Current affairs | Evening News Marathi
Current affairs 23 January 2020 Marathi |
23 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
“व्योममित्र”: भारताचा ‘अर्धयंत्रमानव’ गगनयानातला सहभागी
22 जानेवारी 2020 रोजी बेंगळूरु येथे पार पडलेल्या ‘मानवी अंतराळ मोहीम आणि शोध’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान ‘व्योममित्र’ या नावाने भारतात तयार करण्यात आलेल्या स्त्री अर्धयंत्रमानवाचे अनावरण करण्यात आले.
भारताच्या अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी ‘व्योममित्र’ या अर्धयंत्रमानवास (half-humanoid) गगनयानाच्या पहिल्या निर्मनुष्य मोहिमेतून अंतराळात पाठवले जाणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) चालणारा व्योममित्र अंतराळात मानवी शरीराच्या हालचालींचा अभ्यास करणार असून त्यासंबंधीचा तपशील पाठविणार आहे. व्योममित्र एक अत्यंत विशेष रोबो असून तो बोलू शकतो तसेच व्यक्तींची ओळख पटवू शकतो.
गगनयान मोहीम
गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. गगनयान मोहीम तीन टप्प्यांची आहे.
भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेची पूर्वतयारी म्हणून डिसेंबर 2020 या महिन्यात पहिली निर्मनुष्य अंतराळ मोहीम हाती घेतली जात असून तशीच दुसरी मोहीम जून 2021 या महिन्यात होणार आहे. त्यानंतर 2021 साली भारताचे अंतराळवीर ‘गगनयान’ मोहिमेतून अंतराळात पाठवले जाणार आहेत.
मानवी अंतराळ मोहिमेसाठी ISROने 10 टनांचे वजन वाहून नेऊ शकेल असा प्रक्षेपक तयार केला आहे.
भारताच्या अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी ‘व्योममित्र’ (व्योम म्हणजे अंतराळ) नावाने भारतात तयार करण्यात आलेल्या स्त्री अर्धयंत्रमानवास (half-humanoid) गगनयानाच्या पहिल्या निर्मनुष्य मोहिमेत अंतराळात पाठवले जाणार आहे. या अंतराळ मोहिमेत मी विविध घटकांचे निरीक्षण करून व्योममित्र इतरांना सतर्क करणार आहे. जीवनपूरक कृतींचे परीक्षण यात केले जाणार आहे. माणसाने अंतराळात करण्याच्या कृतींची नक्कल हा यंत्रमानव करू शकतो.
कलक्कडू-मुंडनथुरै व्याघ्र अभयारण्यात वन्यप्राण्यांची वार्षिक गणना होत आहे
तामिळनाडू राज्यात असलेल्या ‘कलक्कडू-मुंडनथुरै व्याघ्र अभयारण्य’ येथे वन्यप्राण्यांची वार्षिक गणना केली जात आहे. 22 जानेवारी ते 27 जानेवारी या कालावधीत ही गणना केली जात आहे.
वन्यप्राण्यांची गणना हे देशातल्या मौल्यवान चल संपत्तीचे संरक्षण करण्यासाठीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण साधन आहे.
‘वन्यजीवन संख्या यांची स्थिती’ यासंदर्भातल्या केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालात या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा समावेश केला जाणार आहे.
ठळक बाबी
- अभयारण्याच्या संपूर्ण 60 हजार हेक्टर क्षेत्रफळामध्ये हे सर्वेक्षण करण्यात येणार असून हे काम दोन टप्प्यात होणार आहे.
- सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात वाघ, लांडगा इत्यादी मांसाहारी प्राणी तर द्वितीय टप्प्यात हत्ती, हरिण इत्यादी शाकाहारी प्राण्यांची गणना करण्यात येणार.
- या कार्यक्रमात वन अधिकारी, वन्यपशू तज्ज्ञ आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागाने तीनशेहून अधिक कर्मचारी सहभागी आहेत.
- वन पर्यावरणाची स्थिती आणि त्यामुळे वन्य प्राण्यांच्या वास्तव्यावर होणार्या परिणामांचीही या पाहणीत नोंद घेतली जाणार आहे. सर्वेक्षण करताना मानव-प्राणी संघर्षाची शक्यता देखील ओळखली जाणार आणि अश्या घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावले सुचविली जाणार आहे.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment