Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, April 17, 2019

    Current affairs | Evening News Marathi Current affairs 17 April 2019 Marathi | 17 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी

    Views

    20181211_220219

    Current affairs | Evening News Marathi
    Current affairs 17  April 2019 Marathi |   
    17 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी

    गोल्फपटू टायगर वूड्सने ‘2019 मास्टर्स चॅम्पियनशिप’ स्पर्धा जिंकली

    अमेरिकेचा गोल्फपटू टायगर वूड्स ह्यांनी ऑगस्टा नॅशनल (अमेरिका) येथे खेळल्या गेलेल्या ‘2019 मास्टर्स अजिंक्यपद’ या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आणि पाचव्यांदा हिरव्या रंगाचा जाकीट जिंकला.
    स्पर्धेविषयी
    ‘मास्टर्स अजिंक्यपद’ (मास्टर्स टूर्नामेंट किंवा मास्टर्स किंवा यू.एस. मास्टर्स) ही चार प्रमुख व्यवसायिक गोल्फ स्पर्धांपैकी एक आहे. ही स्पर्धा ऑगस्टा (जॉर्जिया, अमेरिका) या शहरात दरवर्षी खेळवली जाते. 1934 साली पहिल्यांदा ही स्पर्धा  खेळवली गेली. 1949 सालापासून स्पर्धेच्या विजेत्याला हिरवे जाकीट देण्यात येते, जे विजय मिळविल्यानंतर एक वर्षानंतर क्लबहाऊसला परत केले जाते.

    स्वदेशी ‘निर्भय’ या सब सॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

    स्वदेशी बनावटीच्या आणि देशातच विकसित केलेल्या लांब पल्ल्याच्या ‘निर्भय’ या प्रथम सब-सॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची ओडिशातल्या चंदीपूर येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली.
    संरक्षण संशोधन व विकास संस्थेने ही चाचणी घेतली. चाचणीसाठी ठेवण्यात आलेल्या सर्व उद्दिष्टांची पूर्तता झाली.
    ‘निर्भय’ क्षेपणास्त्र समुद्रसपाटीपासून अतिशय कमी उंचीवर असलेले लक्ष्य भेदले जाऊ शकते. त्याची मारा क्षमता 1000 किलोमीटर एवढी आहे. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (DRDO) बेंगळुरूमधील प्रगत संरक्षण आस्थापनाद्वारे (ADE) संरचित आणि विकसित केले गेले आहे.


    यंदा 96% पाऊस पडणार: भारतीय हवामान खात्याचा मान्सून अंदाज

    यावर्षी समाधानकारक पाऊस होणार असून, एकूण सरासरीच्या 96% पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.
    यंदा अल निनोचा धोका असणार आहे, मात्र त्याचा प्रभाव कमी असेल. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदा सरासरीच्या 95-104% सामान्यत: मान्सून येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
    अंदाजानुसार, जून ते ऑगस्ट या काळात समप्रमाणात पाऊस पडेल. राजस्थानजवळील चक्रीय वात स्थितीमुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यांचा परिणाम म्हणून राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यापूर्वी 2014 आणि 2015 मध्ये अल निनोमुळे कमी पाऊस पडला होता.
    भारत हवामान विभाग (IMD) बाबत
    भारत हवामान विभाग (IMD) हा भारत सरकारच्या भूगर्भशास्त्र मंत्रालयाची एक संस्था आहे. त्याची स्थापना सन 1875 मध्ये हेन्री फ्रान्सिस ब्लॅनफोर्ड यांनी केली होती आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.



