Current affairs | Evening News Marathi
Current affairs 22 January 2020 Marathi |
22 जानेवारी 2020 मराठी करेंट अफेयर्स
आंध्रप्रदेश राज्याच्या तीन राजधानी असणार
आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी तयार केलेल्या तीन राजधानींच्या विधेयकाला 20 जानेवारी 2020 रोजी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मंजूरी देण्यात आली.
- नव्या विधेयकानुसार, आंध्रप्रदेशची प्रशासकीय राजधानी विशाखापट्टणम, न्यायालयीन राजधानी कर्नूल, तर विधिमंडळ राजधानी अमरावती असणार आहे.
- अमरावती या शहरात विधीमंडळाचे कामकाज ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
- तीन शहरांना राजधानीचा दर्जा देण्याचा देशातला हा पहिलाच प्रयोग असण्याची शक्यता आहे.
राज्यातल्या प्रशासनाचे विकेंद्रीकरण आणि सर्वकष विकास विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले. चर्चेअंती आवाजी मतदानाने ते विधेयक मंजूर करण्यात आले.
प्रत्यक्ष कर संकलनात 5.2 टक्के घट
15 जानेवारी 2020 या तारखेपर्यंत झालेले प्रत्यक्ष कर संकलन 7.3 लक्ष कोटी रुपये होते, जे की गेल्या वर्षाच्या तुलनेत 5.2 टक्क्यांनी कमी आहे.
ठळक बाबी
- याच कालावधीत वैयक्तिक आयकर संकलनात 6.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे, जे की अर्थसंकल्पात 23.3 टक्के एवढे अंदाजित केले गेले होते.
- कॉर्पोरेट कर दर नियमित कंपन्यांकरिता पूर्वीच्या 30 टक्क्यांवरून 22 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे, तर नवीन उद्योगांसाठी हा दर 25 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
- भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर 5 टक्के एवढा अपेक्षित असल्याने, मंदावणार्या अर्थव्यवस्थेचा परिणाम देखील संकलणावर होणार आहे.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment