एका ओळीत सारांश, 18 जून 2019
दिनविशेष
जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळ प्रतिबंधक दिन (17 जून) – लेट्स ग्रो द फ्यूचर टुगेदर.
पर्यावरण
या शिखरावर जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र उभारले गेले - एव्हरेस्ट.
राष्ट्रीय
या ठिकाणी ‘आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र (IAC)’ स्थापन केले जाणार - नवी दिल्ली.
क्रिडा
भारतातर्फे सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारा दुसर्या क्रमांकाचा खेळाडू - महेंद्रसिंग धोनी (341) (पहिला सचिन तेंडुलकर).
सर्वात जलद 11,000 धावांचा टप्पा गाठण्याचा नवा विक्रम करणारा फलंदाज - भारतीय कर्णधार विराट कोहली (230 सामन्यांतील 222 डाव).
विज्ञान व तंत्रज्ञान
ISROच्या ‘चंद्रयान-2’ मोहिमेच्या दोन महिला प्रमुख - रितू करिधल (मिशन डायरेक्टर) आणि मुथैय्या वनिथा (प्रकल्प संचालक).
सामान्य ज्ञान
भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह - लोकसभा.
भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेच्या सदस्यांची कमाल संख्या - 552.
पहिली लोकसभा - 17 एप्रिल 1952.
संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) - स्थापना वर्ष: सन 1964; मुख्यालय: जिनेव्हा (स्वित्झर्लंड).
आशिया खंडात पसरलेली जगातली सर्वांत उंच पर्वतरांग - हिमालय.
जगातले सर्वोच्च शिखर - एव्हरेस्ट (उंची 8848 मीटर).
No comments:
Post a Comment