Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, July 17, 2019

    Oneline Gk 17 July 2019 / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 17 जुलै 2019 हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Views

    PicsArt_02-09-11.01.56


     Oneline Gk 17 July 2019 / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 4 जुलै 2019 हिंदी/ इंग्लिश/मराठी

    Oneline Gk 4 July 2019 / एका ओळीत जीके / एक पंक्ति में जी के 4 जुलै 2019 हिंदी/ इंग्लिश/मराठी
    एका ओळीत सारांश, 17 जुलै 2019

    अर्थव्यवस्था

    • बुडीत मालमत्तेच्या जोखीम व्यवस्थापनाशी संबंधित नियमांचे पालन न केल्याप्रकरणी RBIने या बँकेला 7 कोटी रुपयांचा दंड ठोठावला - भारतीय स्टेट बँक (SBI).
    • जून 2019 मध्ये भारताची झालेली निर्यात - 25.01 अब्ज डॉल.
    • जुलै 2019 मध्ये सरकारने निर्धारित केलेला सामान्य भविष्य निधी (GPF) यावरील व्याजदर - 7.9%.
    • जून 2019 मध्ये भारताची व्यापारातली तूट - 15.28 अब्ज डॉल.

    आंतरराष्ट्रीय

    • आंतरराष्ट्रीय सौर संधी (ISA) याचा भाग बनणारा 76 वा देश - पलाऊ.

    राष्ट्रीय

    • भारतातल्या महिलांना डिजिटल कृतींचा अवलंब करण्यास शिकविण्यासाठी GSMAच्या ‘कनेक्टेड विमेन’ या उपक्रमासाठी या दूरसंचार कंपनीने भागीदारी केली - रिलायन्स जियो.
    • पंजाब आणि ओडिशासह 20 राज्यांमध्ये इंटरनेट वापरण्याविषयी भारतातल्या ग्रामीण स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी टाटा ट्रस्टसोबत गूगल इंडियाचा कार्यक्रम - - इंटरनेट साथी कार्यक्रम.

    व्यक्ती विशेष

    • 15 जुलैला या राज्यसभा खासदाराने राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला - नीरज शेखर.
    • यशवंत सिन्हा यांची आत्मकथा - रिलेंटनेस.
    • 1 ऑगस्टपासून सिंगापूर इंटरनॅशनल कमर्शियल कोर्ट (SICC) याचे आंतरराष्ट्रीय न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेले भारतीय - न्यायाधीश ए. के. सिक्री (सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश).
    • 15 जुलैला साहित्य अकादमी विजेत्या या आसामी साहित्यिकाचा मृत्यू झाला - पुरोबी बोर्मूदेय.
    • 'शंतनुकुलानंदन' या पुस्तकाचे लेखक - पुरोबी बोर्मूदेय.

    क्रिडा

    • 2020 ISSF विश्वचषक स्पर्धेच्या रायफल / पिस्तूल / शॉटगन या प्रकारांसाठीचे टप्पे या देशात खेळवले जाणार – भारत (15 मार्च ते 26 मार्च 2020).

    राज्य विशेष

    • आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत, बंडखोर लेखक आणि दलित पँथर या सामाजिक संघटनेचे संस्थापक राहलेल्या या व्यक्तीचे 16 जुलैला निधन झाले - राजा ढाले(महाराष्ट्र).
    • महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल - विद्यासागर राव.
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे (औरंगाबाद) नवे कुलगुरू - डॉ. प्रमोद गोविंदराव येवले.
    • हिमाचल प्रदेश राज्याचे नवे राज्यपाल - कलराज मिश्रा.
    • गुजरातचे नवे राज्यपाल - आचार्य देवव्रत.

    सामान्य ज्ञान

    • राज्याच्या राज्यपाल पदासाठी भारतीय संविधानातली तरतूद - कलम 153.
    • आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) - स्थापना वर्ष: सन 1907; मुख्यालय: म्यूनिच (जर्मनी).
    • आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याचे मुख्यालय: गुरुग्राम,भारत.
    • हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी - शिमला.
    • गुजरात राज्याची राजधानी - गांधीनगर.
    • पलाऊ - राजधानी: जेरूलमड; चलनः युनायटेड स्टेट्स डॉलर

    No comments:

    Post a Comment