Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Monday, July 15, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 15 July 2019 Marathi | 15 जुलै 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 15 July  2019 Marathi | 
      15 जुलै 2019 करेंट अफेयर्स मराठी


    AIIB भारतातल्या अक्षय ऊर्जेसंबंधी पायाभूत प्रकल्पांसाठी L&T ला $100 दशलक्षचे कर्ज देणार

    भारतातल्या पवन आणि सौर ऊर्जेसंबंधी पायाभूत प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने, आशियाई पायाभूत सुविधा विकास बँक (AIIB) एल अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीला 100 दशलक्ष डॉलरचे कर्ज देण्याचे मान्य केले आहे. AIIB ने एखाद्या बिगर-बँकिंग वित्त कंपनीला कर्ज देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
    AIIBच्या या नव्या प्रकल्पामुळे खासगी भांडवल उभारण्यात मदत मिळून भारतात अक्षय ऊर्जेचा पुरवठा वाढेल.
    2022 सालापर्यंत भारताने 175 गीगावॉट (GW) अक्षय ऊर्जा क्षमता प्रस्थापित करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे, ज्यापैकी मे 2019 पर्यंत देशात 80.04 GW क्षमता प्रस्थापित केली गेली आहे.
    आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे आणि जानेवारी 2016 पासून ही सेवेत आहे. त्याचे मुख्यालय बिजींग (चीन) येथे आहे. जगभरात त्याचे 86 सदस्य आहेत. ही बँक आशियामधील पायाभूत सुविधांसंबंधी विकास प्रकल्पांसाठी आर्थिक मदत प्रदान करते.



    इंग्लंड: ICC विश्वचषक 2019 स्पर्धेचा विजेता

    यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय प्राप्त करीत यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडला विश्वविजयाचा मान मिळाला आहे.
    न्यूझीलंडला विश्वचषक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
    इंग्लंडच्या बेन स्टोक्स ह्याला अंतिम सामन्याच्या सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने स्पर्धावीराचा पुरस्कार मिळविला.
    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)
    ICC हे क्रिकेट खेळासाठीचे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक मंडळ आहे. सन 1909 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींनी ICC ची ‘इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ या नावाने स्थापना केली होती आणि सन 1989 मध्ये याला वर्तमान नाव प्राप्त झाले. ICC चे मुख्यालय संयुक्त अरब अमिरात (UAE) देशाच्या दुबई शहरात आहे. ICCचे 105 सदस्य संघ आहेत आणि त्यात 12 पूर्ण सदस्य आहेत, जे कसोटी सामने खेळतात.
    आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) दर चार वर्षांनी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन करते. 1975 साली सर्वप्रथम एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले.

    No comments:

    Post a Comment