एका ओळीत सारांश, 23 जून 2019
दिनविशेष
जागतिक वर्षावन दिन – 22 जून.
अर्थव्यवस्था
भारतीय प्रतिस्पर्धी आयोगाने (CCI) इंडियनबुल्स हाउसिंग फायनान्स आणि या बँकेचे विलीनीकरण मंजूर केले - लक्ष्मी विलास बँक.
राष्ट्रीय
गोदावरी नदीवर बांधण्यात आलेला जगातला सर्वात मोठा बहू-स्तरीय, बहुउद्देशीय उपसा सिंचन प्रकल्प - तेलंगणाचा कालेश्वरम प्रकल्प.
हायड्रोथेरपीचा वापर करुन जखमी हत्तींचा उपचार करण्यासाठी, भारतात या ठिकाणी पहिले हत्ती रुग्णालय उघडले गेले - मथुरा, उत्तरप्रदेश (यमुना नदीच्या काठी).
व्यक्ती विशेष
वैयक्तिक (राष्ट्रीय) श्रेणीत ‘योग याचा प्रसार आणि विकास करण्यासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पंतप्रधान पुरस्कार 2019’ याचे विजेता/ती - स्वामी राजर्षी मुनी (लाइफ मिशन, गुजरात).
क्रिडा
झेक प्रजासत्ताकमधील ‘ऑस्ट्राव्हा गोल्डन स्पाइक अॅथलेटिक्स मीट 2019’ या स्पर्धेत महिलांच्या भालाफेक गटात कास्यपदक जिंकणारी भारतीय खेळाडू - अन्नू रानी.
या भारतीय स्नूकर खेळाडूने दोहा येथे 35 व्या पुरुष आशियाई स्नूकर अजिंक्यपद 2019 ही स्पर्धा जिंकली - पंकज अडवानी.
राज्य विशेष
आंध्रप्रदेश राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री - जगन रेड्डी.
तेलंगणा राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री - के. चंद्रशेखर राव.
सामान्य ज्ञान
पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन – सन 2015.
भारत सरकारच्या आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (AYUSH) मंत्रालयाचे स्थापना वर्ष – सन 2014.
60 मिटर हून अधिक अंतरावर भाला फेकणारी पहिली भारतीय महिला - अन्नू रानी.
या देशामध्ये 1961 सालापासून गोल्डन स्पाइक हा वार्षिक क्रिडा कार्यक्रम आयोजित केला जातो - झेक प्रजासत्ताक.
आशियाई बिलियर्ड क्रिडा महासंघ (ACBS) – स्थापना वर्ष: सन 1984; मुख्यालयः दोहा, कतार.
भारतातली दुसरी सर्वात दीर्घ नदी, जी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा या राज्यांमधून वाहते - गोदावरी नदी (1,465किलोमीटर).
No comments:
Post a Comment