Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, June 17, 2019

    दैनिक बातम्या डायजेस्ट:17 June 2019 चालू घडामोडी | current updates Marathi

    113 Views
    नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र (NDIACविधेयक-2019 याला मंजुरी

    केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समितीने ‘नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र (NDIAC) विधेयक-2019’ याला मंजुरी दिली.

    हे विधेयक नवी दिल्लीत संस्थात्मक लवाद प्रकरणांमध्ये मध्यस्थीसाठी स्वतंत्र आणि स्वायत्त संस्था स्थापन करण्यास मदत करते. शिवाय हे विधेयक दि. 2 मार्च 2019 पासून प्रभावी करत आंतरराष्ट्रीय पर्यायी तंटा निवारण केंद्र याचे अधिग्रहण करण्यासाठी आणि त्याच्या कामकाजाची जबाबदारी NDIAC कडे हस्तांतरित करण्यासाठीच्या उद्देशाने आहे.

    प्रस्तावित NDIAC यामध्ये एक अध्यक्ष असणार, जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा तज्ञ व्यक्ती असणार.




    चीन-अमेरिका व्यापार युद्ध संपुष्टात आणण्यासाठी 600 अमेरिकी कंपन्यांचा राष्ट्रपती ट्रम्प यांना आग्रह

    अमेरिकेतल्या वॉलमार्ट सहित 600 हून अधिक कंपन्यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना चीनसोबत चाललेल्या व्यापार युद्धाचे निराकरण करण्याचा आग्रह केला आहे.
    या व्यापार युद्धामुळे अमेरिकेच्या व्यवसायावर आणि ग्राहकांवर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे कृषी, उत्पादन, किरकोळ आणि तंत्रज्ञान उद्योगाशी संबंधित 150 पेक्षा अधिक व्यापार गटांनी या पुढाकाराला पाठिंबा दिला आहे.
    माहितीनुसार 300 अब्ज डॉलरच्या आयातीवर लादल्या गेलेल्या अतिरिक्त 25% कराने अमेरिकेमधील 2 दशलक्ष रोजगार नष्ट होण्याचा धोका आहे. शिवाय सरासरी घरखर्च देखील वाढलेला आहे.
    व्यापार युद्धाचे पेव
    अमेरिका आणि चीन या देशांनी दि. 6 जुलै 2018 पासून एकमेकांकडून होणार्‍या आयातीवर अतिरिक्त शुल्क लादण्यास सुरुवात केली आहे. हे "आर्थिक इतिहासातले सर्वात मोठे व्यापार युद्ध" समजले जात आहे. व्यापार युद्धाने आर्थिक बाजारपेठेत अडथळा आणला आणि जागतिक आर्थिक वाढीस धक्का पोहचवलेला आहे.
    अमेरिकेकडून पोलाद आणि अॅल्युमिनियम उत्पादनांच्या आयात शुल्कामध्ये एकतर्फी वाढ केल्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका चीनला बसला. अमेरिकेने सुरू केलेल्या या व्यापार युद्धाचा सामना करण्यासाठी आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी चीननेही अमेरिकेकडून आयात केल्या जाणार्‍या वस्तूंवर अधिभार लादला.
    चीनबरोबर झालेल्या व्यापारात अमेरिकेला गेल्या वर्षी $337 अब्ज इतकी विक्रमी तूट सहन करावी लागली होती. त्यानंतर ही तुट भरून काढण्याकरिता अमेरिकेच्या प्रशासनाने पोलाद आयातीवर 25% आयात शुल्क आणि अॅल्युमिनियमवर 10% शुल्क लादला. अमेरिका जगातला सर्वात मोठा पोलाद आयातदार देश आहे, तर चीन सर्वात मोठा पोलाद निर्यातदार देश आहे. या निर्णयाला प्रतिसाद म्हणून चीनने देखील अमेरिकेकडून आयात केल्या जाणार्‍या उत्पादनांवर आयात शुल्क लादण्यासाठी एक योजना तयार केली आणि याप्रकारे व्यापार युद्धाला तोंड फुटले.
    अश्या युद्धामुळे जागतिक व्यापाराच्या वातावरणात अनिश्चितता वाढते, जागतिक भावना नकारात्मक पद्धतीने प्रभावित करते आणि जागतिक स्तरावर विकृत होण्याचा धोका वाढवते.



    एव्हरेस्टवर जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र उभारले
    एव्हरेस्ट या जगातल्या सर्वोच्च शिखरावर जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र उभारण्यात आले आहे.
    नॅशनल जियोग्राफिक सोसायटी आणि त्रिभुवन विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांनी तेथे एका अंतराने दोन हवामान केंद्रांची स्थापना केली आहे. एक केंद्र 8,430 मीटर (27,657 फूट) आणि दुसरे 7,945 मीटर (26,066 फूट) उंचीवर उभारण्यात आले आहे. तसेच, आणखी तीन केंद्र उभारले जात आहे.
    जागतिक तापमान वाढीचा हिमनद्यांवर कसा प्रभाव पडतो याचा अभ्यास करण्यासाठी लागणारी माहिती गोळा करण्याचा उद्देश आहे.
    हिमालय ही आशिया खंडात पसरलेली जगातली सर्वांत उंच पर्वतरांग आहे. हिमालय पर्वतरांगा भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते. येथे ‘एव्हरेस्ट’ (उंची 8848 मीटर) हे जगातले सर्वोच्च शिखर आहे. ह्या पर्वतरांगेची लांबी 2400 किलोमीटर पेक्षाही जास्त आहे. ही पर्वतरांग भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीन, भुटान या देशांमधून जाते.



