दिनविशेष
आंतरराष्ट्रीय योग दिन 2019 (21 जून) याची संकल्पना – योग फॉर हार्ट.
जागतिक मानवतावादी दिन - 21 जून.
जागतिक जलशास्त्र दिन 2019 (21 जून) याची संकल्पना – हायड्रोग्राफीक इन्फॉर्मेशन ड्रायविंग मरीन नॉलेज.
जागतिक निर्वासित दिन 2019 (20 जून) याची संकल्पना – टेक ए स्टेप ऑन वर्ल्ड रेफूजी डे.
अर्थव्यवस्था
या ई-वाणिज्य कंपनीने वित्तीय संस्था आणि दुर्लक्षित विक्रेत्यांमधील अंतर भरून काढण्यासाठी ‘ग्रोथ कॅपिटल’ नावाचा उपक्रम चालू केला - फ्लिपकार्ट.
2019-20 या आर्थिक वर्षासाठी DBS बँकेनी सुधारित केलेला भारताचा GDP वृद्धीदर - 6.8%.
PFRDA द्वारे प्रशासित केली जाणारी अटल पेंशन योजना ग्राहकांसाठी खुली करणारी भारतातली पहिली पेमेंट बँक - एअरटेल पेमेंट्स बँक.
आंतरराष्ट्रीय
‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ याच्यानुसार, जगातले सर्वोत्कृष्ट विद्यापीठ - मॅसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT), अमेरिका.
जगातला सर्वात मोठा मल्टी-स्टेज लिफ्ट सिंचन प्रकल्प, जो भारतात गोदावरी नदीवर बांधण्यात आला आहे आणि ते दोन पिकांसाठी 45 लक्ष एकरावर सिंचन सुविधा प्रदान करते - कलेश्वरम प्रकल्प (तेलंगणा).
राष्ट्रीय
‘QS जागतिक विद्यापीठांची मानांकन यादी 2020’ याच्यानुसार, भारतातले सर्वोत्कृष्ट विद्यापीठ - भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (IITबॉम्बे) (152 वे).
भारत सरकारच्या या प्रकल्पाच्या अंतर्गत 2022 सालापर्यंत 35000 किलोमीटरचे महामार्ग बांधले जाणार – भारतमाला.
18 जूनला केंद्र सरकारने भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या आयकर विभागातील इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्ती दिली - 15.
टीमलिझ सर्व्हिसेजच्या 'एम्प्लॉयमेंट आऊटलुक' या अहवालानुसार, किरकोळ आणि फास्ट मुविंग कंझ्युमर गूड्स अँड ड्युरेबल्स (FMCG&D) या क्षेत्रामध्ये एकत्रितपणे 2019-20 या आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीत निर्माण होणार्या नव्या नोकर्यांची अंदाजित संख्या - 2.76 लक्ष.
व्यक्ती विशेष
दक्षिण आफ्रिकेमध्ये इस्लामी चळवळीचे प्रमुख समजल्या जाणार्या भारतीय वंशाच्या या व्यक्तीचे 19 जूनला निधन झाले - शावकत अली थोकन.
ब्रिटीश हेराल्ड या मासिकानुसार, वाचकांच्या मते जगातला सर्वात शक्तिशाली व्यक्ती 2019 – भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी.
क्रिडा
आफ्रिका खंडासाठी FIFA चे नवे जनरल डेलीगेट - फातमा समौरा (FIFAचे सरचिटणीस).
सामान्य ज्ञान
प्रादेशिक हवाई संपर्क देणारी भारत सरकारची योजना - UDAN (उडे देश का आम नागरिक).
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (FIFA) – स्थापना वर्ष: सन 1904; मुख्यालय: झ्युरिक (स्वित्झर्लंड).
दक्षिण आफ्रिका – राजधानी: केप टाउन (संविधानक); राष्ट्रीय चलन: दक्षिण आफ्रिकन रँड.
निवृत्तीवेतन निधी नियामक व विकास प्राधिकरण (Pension Fund Regulatory and Development Authority -PFRDA) याचे स्थापना वर्ष – सन 2003.
No comments:
Post a Comment