    जागतिक पातळीवर गोवर आजाराच्या प्रकरणांमध्ये 300% वाढ झाली: WHO

    गेल्या वर्षीच्या तुलनेत 2019 सालाच्या पहिल्या तिमाहीत जागतिक पातळीवर गोवर आजाराच्या प्रकरणांमध्ये 300% वाढ झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) धोक्याचा इशारा दिला आहे.
    जगाच्या सर्व भागांमध्ये या आजाराचा उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी आतापर्यंत 170 देशांमध्ये गोवर आजाराच्या 112,163 प्रकरणांची नोंद झाली, जेव्हा की 2018 साली 163 देशांमध्ये 28,124 प्रकरणांची नोंद झाली होती.
    याबाबतीत आफ्रिकेत सर्वाधिक वाढ पाहिली गेली आहे, ज्यानुसार केवळ एका वर्षाच्या काळात प्रकरणांमध्ये 700 टक्क्यांची वाढ झाली.
    गोवर आजार
    गोवर आजार हवेच्या मार्गाने पसरतो आणि हा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. हा आजार ‘पॅरामिक्झो’ नावाच्या विषाणूमुळे होतो.
    या आजारात एक्झॅन्थम या नावाने ओळखले जाणारे पुरळ त्वचेवर येतात. हा आजार प्राणघातक असू शकतो. प्रगत आरोग्यसेवा प्रणालीसह अनेक देशांमधून या आजाराचे उच्चाटन झाल्याची अधिकृत नोंद आहे.
    सध्याच्या गोवर लसीकरणाच्या प्रथेआधी दर दोन किंवा तीन वर्षानी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात गोवराची साथ येत असे. माणसाला कोणत्याही वयात एकदा गोवर होऊन गेला की त्याला तो पुढच्या आयुष्यात परत होत नाही.
    मिजल्स अँड रुबेला इनिशीएटिव्ह (MR&I) ही गोवर रोगासंबंधी समस्येला हाताळण्यासाठी सन 2001 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ बालकोष (UNICEF), जागतिक आरोग्य संघटना (WHO), UN फाउंडेशन, अमेरिकन रेड क्रॉस आणि US सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन यांनी संयुक्तपणे स्थापित केलेली संस्था आहे.



    आसाममध्ये ‘रोंगाली बिहू’ सण साजरा केला जात आहे

    आसाममध्ये ‘रोंगाली बिहू’ सण साजरा केला जात आहे, ज्याचा शुभारंभ दिनांक 15 एप्रिल 2019 रोजी झाला. “रोंगाली बिहू” हा आसामातल्या या तीन सणांपैकी महत्वाचा आहे जो आसामी नववर्षाशी तसेच वसंत उत्सवाशी संबंधित आहे. हा मुख्यत: पेरणीचा सण आहे.
    आसामचा बिहू सण
    आसाम या राज्याचा ‘बिहू’ हा एक महत्वपूर्ण सण आहे. त्यामध्ये तीन प्रकारच्या वेगवेगळ्या सणांचा एकत्रितपणे समावेश होतो. “कोंगाली किंवा काटी बिहू” हा ऑक्टोबर महिन्यात संपन्न होतो. तर “भोगाली किंवा माघ बिहू” हा जानेवारी महिन्यात साजरा केला जातो. “रोंगाली बिहू” हा एप्रिल महिन्यात साजरा होतो.
    सणानिमित्त राज्यात विविध पक्वान तयार केले जातात तसेच संगीत आणि नृत्य यांच्या जोडीने हा सण आसामी लोक साजरा करतात. या सणाचा सोहळा सात दिवस साजरा केला जातो. ज्याच्या सात दिवसांना अनुक्रमे छोट बिहू, गोरु बिहू, मनु बिहू, कुटुम बिहू, सेनेही बिहू, मेला बिहू आणि चेरा बिहू म्हटले जाते.



    आसाममध्ये ‘रोंगाली बिहू’ सण साजरा केला जात आहे

    आसाममध्ये ‘रोंगाली बिहू’ सण साजरा केला जात आहे, ज्याचा शुभारंभ दिनांक 15 एप्रिल 2019 रोजी झाला. “रोंगाली बिहू” हा आसामातल्या या तीन सणांपैकी महत्वाचा आहे जो आसामी नववर्षाशी तसेच वसंत उत्सवाशी संबंधित आहे. हा मुख्यत: पेरणीचा सण आहे.
    आसामचा बिहू सण
    आसाम या राज्याचा ‘बिहू’ हा एक महत्वपूर्ण सण आहे. त्यामध्ये तीन प्रकारच्या वेगवेगळ्या सणांचा एकत्रितपणे समावेश होतो. “कोंगाली किंवा काटी बिहू” हा ऑक्टोबर महिन्यात संपन्न होतो. तर “भोगाली किंवा माघ बिहू” हा जानेवारी महिन्यात साजरा केला जातो. “रोंगाली बिहू” हा एप्रिल महिन्यात साजरा होतो.
    सणानिमित्त राज्यात विविध पक्वान तयार केले जातात तसेच संगीत आणि नृत्य यांच्या जोडीने हा सण आसामी लोक साजरा करतात. या सणाचा सोहळा सात दिवस साजरा केला जातो. ज्याच्या सात दिवसांना अनुक्रमे छोट बिहू, गोरु बिहू, मनु बिहू, कुटुम बिहू, सेनेही बिहू, मेला बिहू आणि चेरा बिहू म्हटले जाते.



