Current affairs | Evening News Marathi
Current affairs 31 May 2020 Marathi |
31 मे मराठी करेंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स
IASST संस्थेच्या वैज्ञानिकांनी जखमांसाठी वनौषधीयुक्त ‘स्मार्ट बँडेज’ विकसित केले
केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या इन्स्टिटयूट ऑफ अॅडव्हान्सड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IASST) या संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांनी जखमांसाठी “pH-रिस्पॉन्सिव्ह स्मार्ट बँडेज” विकसित केले आहे, जे जखमेसाठी उपयुक्त असून औषधाचा pH टिकुन राहतो.
कापूस आणि ज्यूट यासारख्या स्वस्त आणि टिकाऊ वस्तूंचा वापर करून अतिसूक्ष्म तंत्रज्ञानावर (nanotechnology) आधारित ‘कॉटन पॅच’ विकसित करण्यात आला आहे.
ठळक बाबी
- डॉ. देवाशिष चौधरी यांनी केलेल्या संशोधनात, ज्युट कार्बन डॉट्ससह नॅनो कॉम्पोजिट हायड्रोजेलयुक्त कॉम्पॅक्ट कॉटन पॅच तयार केले गेले. फ्लोरोसंट कार्बन डॉट्सचे सिंथेसाइझिंग करण्यासाठी ज्यूटचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे आणि ते पसरले जावे यासाठी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. कडुलिंबाच्या पानांचा (आझादिराछताइंडिका) अर्क हे नमुना औषध अभ्यासात उदाहरण म्हणून घेतले गेले आहे.
- उत्तेजक-प्रतिसाद देणाऱ्या या नव्या औषध वितरण प्रणालीमध्ये, ज्युट कार्बन डॉट्स हायड्रोजेल मॅट्रिक्स-कॉटन पॅचमध्ये बंदिस्त केले असून दोन वेगळ्या pH पातळीवर प्रभावीपणे औषध पुरवठा करू शकतात.
- जखमेत जीवाणूचा संसर्ग वाढल्यास फॅब्रिकेटेड हायब्रिड कॉटन पॅचचा उत्तेजक-प्रतिसादात्मक गुणधर्म फायद्याचा ठरतो आणि यामुळे खालच्या pH कडे औषध जाते जे या परिस्थितीत अनुकूल असते. कॉटन पॅचचे हे pH-प्रतिसादात्मक वर्तन कार्बन डॉट तयार करताना वेगवेगळ्या मॉलेक्युलर संबंधांमुळे सिस्टममध्ये समाविष्ट केलेल्या जूट कार्बन डॉट्सच्या विशिष्ट वर्तनानुसार आहे.
- हायब्रीड कॉटन पॅचच्या अशा उत्तेजक-प्रतिसाद वर्तनाचा विकास जखमेसाठी ते स्मार्ट ड्रेसिंग किंवा मलमपट्टी म्हणून वापरण्याचा मार्ग सुकर झाला. पॅच तयार करण्यासाठी कॉटन आणि ज्यूट यासारख्या स्वस्त आणि टिकाऊ साहित्याचा वापर केल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया जैव-संगत, बिन विषारी, कमी खर्चाची आणि टिकाऊ झाली आहे.
संसर्गाच्या प्रसारावर देखरेख ठेवण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे नवे तंत्रज्ञान ‘मॉडेल'
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने भविष्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगांवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच आरोग्य यंत्रणेची सज्जता आणि इतर उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यासाठी मदत म्हणून ‘कोविड-19 इंडियन नॅशनल सुपर मॉडेल’ उपक्रम राबवत आहे.
सरकार संसर्ग क्षमता आणि जीवितहानीवर बारीक लक्ष ठेवून आहे, परंतु रोगावरील देखरेख वाढवण्यासाठी तसेच प्रसाराचा अंदाज वर्तवण्यासाठी एक मजबूत पूर्वसूचना प्रणाली तयार करणे अत्यावश्यक आहे. कोविड-19 संबंधी अंदाज आणि देखरेखीसाठी असंख्य गणितीय मॉडेलची DST-SERB (विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळ) आणि अन्य संस्थांद्वारे प्रायोजित विश्लेषकांकडून चाचपणी केली जात आहे.
ठळक बाबी
- हवामानविषयक घटनांच्या आपत्ती व्यवस्थापन नियोजनासाठी गणितीय मॉडेल्सचा वापर भारत पूर्वीपासून करीत आहे. त्यातून प्रेरणा घेत विभागाने या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा शोध घेण्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी एक मॉडेल तयार करण्यासाठी अभ्यास सुरु केला आहे, जो पुरावा-आधारित अंदाजासाठी आवश्यक कठीण चाचण्या काळजीपूर्वक घेणार आणि हवामानाचा अंदाज घेणाऱ्या समुदायांमध्ये ज्याचा नियमितपणे वापर करता येणार.
- मॉडेल संपूर्णपणे केवळ कोविड-19 संबंधित माहितीवर अवलंबून असेल आणि माहितीतला नवीन कल जाणून घेऊन त्यातून शिकण्यासाठी 'बिल्ट-इन' घटक देखील असणार. हे यशस्वी पुरावा-आधारित गणितीय व सांख्यिकीय अंदाज मॉडेल एकत्रित करणार तसेच संसर्गजन्य रोगाच्या प्रसाराच्या अंदाजासाठी सर्वोत्तम पूर्वसूचित विश्लेषणाचा यात समावेश असणार आहे.
- या सुपरमॉडेलचा वापर भारत तसेच जगभरातल्या धोरणकर्त्यांद्वारे संसर्ग प्रसाराच्या दराबाबत अंदाज वर्तवण्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी केला जाऊ शकतो; त्यामुळे साथीच्या आजाराला आळा घालता येणार.
- या उपक्रमाचा एक भाग म्हणून, जवाहरलाल नेहरू प्रगत वैज्ञानिक संशोधन केंद्र (JNCASR) आणि IISc, बेंगळुरू या संस्था देशातल्या सर्व कोविड-19 मॉडेलिंग प्रकल्प व कार्यक्रमांशी जोडण्यासाठी तसेच एकत्रित कार्य करण्यासाठी समन्वय साधणार. हे विविध मॉडेल्सचे मूल्यांकन करण्यासाठी आणि शेवटी कोविड-19 'इंडिया नॅशनल सुपर मॉडेल' सादर करण्यासाठी मापदंडांचा एक संच विकसित करण्यात मदत करणार. समन्वय गट वापरण्यास योग्य 'इंटरफेस' आणि 'सॉफ्टवेअर' सुनिश्चित करण्यासाठी मॉडेलिंग, विविध सॉफ्टवेअर विकसक तसेच नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत संशोधक गटांशी सल्लामसलत करुन काम करणार.
No comments:
Post a Comment