Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, May 2, 2020

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 2 May 2020 Marathi | 2 मे मराठी करेंट अफेयर्स

    12 Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 2 May 2020  Marathi |
       2 मे  मराठी करेंट अफेयर्स


    Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS  | करंट अफेयर्स


    दिल्ली पोलिसांचा ‘आयुरक्षा’ कार्यक्रम

    आयुरक्षा - "कोरोना से जंग- दिल्ली पुलिस के संग" हा दिल्लीची अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आणि दिल्ली पोलिस यांचा एक नवा संयुक्त पुढाकार आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि कोविड-19 विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी आयुर्वेदचा उपयोग करण्याविषयी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
    कार्यक्रमाच्या ठळक बाबी
    • आयुष मंत्रालयाने च्यवनप्राश (आवळा हे मुख्य घटक असलेले), संशमनीवटी (गुडुचीपासून तयार केलेले) आणि अनू तैला सारख्या आयुर्वेदिक औषधांची शिफारस केली आहे, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवितात.
    • ज्यांना कोविड-19चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे अश्या मधुमेह, ताणतणाव, उच्च रक्तदाब असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची ओळख पटवण्याची योजना देखील आहे.
    • अखिल भारतीय आयुर्वेद संस्था सुरुवातीच्या 15 दिवसांसाठी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषधांची उपयुक्तता देखील स्पष्ट करणार.

    विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा ‘यश’ नावाचा जनजागृती कार्यक्रम

    विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नोलॉजी कम्युनिकेशन (NCSTC) या संस्थेनी कोविड-19 वर लक्ष केंद्रित करुन आरोग्य आणि धोक्यासंदर्भात इयर ऑफ अवेयरनेस ऑन सायन्स अँड हेल्थ (यश)’ नावाचा नवा कार्यक्रम आरंभ केला.
    ‘इयर ऑफ अवेयरनेस ऑन सायन्स अँड हेल्थ (यश / YASH)’ हा एक जनजागृती कार्यक्रम आहे, ज्याच्या माध्यमातून लोकांना कोविड-19 विषाणू आणि त्याचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्याबाबत अचूक आणि शास्त्रोक्त माहिती प्रदान केली जाणार.
    देशातल्या वैविध्यपूर्ण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या कार्यक्रमात आरोग्य, विज्ञान, जोखीम सांगणारे सॉफ्टवेअर, ध्वनी-दृष्य, डिजिटल व्यासपीठ, लोककला इत्यादी माध्यमांचा समावेश करण्यात येणार आहे.
    तसेच कार्यक्रमातल्या अडचणी सोडविण्यासाठी संशोधन, शैक्षणिक, प्रसार माध्यमे आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असणार. जोखीम स्पष्ट करण्यासाठी आणि जोखीम व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी वैज्ञानिक आणि योग्य आरोग्यविषयक माहितीचा वापर केला जाणार.

    No comments:

    Post a Comment

    Menu

    Contact Form

    Name

    Email *

    Message *