    रितू करिधल आणि मुथैय्या वनिथा: चंद्रयान-2 मोहिमेच्या दोन महिला प्रमुख

    भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) पहिल्यांदाच दोन महिला शास्त्रज्ञांची एका अंतराळ मोहिमेसाठी प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे. रितू करिधल (मिशन डायरेक्टर) आणि मुथैय्या वनिथा (प्रकल्प संचालक) ही त्यांची नावे आहेत.
    ISRO 15 जुलैला चंद्रयान-2 मोहीम आंध्रप्रदेशाच्या श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केली जाईल.
    रितू करिधल यांना ‘रॉकेट वूमन ऑफ इंडिया’ असंही म्हटले जाते. त्या मंगळयान मोहिमेच्या म्हणजेच 'मार्स ऑर्बिटर मिशन'च्या डेप्युटी डायरेक्टरही होत्या. 2007 साली त्यांना माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते इस्रो यंग सायंटिस्ट पारितोषिक मिळाले. एम. वनिता यांच्याकडे डिजाईन इंजिनिअरिंगची पदवी आहे. त्यांना अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाकडून 2006 साली बेस्ट वुमन सायंटिस्ट पारितोषिक मिळाले आहे. त्यांनी अनेक वर्ष उपग्रहांवर काम केले आहे.
    चंद्रयान-2 मोहीम
    चंद्रयान-2 ही अत्यंत महत्त्वाची अंतराळ मोहीम असून यात एक ऑर्बिटर आहे, एक 'विक्रम' नावाचे लँडर आहे आणि एक 'प्रज्ञान' या नावाचे रोव्हर आहे. 3.8 टन वजन असलेली चंद्रयान-2 या अंतराळ मोहिमेचा संपूर्ण खर्च हा 600 कोटीपेक्षा अधिक असल्याचे म्हटले जात आहे.
    या मोहिमेद्वारे पहिल्यांदाच भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. असे झाले तर चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करणाऱ्या देशांच्या पंक्तीत भारताचा समावेश होईल. याआधी ऑक्टोबर 2008 मध्ये ISRO चंद्रयान-1 या यानाला चंद्रावर पाठवले होते.


    UNCTAD याचा जागतिक गुंतवणूक अहवाल 2019

    संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) कडून त्याचा ‘जागतिक गुंतवणूक अहवाल 2019’ याच्यानुसार, 2018 साली भारतात 42 अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक (FDI) झाली.
    ठळक बाबी
    • दक्षिण आशियाई क्षेत्रात झालेल्या FDIपैकी जवळपास 77% गुंतवणूक भारतात झाली. भारतातली FDI गुंतवणूक 6 टक्क्यांनी वाढून 42 अब्ज डॉलर एवढी झाली.
    • सन 2018 मध्ये जागतिक FDIमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेनी 13% घट झाली, जी 1.3 लक्ष कोटी (महादम) डॉलर एवढी होती.
    • FDIसाठी एक स्त्रोत म्हणून असलेल्या देशांच्या यादीत भारताचे स्थान एका क्रमांकाने घसरून 10 व्या स्थानी आले आहे.
    • दक्षिण आशियाई क्षेत्रातल्या इतर देशांमध्ये बांग्लादेश आणि श्रीलंका या देशांमध्ये विक्रमी गुंतवणूक झाली, जी अनुक्रमे 3.6 अब्ज डॉलर आणि 1.6 अब्ज डॉलर एवढी होती. तर पाकिस्तानामध्ये 27 टक्क्यांची घट होत 2.4 अब्ज डॉलर एवढी गुंतवणूक झाली आहे.
    UNCTAD बाबत
    संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) याची स्थापना 1964 साली करण्यात आली. त्याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे. संघटनेला 16 एप्रिल 1985 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने स्वीकारले आणि 22 डिसेंबर 2015 रोजी त्याला सुधारित केले गेले.
    ही संघटना व्यापार, गुंतवणूक आणि विकास मुद्दे संबंधित क्षेत्रात एक प्रमुख म्हणून कार्य करते. सध्या, UNCTAD चे 194 सदस्य राज्ये आणि देश आहेत.


    महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार

    महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार

    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार दि. 16 जून 2019 रोजी करण्यात आला.
    त्यामध्ये 13 नव्या सदस्यांचा समावेश करण्यात आला. नवीन सदस्यांना मंत्रीमंडळात स्थान देताना सहा सदस्यांना वगळण्यात आले आहे. राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरिष अत्राम यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले असून मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारले आहेत.
    नव्या मंत्रीमंडळतात भाजपाला दहा, शिवसेना दोन आणि RPI ला एक मंत्रीपद दिले आहे. शिवसेनेनी उपमुख्यमंत्रीपद नाकारल्यामुळे त्यांना दोन मंत्रीपदे देण्यात आली आहेत.
    नवे कॅबिनेट मंत्री - राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त शिरसागर, डॉ. आशिष शेलार, डॉ. संजय कुटे, सुरेश दगडू खाडे, डॉ. अनिल बोंडे, डॉ. अशोक उईके, तानाजी जयवंत सावंत
    नवे राज्यमंत्री - योगेश सागर, अविनाश माहतेकर, संजय भेगडे, परिणय फुके, अतुल सावे




    No comments:

    Post a Comment

    Menu

    Contact Form

    Name

    Email *

    Message *