Current affairs | Evening News Marathi
Current affairs 6 April 2019 Marathi |
6 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
ADBचा 'एशियन डेव्हलपमेंट आऊटलुक 2019' अहवाल प्रसिद्ध
मनिला येथील आशियाई विकास बँकेनी (ADB) 'एशियन डेव्हलपमेंट आऊटलुक (ADO) 2019' या शीर्षकाखाली त्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.कमकुवत जागतिक मागणी आणि महसुलातल्या तूटीतली वाढ त्यामुळे 2019-20 या आर्थिक वर्षासाठी भारताचा वृद्धीदर पूर्वीच्या 7.6% यावरून 7.2% एवढा अंदाजित केला आहे.
महत्वाचे मुद्दे
भारत
- 2019-20 या आर्थिक वर्षात भारत ही सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था ठरणार.
- 2019 साली वृद्धीदर 7.2% एवढा तर 2020 साली 7.3% एवढा असण्याची शक्यता आहे.
- महागाई दर (CPI) 2019-20 या आर्थिक वर्षात 4.3% पर्यंत वाढण्याचा आणि 2020-21 या आर्थिक वर्षात 4.6% पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
- चालू खात्यातली तूट 2019-20 या आर्थिक वर्षात 2.4% पर्यंत वाढण्याचा आणि 2020-21 या आर्थिक वर्षात 2.5% पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
आशियात धिमी वाढ दिसून येणार आहे. आशियातल्या उच्च उत्पन्न घेणार्या नवीन औद्योगीक अर्थव्यवस्थांना वगळता, वृद्धीदरात 2018 सालाच्या 6.4 टक्क्यांवरून 2019 साली 6.2% आणि 2020 साली 6.1% पर्यंत घट होण्याची अपेक्षा आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 6 April 2019 Marathi |
6 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
लंडनच्या विधी विद्यापीठाकडून अभिनेता शाहरुख खानला मानद डॉक्टरेट
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ह्यांना ब्रिटनच्या लंडन या शहरातल्या विधी विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्राप्त झाली आहे.समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व राखत शाहरुखने केलेल्या कार्यांसाठी हा सन्मान दिला गेला. त्यांनी देशातल्या विविध सरकारी मोहिमांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेत देशकार्यात योगदान दिलेले आहे. त्यांची मीर फाउंडेशन ही ना-नफा संस्था अॅसिड हल्ल्यात बचावलेल्या लोकांसाठी कार्य करते.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 6 April 2019 Marathi |
6 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
हवामानातल्या बदलांमुळे 19 दशलक्ष बांग्लादेशी मुलांचे आयुष्य धोक्यात आले आहे: UNICEF
संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) कडून “ए गॅदरिंग स्टॉर्म: क्लायमेट चेंज क्लाउड्स द फ्यूचर ऑफ चिल्ड्रेन इन बांग्लादेश” या शीर्षकाखाली एक अहवाल प्रकाशित केला आहे.अहवालात असे दिसून आले आहे की बांग्लादेशाची सपाट भूमी, घनदाट लोकसंख्या आणि कमकुवत पायाभूत संरचना यांमुळे हवामानातल्या बदलांमुळे उद्भवलेल्या धोक्याच्या परिस्थितीत अधिकच भर पडत आहे. देशाच्या उत्तरकडील भागात पूर आणि दुष्काळ अश्या परिस्थितींचा तर बंगालच्या खाडीलगतच्या प्रदेशात वादळी परिस्थितीला धोका जाणवला आहे.
हवामानातल्या बदलांशी निगडित पूरपरिस्थिती, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे बांग्लादेशात राहणार्या 19 दशलक्षांहून अधिक लहान मुलामुलींचे जीवन आणि भविष्य धोक्यात आले आहे.
समुद्राची वाढती पातळी आणि खारट पाण्याच्या घुसखोरीमुळे, प्रदेशातल्या कुटुंबांना वेळोवेळी स्थलांतरण करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात आणि आरोग्य सेवा मिळविण्यात खंड येत आहे.
UNICEF बाबत
संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund -UNICEF) याचे मुख्यालय न्यूयॉर्क शहर (न्यूयॉर्क, अमेरिका) येथे आहे. UNICEF आधी दिनांक 11 डिसेंबर 1946 रोजी ‘युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड’ या नावाने तयार करण्यात आले होते, ज्यामधून द्वितीय विश्वयुद्धाच्या धर्तीवर प्रभावित झालेल्या बालकांना आपत्कालीन अन्न व आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी याची स्थापना केली गेली होती. पोलंडचे डॉक्टर लुडविक राज्चमॅन हे UNICEFचे संस्थापक म्हणून ओळखले जातात आणि ते या संघटनेचे पहिले अध्यक्ष होते.
