आहे. कौशल्य भारत अंतर्गत अनेकविध क्षेत्रातील अभ्यासक्रम दिले जातात. हे अभ्यासक्रम उद्योगविश्वाची मानके तसेच राष्ट्रीय कौशल्य पात्रता संरचना अंतर्गत सरकारने ठरवलेली मानके या दोन्हीशी सुसंगत आहेत.
    पार्श्वभूमी
    18 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत ठराव 69/145 मान्य करण्यात आला. या ठरावानुसार जगभरात दरवर्षी 15 जुलै या तारखेला जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा केला जाणार आहे. प्रथम जागतिक युवा कौशल्य दिवस 2015 साली साजरा केला गेला.
    प्रौढांच्या तुलनेत युवांमध्ये जवळजवळ तीन पटीने अधिक बेरोजगारीचे प्रमाण असण्याची शक्यता असते आणि सतत कमी दर्जाचे रोजगार स्वीकारतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात श्रमिक बाजारात असमानता असते. याव्यतिरिक्त, महिलांमध्ये अधिक बेरोजगारी असण्याची आणि कमी वेतन देण्याची शक्यता असते किंवा कंत्राटी पद्धतीने काम करण्याची पद्धत फोफावते. म्हणूनच या समस्येच्या निराकरणासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण हे प्रमुख मार्गदर्शक ठरते. 
    युवांसाठी कौशल्य आणि नोकरीची संधी हा प्रामुख्याने शाश्वत विकासाचा उद्देश आहे आणि प्रासंगिक कौशल्य असलेल्या युवा आणि प्रौढांच्या संख्येत मोठी वाढ करणे हे एक उद्दिष्ट ठरवले गेले आहे.

    No comments:

    Post a Comment