Current affairs | Evening News Marathi
Current affairs 16 July 2019 Marathi |
16 जुलै 2019 करेंट अफेयर्स मराठी
कलराज मिश्रा: हिमाचल प्रदेश राज्याचे नवे राज्यपाल
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दिनांक 15 जुलै 2019 रोजी भाजपचे ज्येष्ठ नेते कलराज मिश्रा यांची हिमाचल प्रदेश राज्याचे राज्यपाल म्हणून नेमणूक केली तर तेथल्या सध्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची गुजरातचे राज्यपाल म्हणून बदली केली.गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली 15 जुलैला निवृत्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.
कलराज मिश्रा भाजपचे उत्तर प्रदेशमधले ज्येष्ठ नेते आहेत. आचार्य देवव्रत यांची 2015 साली पाच वर्षांसाठी हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून नेमणूक झाली होती. आता ते उर्वरित काळ गुजरातचे राज्यपाल म्हणून काम पाहतील.
कलराज मिश्रा सन 1978, सन 2001 आणि सन 2006 मध्ये राज्यसभा खासदार राहिलेले आहेत. 2012 साली त्यांनी लखनऊ येथून विधनसभेची जागा जिंकली होती. 2014 साली ते देवरिया येथून खासदार म्हणून निवडून आले होते.
राज्यपाल पद
भारतीय संविधानातील कलम 153 यानुसार, प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असणार. भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल आणि लेफ्टनंट-गव्हर्नर यांच्याकडे केंद्र पातळीवर भारताचे राष्ट्रपती यांच्या समान राज्य पातळीवर अधिकार असतात.
राज्यासाठी राज्यपाल पद तर केंद्रशासित प्रदेशासाठी आणि दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशासाठी लेफ्टनंट-गव्हर्नर पद अस्तित्वात आहे. त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.
दोन महत्वाच्या पात्रतेमध्ये, उमेदवाराचे वय किमान 35 वर्षे असावे आणि राज्य विधानमंडळाचा किंवा संसदेचा सदस्य असावा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 157 आणि कलम 158 मध्ये राज्यपाल पदासाठी पात्रतेचे निकष स्पष्ट करण्यात आले आहे.
मार्च 2020 मधील ISSF विश्वचषकाचा टप्पा भारतात होणार
आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) याने पुढच्या वर्षी खेळवले जाणारे ISSF विश्वचषकाचे टप्पे भारतात खेळवले जावेत यासाठीचा भारताचा अर्ज मंजूर केला आहे.घेतलेल्या निर्णयानुसार ISSF विश्वचषक स्पर्धेचा भाग असलेल्या रायफल / पिस्तूल / शॉटगन प्रकारांसाठी भारतात विविध स्पर्धा आयोजित केल्या जातील. ही स्पर्धा 15 मार्च ते 26 मार्च 2020 या काळात खेळवली जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF)
1907 साली आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) याची स्थापना झाली आणि त्याचे मुख्यालय म्यूनिच (जर्मनी) येथे आहे. दरवर्षी चार स्पर्धा खेळवल्या जातात. सर्वोत्तम नेमबाजांसाठी 1988 सालापासून ISSF विश्वचषक अंतिम ही स्पर्धा आयोजित करण्यात येते.

No comments:
Post a Comment