पुढे 1950 साली सर्वत्र विकसनशील देशांमधील बालकांच्या आणि महिलांच्या दीर्घकाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघटनेचा विस्तार करण्यात आला. 1953 साली तो संयुक्त राष्ट्रसंघाचा भाग बनला आणि नावामधील ‘इंटरनॅशनल’ व ‘इमर्जन्सी’ शब्द वगळण्यात आले, मात्र मूळ संक्षिप्त नाव काम ठेवण्यात आले. UNICEFचे कार्यक्षेत्र 190 देश आणि प्रांतांमध्ये पसरलेले आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 6 April 2019 Marathi |
6 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
जागतिक आरोग्य दिवस: 07 एप्रिल
दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक आरोग्य दिन’ पाळला जातो.यावर्षी “युनिव्हर्सल कव्हरेजः एव्हरीवन, एव्हरीव्हेअर” ही या दिनाची संकल्पना आहे.
इतिहास
1948 साली जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) प्रथम ‘जागतिक आरोग्य सभा’ आयोजित केली होती. या सभेत दरवर्षी 7 एप्रिल ही तारीख जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय सन 1950 पासून प्रभावी करण्यात आला.
प्रत्येक वर्षी जगाचे लक्ष वेधण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय निवडला जातो. विषयनिहाय कार्यक्रमांचे आयोजन आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर केले जाते आणि त्यामधून जनजागृती केली जाते.
जागतिक आरोग्य दिन हा आठ अधिकृत जागतिक आरोग्य मोहिमांपैकी एक आहे. इतर सात मोहिमा - जागतिक क्षयरोग दिन, जागतिक लसीकरण आठवडा, जागतिक मलेरिया दिन, जागतिक तंबाखू विरोधी दिन, जागतिक एड्स दिन, जागतिक रक्तदाता दिन आणि जागतिक हिपॅटायटीस दिन.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 6 April 2019 Marathi |
6 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
सुमारे 100 जणांना 'महर्षी बद्रायन व्यास सन्मान' दिला गेला
शास्त्रीय भाषांच्या क्षेत्रात विद्वानांनी केलेल्या कार्याचा सन्मान करण्यासाठी, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते सुमारे 100 जणांचा 'महर्षी बद्रायन व्यास सन्मान' देऊन गौरव करण्यात आला आहे.दिल्लीत दिनांक 4 मार्च 2019 रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात या पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. त्यात प्रा. मौलाना सैयद असद रझा हुसैनी ह्यांना अरबी भाषेच्या प्रचारासाठी आणि उच्च शिक्षणाच्या प्रचाराच्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार दिला गेला.
पुरस्काराबद्दल
‘महर्षी बद्रायन व्यास सन्मान’ हा दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार आहे, जो संस्कृत, फारसी, अरबी, पाली, प्राकृत, शास्त्रीय उडिया, शास्त्रीय कन्नड, शास्त्रीय तेलुगू आणि शास्त्रीय मल्याळम या भाषांच्या क्षेत्रात लोकांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्याकरिता दिला जातो. भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे हा पुरस्कार दिला जातो.
सन 2002 मध्ये हा पुरस्कार सादर केला गेला. या पुरस्कारासाठी 30 ते 45 वर्षे वयोगटातल्या तरुण विद्वानांची निवड केली जाते. राष्ट्रपती कडून दिल्या जाणार्या या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि 1 लक्ष रुपये रोख असे आहे.
Current affairs | Evening News Marathi
Current affairs 6 April 2019 Marathi |
6 एप्रिल 2019 करेंट अफेयर्स मराठी
निरज आणि सिंधू वर्षातले सर्वोत्तम खेळाडू ठरले: ESPN इंडिया मल्टी-स्पोर्ट पुरस्कार 2018
बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि भालाफेकपटू निरज चोपडा ह्यांचा 2018 साली ‘ESPN इंडिया मल्टी-स्पोर्ट पुरस्कार’ याचा वर्षातला/ली सर्वोत्तम क्रिडापटू (महिला व पुरुष) हा सन्मान देऊन गौरव करण्यात आला आहे. हे पुरस्कार 11 श्रेणींमध्ये दिले गेलेत.इतर पुरस्कारांचे विजेते -
- कमबॅक ऑफ द इयर - सायना नेहवाल (बॅडमिंटन)
- कोच ऑफ द इयर - जसपाल राणा (नेमबाजी)
- वर्षातला उदयोन्मुख क्रिडापटू - सौरभ चौधरी (नेमबाजी)
- वर्षातला सर्वोत्तम संघ - महिला संघ (टेबल टेनिस)
- वर्षातला सर्वोत्तम सामना – अमित पांघल व हसनबॉय दस्मतोव्ह (मुष्टियुद्ध)
- वर्षातला सर्वोत्तम अपंग क्रिडापटू – एकता भ्यान (पॅरा-अॅथलेटिक्स)
- वर्षातला सर्वोत्तम क्षण - महिलांची 4x400 मीटर शर्यत
- जीवनगौरव पुरस्कार – प्रदीप कुमार बनर्जी (फुटबॉल)
No comments:
Post a Comment