Current affairs | Evening News Marathi
Current affairs 22 June 2019 Marathi |
22 जून 2019 करेंट अफेयर्स मराठी
तेलंगणाचा कालेश्वरम प्रकल्प: जगातला सर्वात मोठा बहू-स्तरीय, बहुउद्देशीय उपसा सिंचन प्रकल्प
दिनांक 21 जून 2019 रोजी आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री जगन रेड्डी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कालेश्वरम सिंचन प्रकल्पाचे उद्घाटन केले. या प्रकल्पाला “जगातला सर्वात मोठा बहू-स्तरीय, बहुउद्देशीय उपसा सिंचन (lift irrigation) प्रकल्प” असे संबोधले जात आहे.
प्रकल्पाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सीमेजवळ जयशंकर भुपालपल्ली जिल्ह्यातल्या प्रकल्प स्थळावर करण्यात आले.
80,000 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प गोदावरी नदीवर बांधण्यात आला आहे, जे अर्धा किलोमीटरच्या उंचीपर्यंत पाण्याच्या उपसा करणार. हा प्रकल्प वर्षात दोन पिक घेण्यासाठी तेलंगणा राज्यातल्या 31 जिल्ह्यांपैकी 20 मधील सुमारे 45 लक्ष एकरच्या कृषी-भूमीला सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे तसेच राज्याची 70% पिण्याच्या पाण्याची गरज भागवणार.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- ग्रेटर हैदराबाद येथील एक कोटी लोकसंख्येला दररोज पिण्याचे पाणी पुरवण्यास ही योजना मदत करेल.
- पिण्याचे उद्दीष्ट आणि औद्योगिक गरजा पुरविण्याव्यतिरिक्त, गोदावरी नदीचे 195 tmcft पाणी सिंचनासाठी वळवले जाईल.
- प्रकल्प दररोज 2 tmcft पाण्याचा उपसा करू शकते. पुढील वर्षापासून या क्षमतेत आणखी एक tmcft जोडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
- 203 किलोमीटर एवढ्या लांबीचा जगातला सर्वाधिक दीर्घ पाण्याचा बोगदा (वॉटर-टनेल) या प्रकल्पामध्ये आहे आणि 139 मेगावॅट एवढ्या कमाल क्षमतेच्या सात पंपांचा येथे वापर केला गेला, ज्याचा वापर सध्या देशात कुठेही केला जात नाही.
- रामाडूगू पंपिंग स्टेशन हे 330 मीटर एवढ्या जमिनीच्या खोलीत तयार केले गेले आहे, जे की पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बांधकाम जमिनीखाली करण्यात आले आहे.
- प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाला 7,000 मेगावॅट वीजेची आवश्यकता असेल असा अंदाज आहे.
- प्रकल्पाने जगातला सर्वाधिक दीर्घ पाण्याचा बोगदा (वॉटर-टनेल), कृत्रिम जलमार्ग, भूमिगत अवजड उपसा आणि सर्वाधिक क्षमतेचे पंप असे अनेक विक्रम तयार केले आहेत.
प्रकल्पाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्राने तेलंगणाला पूर्ण सहकार्य केले आहे. 2016 साली दोन्ही दोन राज्यांनी पाणीवाटपाच्या संदर्भात आंतरराज्य विवादांचे निराकरण करण्यासाठी करार केला होता आणि प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला. 2016 साली या प्रकल्पाचे भूमिपूजन केले गेले आणि तीन वर्षांच्या विक्रमी वेळात प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम केले गेले.
गोदावरी नदी
गंगा नंतर गोदावरी ही भारताची दुसरी सर्वात मोठी नदी आहे. त्याचा उगम महाराष्ट्र राज्यातल्या त्र्यंबकेश्वर गावात होतो. ही नदी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा या राज्यांमधून वाहत जाते आणि पूर्वेकडे 1,465 किलोमीटरचा प्रवास करून शेवटी उपनद्याच्या विस्तृत जाळ्याद्वारे बंगालच्या उपसागराला मिळते.
भारताचा ‘पंतप्रधान योग पुरस्कार 2019’
दिनांक 21 जून 2019 रोजी रांची येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने, भारत सरकारच्या AYUSH मंत्रालयाने 2019 या सालासाठी ‘योग याचा प्रसार आणि विकास करण्यासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पंतप्रधान पुरस्कार’ या पुरस्काराच्या विजेत्यांची नावे जाहीर केली.
विजेते -
- वैयक्तिक (राष्ट्रीय) श्रेणी - लाइफ मिशन या संस्थेचे स्वामी राजर्षी मुनी (गुजरात)
- वैयक्तिक (आंतरराष्ट्रीय) श्रेणी - इटलीच्या अँटोनिटा रोझी
- संघटना (राष्ट्रीय) श्रेणी - बिहार स्कूल ऑफ योग, मुंगेर
- संघटना (आंतरराष्ट्रीय) श्रेणी - जपान योग निकेतन, जपान
पुरस्काराविषयी
दिनांक 21 जून 2016 रोजी द्वितीय आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने चंदीगड येथे झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘योग याचा प्रसार आणि विकास करण्यासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पंतप्रधान पुरस्कार’ जाहीर केला होता.
हा पुरस्कार भारत सरकारच्या आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (AYUSH) मंत्रालयाच्यावतीने दिला जातो. विजेत्यांची निवड मंत्रालय एका समितीद्वारे करतो. विजेत्याला पुरस्काराच्या स्वरुपात एक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 25 लक्ष रुपये रोख रक्कम दिली जाते.

No comments:
Post a Comment