    2018-19 या आर्थिक वर्षात भारताच्या पोलाद आयातीत सर्वाधिक वाढ दिसून आली

    2018-19 या आर्थिक वर्षात भारताच्या पोलाद आयातीत सर्वाधिक वाढ दिसून आली असून भारत पोलादाचा (steel) निव्वळ आयातदार होता.
    गेल्या तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच, देशात उच्च दर्जाच्या पोलादाची मागणी वाढल्याने पारंपरिक पोलाद खरेदीदार आणि आयातीसंदर्भात बाजारपेठेतल्या भारताच्या हिस्स्यात घट झाल्याचे दिसून आले आहे.
    मार्च महिन्यात संपलेल्या 2018-19 या आर्थिक वर्षात देशाच्या एकूण पोलादाच्या निर्यातीत 34% घट झाली असून निर्यात 6.36 दशलक्ष टन एवढी झाली. त्याच कालावधीत पोलादाची आयात 4.7 टक्क्यांनी वाढून ती 7.84 दशलक्ष टन एवढी झाली.



    CAG कार्यालयात उपनियंत्रक व महालेखा परीक्षक पद तयार करण्यास मान्यता

    केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) कार्यालयात ‘उपनियंत्रक व महालेखा परीक्षक (समन्वय, दळणवळण व माहिती प्रणाली)’ हे पद तयार करण्यास मान्यता देण्यात आली.
    STS स्तरावरचे एक पद रद्द करुन ‘वेतनमान स्तर-17’ यामध्ये हे पद निर्माण करण्यात आले आहे.
    भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाच्या अंतर्गत विभिन्न माहिती प्रणाली देखरेख राज्य लेखाधिकाऱ्यांमधला समन्वय राखण्याचे काम नियंत्रक आणि महालेखा परीक्षक करणार आहे. या पदाच्या निर्मितीसाठी सुमारे 21 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

    युरोपीय संघाने कॉपीराइट संदर्भातले नियम कठोर केलेत

    1 लक्ष कोटी डॉलर एवढी उलाढाल असलेल्या युरोपीय संघाच्या कलात्मक उद्योगांसाठी योग्य मोबदला मिळावा हे सुनिश्चित करण्याकरिता युरोपीय संघाच्या सरकारने डिजिटल सामुग्रीच्या कॉपीराइट (संरक्षण) संदर्भात नवे नियम तयार केले आहेत.
    नवे नियम आणखीनच कठोर केले गेले आहेत. त्या नियमांच्या अंतर्गत आता EU मधील कंपन्यांना गुगल कंपनीला भरपाई द्यावी लागणार आहे आणि फेसबुकला सामुग्री संरक्षित करावी लागणार.
    युरोपीय संघातल्या कलात्मक उद्योगांनी आज 11.7 दशलक्ष लोकांना रोजगार दिलेला आहे. नवीन नियमांनुसार, गुगल व इतर ऑनलाइन व्यासपीठांना संगीतकार, कलाकार, लेखक, वृत्तपत्र प्रकाशक आणि पत्रकारांशी त्यांनी केलेले कार्य वापरण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी परवान्यासंदर्भात करार करणे आवश्यक आहे.
    युरोपीय संघ (EU) हा 28 सदस्य राज्यांचा राजकीय आणि आर्थिक संघ आहे, जे प्रामुख्याने युरोप खंडात आहेत. युरोपीय संघाची स्थापना दिनांक 1 नोव्हेंबर 1993 रोजी झाली आणि याचे मुख्यालय ब्रुसेल्स (बेल्जियमची राजधानी) येथे आहे.

    No comments:

    Post a Comment